! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 14 November 2014

॥ अष्टविनायक दश॔न ॥


:

श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक! अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.

श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर नक्षीकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. त्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -

१. मोरगांव -
अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामद
 समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.

जवळच कर्‍हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.

२. थेऊर -
अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. या गणेशाला डाव्या बाजुला सोंड आहे.

पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते.  थेऊरचा विस्तार हा माधवराव  पेशवे यांनी केला.  माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले.  यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.

थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)
३. सिद्धटेक -
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून ९९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून १४२ कि. मी. अंतरावर आहे.

४. रांजणगाव -
अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.

या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की - त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारीवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.

अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो.
 आहे.

५. ओझर-
अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.

६. लेण्याद्री -
अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायर्‍
: पायर्‍या आहेत.

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

७. महड -
महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.

या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.

रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली - खालापूरच्या दरम्यान आहे.
८. पाली -
पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.

हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.

अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणार्‍या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.

Thursday, 13 November 2014

॥ बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ॥



आज १४ नोव्हेंबर..पंडित जवाहरलाल नेहरुंचा जन्मदिन..बालदिन..

वयाने कित्तीही मोठे झालो तरी आपलं ह्रदय मात्र बेफाम तरुण असण्यापेक्षा चक्क
लहान मुलासारखं निरागस असावं असं मला वाटतं.
हसत खेळत,धडपडत,पडून उठत या जगात वावरावं.प्रत्येक गोष्ट नव्या उत्सुकतेने
शिकावी,समजावी.
जीवनातील संकटांमुळे कोरड्या होऊ पाहणार्‍या मनाची जगण्याची तहान संपू नये,ती
कायम रहावी.

_./'\._¸¸.•¤**¤•.¸.•¤**¤•.
*•. .• बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
/.•*•.\ ¸..•¤**¤•.,.•¤**¤•.

** ' आजही ' , मी लहान आहे.. **


नाद हे खुळे सुटतील कसे ?
कारण..' आजही ' ,

खाते चॉकलेटस
चाखत जरी सत्य आहे..

खुडते गुलाब
बोचत जरी काटे आहे..

धावते वार्‍यासवे
विस्कटत जरी केस आहे..

नाचते पावसांत
कोसळत जरी विजा आहे..

खेळते दोस्तांत
दिसत जरी मुखवटे आहे..

हसते उत्फुल्ल
उरात जरी वेदना आहे..

फिरते नदीतीरी
फितुर जरी किनारा आहे..

रमते परीकथांत
फसवे जरी सुखांत आहे..

झोपते निवांत
तुटत जरी स्वप्नं आहे..

जगते भरभरुन
कळत जरी शेवट आहे..
 
नाद हे खुळे सुटतील कसे ?
कारण..' आजही ' ,

मी लहान आहे..
मला जीवनाची तहान आहे..

॥ बीजे एक वादळ ॥

Wednesday, 12 November 2014

॥ शाहिस्तेखान आणि डायरी ॥

शाहिस्तेखानला
रोज "डायरी"
लिहिण्याची सवय
होती. त्या डायरीचे नाव "शाहिस्तेखान
बुर्जी"
असे आहे. त्यामध्ये "शिवरायांनी"
केलेल्या हल्ल्याच्या प्रसंग त्याने नमूद
केलेला आहे. आणि याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.
तो असं लिहितो,,,
"शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ
थांबला. शाहिस्तेखानाची एक बहिण धावत धावत
खानाकडे आली आणि म्हणाली, 'भाईजान
मेरी बेटी लापता हैं!...मेरी बेटी लापता हैं,
भाईजान!' त्यावेळी आपली बोटं
छाटलेला शाहिस्तेखान स्मितहास्य करत
म्हणाला,...'शिवाजीची माणसं तिला पळवणार
नाहीतच,
पण!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा.
कारण! तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल.
"अरे! कोण विश्वास
दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर...!"
"अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून
बसली होती, नंतर
ती सापडली".
मित्रांनो हि गोष्टं सांगण्याच तात्पर्य एवढचं
कि, " आज या सबंध भारतीय
समाजाला "शिवाजी महाराजांसारख्या"
चारित्र्यवान
महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज
आहे".
!!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!!
!!! जय भवानी - जय शिवराय !!!

Monday, 10 November 2014

॥ शिवरायांची आरती व्हिडिओ ॥


॥ शिवजन्माची पहाट ॥


शिवजन्माची पहाट




सूर्यकीरणे गारव्याला होती जाळत
शिवनेरीवर भगवाही होता खेळत ,
येणार्‍या नव्या पर्वाची लागली होती चाहूल
शिवजन्मान पडणार होत पहिल मराठी पाउल ...


मराठ्यांचा प्रत्येक आश्रू
जिजाउन साठवला होता ,
आई भवानीस तेच आश्रू देऊन
पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता ...


मंदिर थराराली , शिवनेरीची तोफ कडाडली
वार्‍याची कोवळी झुळुक दर्‍या खोर्‍यात दरवळली ,
जिजाउपोटी मराठ्यांचा राजा अवतरला
सांगत मुकी पाखरही किलबीलली ....


नगारा वाजला ,शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला ,
आता सह्याद्रीवर भगवा फडकनार
मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकनार ....


इतिहासच पाहील पान
शिवजन्मान लिहाल गेल होत ,
हिरव्या दगडावर आता भगवे रक्त
स्वराज्याचा इतिहास कोरत होत ...

॥ शिवरायांची आरती ॥

महाराजांच्या कविता
शिवरायांची आरती

जय देव, जय देव, जय जय शिवराया ।
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ॥ धृ ॥


अर्थ :- हे शिवरायातुझा जयजयकारअसो.
तुझ्याशी अनन्यशरण झालेल्याआर्यांचे (भारतीयांचे) तारण करण्याकरता, त्यांच्यावरील आलेल्यासंकटांचे निवारण करण्याकरता तु ये. (धृवपद)

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला ।
आला आला सावध हो शिवभूपाला ।
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला ।
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला ॥१॥


:- या आर्यभूमीवर इस्लामचे आक्रमण आले आहे त्या मुळे हे भूमीच्यापालनकर्त्या शिवराया तू सावध हो. सद्गतित कंठाने ही भूमाता तुजलाआळवत आहे. हा करुणाघन असा आवाज तुझे हृदय भेदून टाकीत नाहीकाय ? (१)

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी ।
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी ।
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता ।
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता ॥२॥
[10:55, 11/11/2014] Fakt BJ: :- शुंभ निशुंभ यांचे निर्दालन करणारी ही जगन्माता. दशानन रावणाचेमर्दन करुन या जगदंबेचे रक्षण श्रीरामांनी केले. असे सपूत ही भारत माताप्रसवली. अशी ही भारतमाता इस्लामच्या छळाने गांजून गेलेली आहे. हेशिवराया तुझ्या शिवाय दुसरा तारणहार या मातेला कोण आहे बरे ?

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो ।
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो ।
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया ।
भगवन भगवदगीता सार्थ कराया या ॥३॥


:- अतिशय त्रस्त झालेले आम्ही दीन लोक तुझ्या शरणास आलेलोआहोत. पारतंत्र्यामुळे आम्हाला मरणकळा आलेली आहे. संतसज्जनांच्या संरक्षणाकरता दैत्यांच्या नाशाकरता परमेश्वर अवतार घेतोअसे गीतावाक्य आहे. श्रीकृष्णाचे हे वाक्य सार्थ ठरवण्याकरता हे शिवरायतुम्ही या. (३)

ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरला ।
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला ।
देशास्तव शिवनेरी घेई देहाला ।
देशास्तव रायगडी ठेवी देहाला ।
देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला ।
बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ॥४॥


:- आर्यमंडळाचा पृथ्वीवरील धावा ऐकून स्वर्गाधिष्ठीत तो शिव राजागहिवरुन गेला. या देशासाठीच तो शिवनेरी गडावर जन्म घेता झाला अन्देशासाठीच रायगडावर देह ठेवता झाला. या देशाला स्वातंत्र्य प्रदान करताझाला.
अशा शिवराजाचा जयजयकार करा. बोला, छत्रपती शिवाजी महाराज कीजय ! (४)

!!सुप्रभात!!

धुक्याची चादर घेऊन
      पहाट यावी .
कोकिळेच्या भूपाळीने
      जाग यावी .
ऊगवत्या नारायणाची
       लाली न्याहाळावी .
गोठ्यातील कपिलेची
     धार चाखावी.
तुक्याची एक तरी
      ओवी गुणगुणावी .
प्रसन्न ,संपन्न आयुष्याची
      प्रार्थना करावी .
एक सकाळ ....
      अशीही अनुभवावी  
   
 !!सुप्रभात!!