! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Saturday, 9 June 2018

## कोंडाजी फर्जंद एक ऐतिहासिक मावळा ##

## कोंडाजी फर्जंद एक ऐतिहासिक मावळा ##
काल फर्जंद हा चित्रपट आम्ही पाहिला तेव्हा असे लक्षात आले की शिवाजी महाराजांच्या शब्दांना किती किंमत होती त्याकाळी कोंडाजी फर्जंद ,गुंडाजी ,गुणोजी , आणि बहिर्जी नाईक यांनी आपल्या जीवाची शर्त करून किल्ले पन्हाळा स्वराज्यात सामील केला .
!!अशा ऐतिहासिक मावळ्यांना आमचा मानाचा मुजरा !!

Monday, 30 April 2018

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! !!!जय महाराष्ट्र!!!🚩🚩

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन! माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन! तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन! आणि … पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!🚩🚩

Monday, 2 April 2018

३ april

मराठ्यांच्या राजे छञपति शिवाजी
महाराज यांनात्याच्यां स्मुतिदिनी
विनाम्र अभिवादन आणि
कोटि कोटि प्रणाम
  ।।जय जिजाऊ, जय शिवराय।।
# ३ april 1960

३ एप्रिल १६८०.ही तारीख

           ३ एप्रिल १६८०.ही तारीख काही इतर तारखे सारखी सामान्य नव्हे !अगदी मोजक्या असामान्य तारखांपैकीही ती नव्हे ! ती त्याहूनही खास आहे !तिचा महिमा अपरंपार आहे , ती तारिख म्हणजे ,"महाराष्ट्राच्या कातळ काळजाच्या शाईने  सार्वभौम काळाच्या ललाटावर कोरला  गेलेला अमीट शिलालेख आहे तो !.....
             .विशाल  सह्याद्रीचे भाळ म्हणजे किल्ले रायगड ! त्या भाळाचे कुंकमतिलक म्हणजे  स्वराज्य !अन् लालबुंद कुंकूमभरल्या भाळाचे सौभाग्य म्हणजे 'शिवराय' !!"अवघ्या अर्धशकाच्या काळात बालपणातले काही वर्षे सोडली ;तर स्वराज्याचा वेल लावणे,तो रूजवणे, वाढवणे श्वापदापासून संरक्षिणे ,त्याची फळे मुक्तहस्ते वाटणे,हे केवढे दिव्य  ! स्वराज्य मोडून पडले ,राजा नसला,कितीही विपरित परिस्थिती आली तरी स्वराज्याची उर्मी मनामनात तेवत ठेवणार्ं फिनिक्स पक्षाचं वेड ,महाराजांनी या सह्याद्रीच्या कुशीत पेरलं ; हे महाराजांचं सर्वात अलौकीक काम आहे ....तीस पस्तीस वर्षात अवघ्या जगताच्या कॅनव्हॉन्सवर आपल्या अविश्वसनिय कर्तृत्त्वाचे चित्र रेखाटून शिवराय आजरामर ठरले !यावश्चंद्रदिवाकरो किर्ती करून पुढच्या पिढ्यांसाठी अपार अभिमान मागे ठेवून शिवराय परलोकी गेले .स्वराज्याच्या अन् लौकिकाच्या एेन तारूण्यातल्या दुपारी ,१२ वाजता सूर्य आपले तेजाळ प्रभामंडळ सह्याद्रीवर रोखूण कुणाचीतरी वाट पहात होता... मलूल झालेला रायगड उन्हाळ्याच्या वणव्यात अनामिक  दीवाभितीच्या सावलीला निपचित पडला होता.अलिकडंच अस्सल नागानं  कात टाकून सळसळावं तसं सळसळणारं रायगडाचं सळसळत'ं रुधिर 'भर उन्हाळ्यातही थिजून गलितगात्र झालं होतं ...नगारखान्याचं वाजनं चमत्कारिक वाटतं होतं ,गेले दोन पाच दिवस ..त्या टिपरातून पडणारा ठोका फक्त भैरवीचा नाद का  आळवित होता ... हे रांगड्या रायगडावरच्या भाबड्या मावळ्यांना उमगत नव्हतं !उमगलं तेव्हा उशीर झाला होता.लवकर उमगून तरी काळजीपलिकडं काय केलं असतं त्यांनी ? एरवी निर्गुण अन् निराकार जगदिश्वराला कधी नव्हे तो उमाळा दाटून आला होता .....पण प्रभू जगदीश्वराचा उमाळा मंदिराच्या चिरेबंदित विरुण गेला .. स्वराज्याचं ऊर्जस्वल सत्त्व कातळ कड्यावरून  आकाशी झेपावलं !काळाची टीकटीक १२ वर येतीच निमिषभर स्तब्ध झाली पण.....ती थांबत नसते ,कशानेही,कुणासाठीही निमिशमात्रदेखिल ! पुढच्या ठोक्यासाठी कालपुरुषाने पाऊल उचललं ! अन् सह्याद्रीचे सौभाग्य आकाशाच्या निर्वात पोकळीत अनंताच्या प्रवासाला निघाले ....महाराज निघाले !

शंभुराजे पोरके झाले ,स्वराज्य ओकंबोकं दिसू लागलं ! रयतेचा वाली गेला अन् रयत हवालदिल झाली...प्रत्येक गडावर चिरान् चिरा ...पायवाटेच्या धुळीतला कण अन् कण शहारला......     सजीवाचा प्राण अन् चैतन्य निर्जिव पत्थरावर उदाशी पांघरुन अनंतात विलिन झालं
......
  ३एप्रिल १६८० शनिवार ...
शिवराय गेले...
विचार,आचाराची अन् सत्वशिलतेची विचारधारा मागे ठेवून गेले ......त्या रूपाने ते चिरंजिव ठरले !आपल्या आवतीभोवती आजही आहेत पण लौकिकासाठी आदरांजली अर्पण करु या.
   
     शिवरायांच्या पावण स्मृतीस शतश: मुजरा !

Monday, 5 March 2018

*रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा*

👱"तुमच्या चेहर्‍याला रंग लावण्यास मी आज तुमच्यापर्यंत पोहचु शकत नाही",..👏
"पण मी ईश्वराकडे प्रार्थना करते की",.
"तुमचे आयुष्य सुखाच्या वेगवेगळ्या रंगानी भरून जाऊ दे".

  🙏🏻 *रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा*🙏🏻
🙏🚩

Saturday, 3 March 2018

शिवगर्जना

आस्तेकदम...
आस्तेकदम...
आस्तेकदम...
महाराज.....
गडपती...
गजपती...
भूपती..
अष्टावधानजागृत..
अष्टप्रधानवेष्टित..
न्यायालंकारभूषित..
शस्त्रास्त्रशासत्रपारंगत..
राजश्रियाविराजित.
सकळकुळमंडळीत..
राजनीतीधुरंधर.
प्रौढप्रतापपुरंदर.
क्षत्रियकुलावतंस..
सिंहासनाधीश्वर..
महाराजाधिराज....
राजा शिवछत्रपती महाराज की जय

Sunday, 25 February 2018

शिवाजी महाराज व त्यांच्या आई..

शिवाजी महाराज व त्यांच्या आई....
वाचा.....डोळ्यात पाणी येईल..लाईक नाही केले तरी चालेल पण मित्रांनो एकदा वाचा

राज्याभिषेकाच्या प्रचंड गडबडीतही महाराजांचे लक्ष आईसाहेबांकडे पूर्ण होते. आईसाहेब म्हणजे तर महाराजांचे सर्वस्व. महाराजांचे दैवत. गडावरची हवा फार थंड. वारा फार. आईसाहेबांची प्रकृति अतिशय नाजूक झालेली. गड त्यांना मानवेना. म्हणून महाराजांनी खास त्यांच्यासाठी, गडाच्या निम्म्या डोंगरात असलेल्या, पाचाड नावाच्या गावी एक उत्तम वाडा बांधला.

तेथे त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था केली. राज्याभिषेकासाठी महाराजांनी आपले हे थोर दैवत अलगद गडावर नेले. लटलटत्या मानेने आणि क्षीण झालेल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या बाळाचे सारे कोडकौतुक न्याहाळले. राजा म्हणजे विष्णूचा अवतार. शिवबाला विष्णुरूप प्राप्त झालेले त्यांनी पाहिले. आता आणखी काय हवे होते त्यांना? त्यांना काहीही नको होते, पण महाराजांना त्या हव्या होत्या. राज्याभिषेक उरकल्यावर महाराजांनी (बहुधा मेण्यातून ) आईसाहेबांना गडावरून खाली पाचाडच्या वाड्यात आणले. आईसाहेबांनी राजधानीच्या महाद्वाराचा उंबरठा ओलांडला. रायगडाकडे त्यांची पाठ झाली. आईसाहेबांना ते महाद्वाराचे बुरुज जणू काही विचारीत होते, 'आईसाहेब, आता पुन्हा येणे कधी व्हायचे ?'

आता कैचें येणें जाणे ? आता खुंटले बोलणे ! हेचि तुमची अमुची भेटी, येथूनिया जन्मतुटी ! पान पिकले होते, वाराहि भिऊन जपून वागत होता.
आणि पाचाडच्या वाड्यात आईसाहेबांनी अंथरूण धरले. महाराजांच्या हृदयात केवढी कालवाकालव झाली असेल? अखेरचेच हे अंथरूण ! आईसाहेब निघाल्या ! महाराजांची आई चालली ! सती निघालेल्या आईसाहेबांना पूर्वी महाराजांनी महत्प्रयासाने मागे फिरविले. त्यावर दहा वर्षे आईसाहेब थांबल्या. पण आता त्यांना कोण थांबविणार ? … आई ! कसले हें विचित्र नाते परमेश्वराने निर्माण केले आहे ! जिच्या प्रेमाला किनारे नाहीत. जिच्या प्रेमाचा ठाव लागत नाही. जगाला आई देणारा परमेश्वर किती किती चांगला असला पाहिजे ! पण तीच आई हिरावून घेऊन जाणारा तो परमेश्वर केवढा निर्दय असला पाहिजे !

ज्येष्ठ वद्य नवमीचा दिवस उजाडला. बुधवार होता या दिवशी. आईसाहेबांची प्रकृती अत्यंत बिघडली. आयुष्याचा हिशेब संपत आला. वर्षे, महिने, आठवडे, दिवस संपले. आता अवघ्या काही तासांची थकबाकी राहिली. दिवस मावळला. रात्र झाली. मायेच्या माणसांचा गराडा भवती असतांना, सूर्यपराक्रमी पुत्र जवळ असतांनाही मृत्यूचे पाश पडू लागले. सर्व हतबल झाले होते. कोणाचेही काही चालत नाही इथे.

घोर रात्र दाटली. मध्यरात्र झाली. आईसाहेबांनी डोळे मिटले ! श्वासोच्छ्वास संपला ! चैतन्य निघून गेले ! आईसाहेब गेल्या ! छत्रपतींचे छत्र मिटले गेले ! मराठ्यांचा राजा पोरका झाला ! स्वराज्यावरचा आपला पहारा संपवून आईसाहेब निघून गेल्या. महाराज दु:खात बुडाले. आईवेड्या शिवबाची आई गेली. शिवनेरीवर अंगाई गाणारी, लाल महालात लाड करणारी, राजगडावर स्फूर्ती देणारी आणि रायगडावर आशीर्वाद देणारी आई कायमची निघून गेली. आता या क्षणापासून आईची हाक ऐकू येणार नाही ! कोणत्या शब्दात सांगू आईच्या हाकेचे सुख ? ज्यांना आई आहे ना, त्यांनाच, -- नाही, नाही, -- ज्यांना आई नाही ना, त्यांनाच फक्त ते समजू शकेल !
ज्येष्ठ वद्य नवमी, बुधवारी, मध्यरात्री (दि. 1 7 जून 1 6 7 4 ) जिजाबाईसाहेब मृत्यू पावल्या.