कोंडाजी फर्जंद
अवघ्या साठ मावळ्यानिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा पराक्रमी वीर हा कोंडाजी होय.तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड राजांनी कब्जात घेतले होते.पण दख्खनचा दरवाजा असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता.राजेंनी दि.६ जून १६७२ रोजी रायगडावर आपल्या सहकाऱ्यांना ही सल बोलून दाखविली.
यावेळी कोंडाजी फर्जंद,राजेंना बोलिला की गड म्या घेतो.त्याने अवघे तीनशे हशम(मावळे)राजेंकडे मागितले.अवघ्या तीनशे मावळ्यानिशी पन्हाळगड जिंकावयास निघालेल्या कोंडाजीचे राजेंनी कौतुक करून त्यास सोन्याचे कडे दिधले.कोंडाजीने कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ टाकला.राजापुर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने(जंगली रस्त्याने)अंदाजे ८०-९० कि.मी होते.हेरगिरीने वेष पालटून गडावर जाऊन त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली.गडावर अंदाजे दोन हजार गनिम होते.बाबूखान हा अदिलशाही किल्लेदार होता.
फाल्गुन वद्य त्रयोदशी(दि.६ मार्च १६७३)रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन फिरंगोजी गडाच्या जवळ पोहोचला.तीनशे मावळ्यापैकी त्यांनी निवडक साठ मावळे घेऊन गडावर हल्ला केला.तीन दरवाज्याजवळ असलेल्या कड्यावरून चढून त्यांनी गडावर प्रवेश केला.मध्यरात्री मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकापीला सुरूवात केली.गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यात महाभयंकर युध्द जाहाले.अखेर कोंडाजीच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले.किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला.ते पळून जाऊ लागले.पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला.अवघ्या साठ मावळ्यांनिशी गड ताब्यात घेणारा कोंडाजी खरोखरच वीर होता.
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !
Monday, 4 December 2017
कोंडाजी फर्जंद
Saturday, 2 December 2017
शिवरायांची धोरणी नजर
शिवरायांची धोरणी नजर मावळातील एका कोणे एके काळापासुन उभ्या असलेल्या डोंगरावर पडली अन त्या पुराणपुरुषाच रुपांतर दुर्गपुरुषात झाल. तोच तो इतिहासाच्या पानापानांनी गौरवलेला गडांचा राजा आणि राजांचा गड-किल्ले राजगड!
गुंजवणी,कानद आणि नीरा नदीच्या बेचक्यातील गुंजण मावळातील हा डोंगर तापसांना फार आधीपासुन माहित असावा.ब्रम्हर्षी ऋषींच्या वास्तव्याच्या खुणा मिरवणारा हा डोंगर "बिरमदेवाचा डोंगर" ह्या नावाने मावळाला माहीत होता.यादव आणि बहमनी पुढे आदिलशाही-निजामशाही कालखंडामधे एक दुर्लक्षित ठाण एवढेच ’बिरमदेवगडाला’ मह्त्व होत. शिवरायांनी त्याचे तीन नद्यांनी वेढलेले लष्करीद्रुष्ट्या असलेल मह्त्वपुर्ण स्थान,तीन दिशांना असलेला विस्तार अचूक जाणून घेत त्याला तटबंदीचा साज चढवून डोंगरावर उभारलेल्या जगातील एका सर्वोत्क्रुष्ट राजधानीत रुपांतर केलं. राजगड हा एक आदर्श डोंगरी किल्ला आहे.घेरा-मेट-माची-बालेकिल्ला ही आदर्श डोंगरी किल्ल्याबाबतीत आढळणारी सर्व वैशिष्ट्ये राजगडासंदर्भात आढळतात.
Thursday, 23 November 2017
राजा शिवछत्रपती मानाचा मुजरा
इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा maja raja
प्रतापगड ते #पोलादपूर
#प्रतापगड ते #पोलादपूर दरम्यान घाटातील निसर्गाचा अप्रतिम नजराणा...
कुठे हिरवे, कुठे पिवळे-तांबूस तर कुठे वाहती दुधगंगा...
PC : BJ
Sunday, 19 November 2017
अर्नाळा
अर्नाळा किल्ल्यापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर असणारा एकाकी बुरुज / मनोरा (टेहळणीसाठी). हा मनोरा पोर्तुगीजांनी बांधला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार पुर्वी या बुरुजामधून एक गुहा (चोरवाट) थेट वसई किल्ल्यावर जात होती, परंतु काळाच्या ओघात ती बुजून गेली.
गुलाबी थंडी हवीहवीशी,
गुलाबी थंडी हवीहवीशी,
जुळती नाती नवी-नवीशी.
'गारवा' गाणे कुडकुडत गुणगुणणे,
फुटल्या ओठांचे हलकेच हसणे.
हात चोळणे खांदे उंचावून,
स्वेटर न घालणे थंडी लागून.
एकच कप चहा दोघांनी पिणे,
खूप थंडी आहे....पुन्हा पुन्हा सांगणे.
पतंग उडवण्यासाठी धडपडने,
पतंगासोबतची उंचच स्वप्ने.
कधी रुसणे ......कधी रागवणे,
बोलण्यासाठी पुन्हा कारण शोधणे.
गोड बोलूया ... एकमेकांना सांगायचे,
तिळगुळ वाटत - घेत फिरायचे,
या वर्षीच्या गारव्यात एकदा
देईन वचन अन करेन वादा.,
स्वप्नासाठी तुझ्या प्रार्थना करीन
हवे तुला ते सारे मागेन.
शिवतीर्थ
मित्रांनो आपण इचलकरंजीत शिवतीर्थ पाहतोय. इथे असणारी शिवरायांची भव्य व सुंदर मुर्ती अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील पूजा हि सुद्धा नित्यनियमाने केली जाते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ह्यांचेमार्फत शिवरायांची नित्यपूजा तसेच प्रत्येक पोर्णिमेला शिवमुर्तीस अभिषेक घातला जातो. आपणही ह्या पूजेत सहभागी होऊ.
।।पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय।।