! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 19 November 2017

शिवतीर्थ

मित्रांनो आपण इचलकरंजीत शिवतीर्थ पाहतोय. इथे असणारी शिवरायांची भव्य व सुंदर मुर्ती अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील पूजा हि सुद्धा नित्यनियमाने केली जाते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ह्यांचेमार्फत शिवरायांची नित्यपूजा तसेच प्रत्येक पोर्णिमेला शिवमुर्तीस अभिषेक घातला जातो.  आपणही ह्या पूजेत सहभागी होऊ.

।।पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय।।

Wednesday, 15 November 2017

*छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती

*छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना  माहिती नाही..*

निदान ही पोस्ट वाचून तरी त्याना माहित होईल.

*☆★स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे☆*
_______________________________
*१) लखुजी जाधवराव* (जिजाबार्इंचे वडील)-
सिंदखेड राजा

*२) मालोजीराजे* (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे

*३) विठोजीराजे* (शिवरायांचे चुलते)- भातवडी

*४) शहाजीराजे*- होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.
दावनगेरे (कर्नाटक)

*५) जिजाबाई -* पाचाड (रायगडाच्या पायथ्याला)

*६) छत्रपती शिवाजी महाराज*- रायगडावर

*७) सईबाई* (शिवरायांच्या पत्नी) - राजगड

*८) पुतळाबाई व सोयराबाई* (शिवरायांच्या पत्नी) - रायगड

*९) संभाजीराजे* (शिवरायांचे थोरले बंधू)
कनकगिरी, ता. गंगावटी, जि. कोप्पल

*१०) छत्रपती संभाजी* (शिवरायांचे थोरले
पुत्र)- वडू कोरेगाव

*११) सखुबाई* (शिवरायांच्या कन्या) माळशिरस, जि. सोलापूर

*१२) सूर्यराव काकडे* (शिवरायांचे जवळचे मित्र)-
साल्हेरच्या किल्ल्याजवळ.

*१३) रामचंद्रपंत अमात्य* (अष्टप्रधान मंडळातील
मंत्री)- पन्हाळगडाच्या पायथ्याशी

*१४) मकूबाई* (शिवरायांच्या भावजयी) - जिती,
ता.
करमाळा, जि. सोलापूर

*१५) शिवरायांचे सेनापती नेताजी पालकर-* तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड
प्रतापराव गुजर - नेसरी, ता. गडहिंग्लज,
जि. कोल्हापूर हंबिरराव मोहिते- तळबीड, ता. कराड

*१६) धनाजी जाधव -* वडगाव (कोल्हापूरजवळ)

*१७) रामाजी पांगेरा -* कन्हेरगड, ता. दिंडोरी,
जि. नाशिक

*१८) बाजी पासळकर आणि गोदाजी जगताप*
(गाधवड, जि. पुणे)

*१९) तानाजी मालुसरे आणि शेलारमामा -*उमरळ

*२०‹) रायबा* (तानाजीचा मुलगा)- पारगड

*२१) बहिर्जी नाईक -* भूपाळगड मौजे बाणूर, ता.
आटपाटी, जि. सांगली

*२२) हिरोजी फर्जंद*आणि शिवरायांचे सावत्र भाऊ -
परळी (रायगडाजवळ)

*२३) शिवा काशिद -* पन्हाळगड

*२४) कान्होजी जेधे आणि जिवा महाल-*
कारी अंकवडे, ता. भोर, जि. पुणे

*२५) मुरारबाजी देशपांडे -*पुरंदर

*२६) संभाजी कावजी -* कोंडावळे, ता.
मुळशी, जि. पुणे

*२७) फिरंगोजी नरसाळा-* संग्रामदुर्ग (चाकण) पुणे

*२८) सिदोजी निंबाळकर -* पट्टागड (संगमनेर)

*२९) बाजी प्रभू व फुलाजी प्रभू*- विशाळगड

*३०) दत्ताजी जाधव* (शिवरायांचे मामा बहादुरजीचे नातू)
निलंगा येथे १६६५ साली. समाधीस्थळ सापडत नाही.

*३१) जानोजी भोसले* नागपूरकर - मु.पो. येडोळा, ता. तुळजापूर

*३२) जानोजी निंबाळकर* (तुळजाभवानी देवीचा दरवाजा यांच्याच
नावाने आहे) - बीड

*३३) जगदेवराव जाधवराव* (जिजाबार्इंचा भाऊ बहादुरजीचा नातू व
देऊळगावराजाचा कर्ता)- ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि.
सोलापूर ३४) नागोजी माने (म्हसवडकर)- सिंदखेडराजा
*३५)हिंमतबहाद्दर उदाजी चव्हाण-* अणदूर, ता. तुळजापूर जि.
उस्मानाबाद ३६) अन्नूबाई
(पहिल्या बाजीरावांच्या बहीण )- मु.पो. तुळजापूर, जि.
उस्मानाबाद

*आज महाराष्ट्रातील ब-याच समाध्या जीर्ण अवस्थेत आहेत.*
काही ठिकाणी समाधी अस्तित्वातच नाहीत आणि ज्या आहेत..
*त्याच्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.*

अशी थोरामोठ्यांची समाधीस्थळे पुढील
पिढीला प्रेरणा असतात. *सर्वांत सुंदर समाधीस्थळ शहाजीराजांचे आहे. आपल्यापेक्षा कर्नाटकातील लोकांना हे लवकर समजावे हे विशेष आहे.*

*⛳स्वराज्य⛳*

*छत्रपती शिवाजी राजे भोसले.*
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

*महाराजांच्या पत्नी-*
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

*मुले -*संभाजी, राजाराम,
*मुली -*सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर..

*फितुर जन्मले ईथे हि जरी या मातीची खंत आहे..*
*तरी संभाजी राजे अजुन आमच्या छातीत जिवंत आहेत..*

*मुंडके उडवले तरी चालेल पण मान कुणापुढे वाकणार नाहीl*
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
*जीभ कापली तरी चालेल पण प्राणाची भिक मागणार नाही l*
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
*पाय तोडले तरी चालेल पण आधार कुणाचा घेणार नाही l*

" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म सोडणार नाही."

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*शिवाजी महाराजांचे निधन झाले..*

हि बातमी औरंगजेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
*सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत सांगण्यासाठी गेला.*
*ही बातमी ऐकून औरंगजेब बादशहाने हातातील कुराण बंद करून बाजूला ठेवले.*
तख्तावरून उठला.
त्याने सचिवास आनंद व्यक्त केल्याबद्दल सजा दिली.
व नमाजाची पोझिशन घेऊन *त्याने दोन्ही हात पसरून आभाळाकडे अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले औरंगाजेबाने प्रार्थना केली.*

तिचा *मराठी अनुवाद*-
*"हे देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर.*
*आमच्या हिँदूस्थानातील महान मानवतावादी व सर्वधर्म जातीतील स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू झाला आहे.*
*कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची सताड उघडी ठेव..*

*संदर्भ-* अहेकामे आलमगिरी..
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll👏

आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,

आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:

अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड

औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद. 
                                             कुलाबा जिल्हा  (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. माणगाव
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी

कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड

गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा

जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह

नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड

पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग

सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी

सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदनगड
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड
🚩🚩जय शिवराय🚩🚩

Sunday, 5 November 2017

ऐतिहासिक रायरेश्वर पठार

ऐतिहासिक रायरेश्वर पठार पावसाळ्यानंतर निसर्गाच्या विविधरंगी कारागिरीनं सजतं. इथले परंपरागत पुजारी असणाऱ्या जंगम वस्तीमुळे रायरेश्वर पठाराला भेट देणं, म्हणजे इतिहास आणि दुर्गम निसर्गपुत्रांचं जगणं जाणून घेण्याची संधीच. जंगमवस्तीत कोणाकडेही निवास आणि जेवणाची छान व्यवस्था होते. रायरेश्वर ते नाखिंद टोक असा ट्रेकही करता येतो. इथल्या ऐतिहासिक मंदिराला भेट देऊन दोन दिवस रायरेश्वराचा मुक्काम छान इतिहासाची उजळणी करण्याची संधी देईल आणि एक छान ठिकाण पाहिल्याचं समाधानही.

Wednesday, 4 October 2017

दिवेआगार

दिवेआगार अरबी समुद्राच्या काठचे कोकणातील एक सुंदर ठिकाण.इथले सुंदर समुद्रकिनारे, नारळी- पोफळीच्या बागा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.इथले सुवर्ण गणेशाचे मंदिर खुप प्रसिध्द आहे.गणेशाची ही मुर्ती स्थानिक नागरिकांना जमिनीत खणन करताना सापडली.दिवेआगारला पाच कि.मी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. दिवेआगार रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात आहे.पूण्याहून दिवेआगार हे अंतर १५६ कि.मी तर मुंबईहून अंदाजे १८० कि.मी आहे.इथल्या प्रदूषणमुक्त समुद्रकिनार्यावर सायंकाळचा सुर्यास्त पाहण्यात खरी मजा आहे. श्रीवर्धन,हरिहरेश्वर तसेच किल्ले जंजिरा इथून जवळच आहे.

Thursday, 21 September 2017

🎡 चिल्हेवाडी धरण 🎡

हे धरण इतर धरणांपैकी विशेष बांधण्यात आले आहे. जुन्नर तालुक्यात एकूण पाच धरणांपैकी असलेले हे चिल्हेवाडी धरण होय. दोन डोंररांगा आडवून यास एका खास पद्धतीने बांधण्यात आले असून या धरणातून एक पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे शेतकर्यांस थेट शेतात मीटरद्वारे या पाईपलाईने पाणीपुरवठा करण्याची एक आफलातुन योजना केली गेली आहे. फोफसंडीत आपले उगमस्थान असलेली मांडवी नदी वेडीवाकडी वळणे घेत तीने सह्याद्रीला जणू एका दोरातच बांधले आहे की काय असा भास होतो.
    अलौकिक सौंदर्याची मुक्तहस्ते उधळणच येथे निसर्ग देवतेने अवतरत होऊन केली असावी असे नयनरम्य दृश्य आपणास पहावयास मिळते.

Friday, 8 September 2017

किल्ले तोरणा

अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसर्‍या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्‌ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्या पर्यंतचे अंतर ६० किमी आहे.

हा गाडा वरून राजगड वर जाण्यचा मार्ग आहे
इतिहास संपादन करा

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. हा घेऊन शिवाजीचे स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते.. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले.

हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स.१४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्‍याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठांचा एकमेव किल्ला होय.

प्लस व्हॅली

.

पुण्यापासून कोकणात उतरणाऱ्या ताम्हिणी घाटात, ताम्हिणी गावाच्या पुढे डोंगरवाडी जवळ घाटातच पर्यटकांसाठी एक चौथरा बांधलेला आहे. या चौथऱ्यापासूनच आपण दरीत उतरायला सुरुवात करतो. या ठिकाणी दोन दऱ्या एकमेकांना छेदत गेल्या आहेत, अवकाशातून तसेच या घाटातूनही बघितले असता तो आकार ‘+’ या चिन्हासारखा दिसतो. म्हणून या दरीला नाव ‘प्लस व्हॅली’ दिले गेले.