! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Tuesday, 27 June 2017

▪ " महाराष्ट्रा "बाबत माहिती▪

👉 स्थापना-01 मे 1960
👉 राज्यभाषा -  मराठी

👉राजधानी -  मुंबई
👉 उपराजधानी - नागपूर 
👉ऐतिहासिकराजधानी- कोल्हापूर
👉 सांस्कृतिकराजधानी- पुणे

👉 एकूण तालुके-353
👉 पंचायत समित्या 351
👉 एकूण जिल्हा परिषद-33
👉 आमदार विधानसभा 288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा-720 किमी
👉 नगरपालिका- 230
👉 महानगरपालिका-26
👉 शहरी भाग - 45%
👉 ग्रामीण भाग 55%
👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
👉 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉 जेवण फेमस जिल्हा - कोल्हापूर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - आष्टा  ( सांगली )🔴
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
👉 पहिला संपूर्ण संगणीकृत     जिल्हा -नांदेड

👉 चित्रपट विभाग
मराठी चित्रपट नगरी - कोल्हापूर
बॉलिवूड चित्रपट नगरी - मुंबई

!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!

अस काहीतरी पाठवा ग्रुपमधे ज्यामुळे जनरल नॉलेज वाढेल
जास्तीत जास्त शेअर करा▪

Saturday, 24 June 2017

#शिवतिर्थ #दुर्गदुर्गेश्र्वर #रायगड

असं म्हणतात की, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही..
पण आम्ही आमचा स्वर्ग जिवंतपणीच पाहतो, जगतो अन् अनुभवतो देखील...
अरे मथुरा, काशी सारी तिर्थक्षेत्रे कोणासाठी
ज्या अभाग्याने रायगड न पाहीला त्यांसाठी
होय, आमच्या लेखी हाच आमचा स्वर्ग..
#शिवतिर्थ
#दुर्गदुर्गेश्र्वर
#रायगड

वादळ

Friday, 23 June 2017

आंबोली धबधबा

निसर्गरम्य आंबोली बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट.पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे
हे आंबोली सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आंबोली घाटातून प्रवास करताना निसर्ग पर्यटनाचा आस्वाद पर्यटक मनमुराद घेत
असतात. आकाशाशी स्पर्धा करणार्या टेकड्या, बाराही महिने
हिरव्यागार असणार्या दर्या. पावसाळ्याच्या दिवसात तर या
दर्या अधिकच सुंदर दिसतात. सिंधुदुर्गातील आंबोली गाव समुद्र
सपाटीपासून ६९० मीटर उंचीवर
असलेले थंड हवेचे ठिकाण आहे.

सुट्टीला येथे पर्यटकांचा ओघ सुरु असतो. दाट जंगले, दर्या खोर्यांचा नयनरम्य देखावा असे अमर्याद
सृष्टीसौंदर्य येथून पाहता येते आणि घनदाट जंगलातून मनमुराद भटकंती करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो.
आंबोली येथील महादेव गड, कावळे साद, शिरगांवकर, नट, सावित्री, सनसेट, पूर्वीचा वस असे असंख्य
पॉईन्ट अहेत. हिरण्यकेशी नदीचा उगम येथूनच होतो.

आंबोलीचे मुंबईपासूनच अंतर ५४९
कि.मी असून, पुणे- आजरा- आंबोली हे अंतर ३९० कि.मी. तर
रत्नागिरी- आंबोली २१५ कि.
मी. आहे. सावंतवाडी हे
आंबोलीच्या जवळ २६ कि.मी
अंतरावर असणारे रेल्वे स्टेशन आहे.
येथून बेळगांव ६४ कि.मी. तर दाभोली (गोवा) १४० कि.मी. आहे.
असे हे आंबोली आता उत्कृष्ट
पर्यटन स्थळ म्हणून विकसित
झालेले असून, दरवर्षी हजारो
पर्यटक येथे येत असतात.
पावसाळ्यात तर फेसाळणार्या शुभ्र अशा धबधब्याखाली स्नानाचा
मनमुराद आनंद लुटण्यासाठी
पर्यटकांची झुंबड उडालेली असते.

आकाशभेदी कलावंतीणीचा सुळका!

रायगड जिल्ह्यात विराजमान असणारे गडकिल्ले हे विविधतेने नटलेले आहेत. सागरी दुर्गापासून ते डोंगरी किल्ल्यांपर्यंत सर्वामध्येच वेगळेपण सामावलेलं आपल्याला दिसते. जी गोष्ट गडकिल्ल्यांची तीच इथल्या विविध डोंगरशिखरांची! या सर्वाचं दर्शनसुद्धा तेवढंच मोहक आणि आल्हाददायक ठरते. असाच एक विलोभनीय दुर्ग सुळका म्हणजे कलावंतीणीचा सुळका!

पुण्या-मुंबईतून दर वीकेंडला हौशी ट्रेकर्स दाही दिशांनी सह्याद्रीला जणू वेढाच घालत असतात. अशा लोकांसाठी एका दिवसांत बघण्यासारखी अशी अनेक ठिकाणे या जिल्ह्यात कितीतरी आहेत. या कुतूहलमिश्रित यादीत कलावंतीण सुळक्याचं नाव आपल्यासमोर येतं, तेव्हा साहजिकच आपली उत्सुकता चाळवली जाऊन कधी एकदा तिथे पाऊल टाकतोय असं वाटू लागतं आणि याच उत्सुकतेत बेत ठरवला जातो.
सह्याद्रीच्या विविध आकाररूपांनी सजलेल्या डोंगररांगावर जितकं कवित्व करू तितके ते थोडेच आहे. या डोंगररांगेवर अभेद्य गिरीदुर्ग तर आहेतच तसंच भयाण द-यादेखील आहेत. या प्रत्येकाने स्वत:चे असे खास वैशिष्टय़ जपले आहे. यांचे आकार देखील भुरळ पाडणारे असतात. काही दुर्गाच्या वास्तुस्थापत्याने नटलेल्या कलाकृती भान हरपून टाकणा-या असतात. किंबहुना अशा आकाराच्या मोहापायीच आपली पावले या डोंगरवाटांवर घुटमळत असतात. या आकारांमध्ये विशेष लक्षात राहणारे काही डोंगरांचे सुळके हे मात्र भटकंतीच्या विश्वात मानाचं स्थान घेऊन उभे आहेत. काही सरळ आभाळात घुसलेले तर काही पठारावर आडव्या िभतीसारखे वर आलेले. उदाहरणच द्यायचे झालं तर मांगी-तुंगी, तैलबैला, मिच्छद्रगडाचा सुळका इ. अशी ही यादी वाढतच जाणारी आहे. या पंक्तीतच पनवेलजवळच्या कलावंतीणीच्या सुळक्याने देखील असेच आपले स्थान भटक्यांच्या मनात पटकावले आहे.
तसं पाहिलं तर कलावंतीण हा काही दुर्ग नव्हेच. एका डोंगराच्या निमुळत्या उंच होत गेलेल्या शिखराचे टोकच म्हणायला हवे. या सुळक्याला दुर्ग म्हणण्याचा मोह तुम्हा-आम्हासारख्या भटक्यांचाच. याचा इतिहासात काही संदर्भ सापडत नाही. केवळ एका काल्पनिक गोष्टीचा आधार घेतला जातो. ती म्हणजे एका कलावंतीणीचा महाल या सुळक्यावर होता म्हणूनच हे नामकरण झालं. एवढीच या सुळक्याची ओळख. बाकी भूगोलाच्या चष्म्याने या सुळक्याकडे पाहिले की मात्र याची उंची कुतूहल वाढवते. प्रसिद्ध प्रबळगडाच्या शेजारीच अगदी हातात हात घालून हा सुळका त्याचे वेगळं अस्तित्व राखत आणि वैशिष्टय़ जपत मोठय़ा दिमाखात उभा आहे. त्यामुळे प्रबळगड आणि कलावंतीण सुळक्याची सफारी अनेक दुर्गपेमी एकत्रितपणे करत असतात. यासाठी मात्र दोन दिवस हाताशी हवेत. एका दिवसासाठी कलावंतीणीचा पर्याय निवडायचा अन् याच्याकडे कुच करायचे.
कलावंतीणीच्या सुळक्याकडे येण्यासाठी पनवेल-पुणे रस्त्यावरील शेडुंग गावच्या फाटय़ावरून थेट ठाकूरवाडी हे गाव गाठायचे. येथपर्यंत प्रवास हा वाहनाने होतो. पुढचा प्रवास मात्र पायीच करावा लागतो. तासाभराचं अंतर पार करून आपण प्रबळमाची या पायथ्याच्या वाडीपाशी येतो. प्रबळमाची हे प्रबळगडाचं आणि कलावंतीण सुळक्याचं पायथ्याचं सामायिक वस्ती असलेलं गाव. या माचीवर २०-२५ घरांची वस्ती आहे. या ठिकाणी पर्यटकांची राहण्याची, जेवणाची अतिशय सुंदर सोय होऊ शकते. आदल्या रात्री अन् तेही पौर्णिमेच्या दुधाळ रात्री हा योग जर जुळवून आणलाच तर ही भटकंती वेगळाच आनंद देऊन जाईल. असो. माचीवरून प्रबळगड अन् कलावंतीण या दोघांचं दर्शन मोठं विलोभनीय दिसते. डावीकडे आकाशात घुसण्याच्या तयारीत असलेला कलावंतीणीचा दिलखेचक सुळका आणि उजव्या बाजूला अवाढव्य, आडवं पसरत गेलेलं प्रबळगडाचं पठार आणि दोघांच्या मधील इंग्रजी ‘व्ही’ आकाराची खाच. हे दृष्य बघताक्षणीच भुरळ घालणारं असतं. या खाचेतूनच वर सुळक्यासाठी वाट गेली आहे. माचीवरून या खाचेकडे प्रयाण करायचं व दाट झाडीतूनच वीस मिनिटांत या दोघांना जोडणा-या िखडीपाशी यायचं. या िखडीत उभे राहिल्यानंतर दिसणारं निसर्गाचं रूप हे केवळ आणि केवळ अनुभवावं असंच.. दोन्ही बाजूच्या कातळकडय़ांचं रौद्ररूप हे छातीची धडधड वाढवत असतानाच सुळक्यावर जाण्यासाठीच्या पाय-या आपल्याला नजरेत येतात. आणि भटकंतीचा दुसरा स्वप्नवत टप्पा सुरू होतो.
कातळात कोरलेल्या या पाय-या म्हणजे या भटकंतीची जणू गोळाबेरीजच म्हटली पाहिजे. कातळकोरीव पाय-यांचं जेवढं कौतुक करावं तितकं ते थोडंच आहे. आकर्षक व तितक्याच रेखीव पाय-यांची वर जाणारी शिडी पाहून आपण विस्मयचकितच होतो. या पाय-यांवर पाऊल ठेवायच्या अगोदर नकळतपणे हातच फिरवले जातात. यातच सर्व आले. जेव्हा या वळणावळणाच्या, नागमोडी आकाराच्या पाय-यांनी जसं जसं आपण वर जाऊ लागतो तसं तसं हा प्रवास अधिकच रोमांचित होऊ लागतो. या सुबक पाय-यांवर पडणारे प्रत्येक पाऊल हे स्थापत्याच्या या कलासौंदर्यात चिंब भिजूनच बाहेर येत असतं. खरोखरच अशा पाय-यांची अदाकारी फारच थोडय़ा ठिकाणी पाहायला मिळते. पाय-यांचा हा स्वप्नवत टप्पा पार करून आपण एका छोटय़ा रॉक-पॅचपाशी येतो. येथे सोपे प्रस्तरारोहण करूनच माथ्यावर यावे लागते.
माथ्यावर ठेवलेल्या पहिल्या पावलातच आपण या सुळक्याचेच होऊन जातो. या ठिकाणाहून इरशाळगड, पेठ हे साद घालताना दिसतात तर दूरवर दिसणारे माथेरानचे पॉइंट्स हे भुरळ घालतात. पण या सर्वात भारदस्त वाटतो तो या सुळक्याचा सख्खा शेजारी प्रबळगडच! हे सारे पाहतानाच निरोपाची घडी जवळ येत असते. अवघ्या एका दिवसात होणारी कलावंतीण सुळक्याची ही सफर ही मन ताजतवानं करणारी ठरते. या उंच सुळक्याची चढाई ही मनस्वी आनंद तर देतेच; पण त्याहीपेक्षा कातळात कोरलेल्या नितांत सुंदर पाय-यांच्या स्थापत्यशास्त्रात मन अगदी भिजवून सोडते.

Thursday, 22 June 2017

लिंगाणा

-
सह्याद्रीच्या ऐन कातळकड्याला खेटून रायगड जिल्ह्यात उभा असलेला हा किल्ला. खरं तर सुळकाच..
याच्या निम्म्या उंचीला एक खोदीव गुहा आहे. इथवर पोचणं हेच फार जिकिरीचं काम आहे.. बऱ्याच गिर्यारोहकांच्या यादीत हा किल्ला घर करुन बसलेला आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या रायलिंग पठारावरुन या सुळक्याच्या माथ्यापर्यंतचा परिसर लांबून का होईना, न्याहाळता येतो. इथूनच खाली कोकणात उतरणाऱ्या वाटेचं संरक्षण हे या किल्ल्याचं उद्दिष्ट.. एखाद्याला शिक्षा करायची असल्यास इथल्या गुहेत सोडून द्यावे.. बाकी काम लिंगाणा चोख पार पाडत असे...

Thursday, 15 June 2017

🐾 *मस्त पिकनिक स्पॉट्स* 🐾


🌧☕🌽🚌🚂🏕

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. रिमझिम बरसलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मान्सून पिकनिकची तयारी सुपरफास्ट ट्रॅकवर आहे. कैक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. लोणावळा, खंडाळा, माळशेज घाट यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांबरोबरचं जवळपासचे धबधबे शोधण्याची जोरदार धावपळ सुरू झालीये.

*भिवपुरी*
माथेरानच्या कुशीत असलेले हे ठिकाण मुंब ईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळ हॉटेल्स आहेत. गावकऱ्याना सांगितल्यास ते जेवणाची सोय करतात.

*चिंचोटी*
इथे पोहोचताना हिरव्या झाडाझुडपाच्या दाटीतून जावं लागतं. या मार्गावर ठिकठिकाणी धबधबे पाहायला मिळतील.मुख्य धबधब्याजवळ पोहचायला सुमारे तासभर चालावं लागतं. दहिसर टोलनाक्यानंतर ‘कामण’ जंक्शनजवळ हे ठिकाण आहे. ट्रेनने जायचं असेल तर नायगाव स्टेशनला उतरून रिक्षाने जावे लागते.

*तुंगारेश्वर*
येथे नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद घेता येतो. मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर तुंगारेश्वर आहे. पर्यटकांसाठी डोंगरावर कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही.

*राधा फॉल*
सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सन डॅमपासून तयार झालेला हा धबधबा. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी हा एकमेव पर्याय आहे. इगतपुरीजवळ असलेल्या विल्सन डॅमजवळ हा धबधबा आहे. या ठिकाणी जेवणासाठी हॉटेल्सची सोय नसली तरी इगतपुरीजवळ जेवणाची व्यवस्था होते.

*पांडवकडा*
खारघर परिसरात पांडवकडा हा धबधबा गेल्या दहा वर्षांत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांच्या लीस्टमध्ये अग्रभागी आहे. या धबधब्यावर जाण्यास बंदी घातली असली तरी अनेक पर्यटक पांडवकड्याला भेट देतात. आजूबाजूच्या डोंगराने नेसलेला हिरवाकंच शालू पर्यटकांना भुरळ घालत असतो. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर स्टेशनवरून या ठिकाणी जाता येते.

*झेनिथ*
खोपोली शहरापासून २ किमीवर असलेल्या झेनिथ धबधब्याच्या पाण्याचा फोर्स खूप आहे, पण तरीही तरुणाईला पिकनिकसाठी झेनिथला जाण्याचा मोह काही आवरत नाही.म्हणूनच शनिवारी-रविवारी या धबधब्यावर मोठी गर्दी होत असते. इथल्या प्रत्येक कोपर्यावर पंजाबी धाबे आहेत.

*पळसदरी*
मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक फाट्यापासून १८ किमी दूर आणि पळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन किमी अंतरावर पळसदरी धबधबा आहे. रेल्वेमार्गाचा पर्याय असल्याने या ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त असते. जेवणाची सोय या ठिकाणी होते.

*गाढेश्वर*
पनवेल तालुक्यात पावसाळी गर्दी गाढेश्वर नदीकाठी पाहायला मिळते. मनसोक्त डुंबण्यासाठी इच्छुक असणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जून येतात.

*फणसाड*
फणसाड अभयारण्यामधील या धबधब्यात चिंब होणं म्हणजे एक रोमहर्षक अनुभव आहे. या धबधब्यात सचैल स्नानानंतर अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांची हिरवाई पाहण्यात एक वेगळा आनंद आहे.

*सवतकडा*
मुरुड-जंजिरापासून ११ किमी अंतरावरील सवतकडा धबधबा पर्यटकांनी शोधून काढला आहे. मुरुड-आगरदांडा रस्त्यावरील शिघ्रे गावातून सवतकड्याची पाऊलवाट जाते. या पाऊलवाटेवरून जाण्याचा थरार अविस्मरणीय आहे. जवळपास खाण्याची सोय नाही.

*गवळीदेव*
नवी मुंबईतील घणसोली गावाजवळ असणारा गवळीदेव धबधबाही आसपासच्या पर्यटकांना खुणावत आहे. शहराच्या इतक्या जवळ असूनही हा धबधबा आणि गवळीदेव डोंगर अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे.

*कोंडेश्वर*
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर कोंडेश्वरचा धबधबा आहे. इथे दोन धबधबे आहेत. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. कुंडात डोह असून त्यात कपारी  असल्याने येथे पाण्यात उतरताना पुरेशी खबरदारी घ्यावी लागते.

*भगीरथ*
वांगणीपासून चार किलोमीटर अंतरावर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेला भगीरथ धबधबा आहे. बेडीसगावापासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. या ठिकाणी जेवणाची सोय नाही.

*टपालवाडी*
नेरळ रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्या आनंदवाडी आदिवासी वाडीजवळ यथेच्छ पोहण्यासाठी छान डोह असणारा एक धबधबा आहे. अलीकडच्या काळात पर्यटकांपैकीच कुणीतरी ‘टपालवाडीचा धबधबा’ असे त्याचे नाव ठेवले आहे. ठिकाण अतिशय निसर्गरम्य असले तरी येथे जेवण तसेच कोणतेही खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था नाही.

*आषाणे*
भिवपुरी-कर्जतदरम्यान भिवपुरीपासून पाच किमीवर असलेल्या आषाणे गावाजवळील धबधबा हेही पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी भिवपुरीपासून रिक्षा मिळते. आषाणे ग्रामस्थ पर्यटकांना मागणीनुसार जेवण करून देतात.

*थिदबीचा धबधबा*
पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. कल्याण-माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी साबर्णे गावापासून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी. कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल.

*निवळी*
निवळी घाट चढताना पर्यटकांना आकर्षित करतो तो हिरव्या दाट झाडीतून कोसळणारा धबधबा. निवळी धबधब्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी घाटातच पर्यटकांसाठी खास पॉइंट तयार करण्यात आला आहे. ज्या पर्यटकांना प्रत्यक्ष धबधब्याजवळ जायचे असेल त्यांच्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत.  

*मोहिली धबधबा*
कर्जतपासून ६ ते ७ किमीवर उल्हास नदी पार करून मोहिलीत प्रवेश होतो. डोंगरावरून भिरभिरणारा वारा, हिरवीगार वनराई असे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं, असे वाटते. धबधब्याजवळ थंड वातावरणात गरम गरम वाफाळता चहा आणि मक्याची कणसे खाण्याची मजाच काही औरच आहे. लोणावळ्याचे भुशी धरण,त्यापुढे असणारी टायगर लीप दरी, या ठिकाणी पावसाळ्यात बरेच पर्यटक जातात. इथून जवळच असलेला कोरीगड, तैलबैला,घनगड, कैलासगड इत्यादीसारख्या किल्ल्यांना पावसाळ्यात भेट देण म्हणजे काही औरच मजा आहे.

*ताम्हिणी घाट*
लोणावळ्याजवळील कार्ला-भाजे लेण्या, लोहगड,विसापूर, राजमाची, तुंग,तिकोन्याच्या वाटेने पुढे पौडमार्गे मुळशी धरणाला रस्ता जातो, तोच रस्ता खाली कोंकणात माणगाव-कोलाडला उतरतो. हाच तो ताम्हिणी घाट. मुळशी धरणाच्या काठाकाठाने जाणारा हा गाडी रस्ता अतिशय सुंदर असून एकीकडे धरणाचा पाणवठा आणि त्याचबरोबर उंच डोंगर आणि खोल दर्याचा देखावा एक अविस्मरणीय आनंद देतो.

*पळूचा धबधबा*
माळशेजघाटाआधी मुरबाडजवळ असणारा पळूचा धबधबा हे एक उत्तम स्थळ आहे. याच्यामागे असणारी भीमाशंकरची डोंगररांग पावसाळ्यात विलोभनीय दिसते आणि त्याचबरोबर आपण गोरखगड, सिद्धगड, मच्छिंद्रगड इत्यादी एक दिवसाचे ट्रेकसुद्धा करू शकतो.

*जव्हार*
ठाणे जिल्ह्यातील जव्हार म्हणजे डोंगरदऱ्या असंख्य धबधबे, दूरवर पसरलेली भातशेती, यांनी नटलेले छोटेसे हिल स्टेशन. इथला हनुमान टेकडी, शिर्पा माळ, दाभोसा धबधबा ठिकाण पाहण्यासारखा आहे. कसारा घाटाअलीकडे बळवंतगड हा छोटासा किल्लादेखील पाहण्यासारखा आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात असणारे कावनई, गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर, बसगड, अंजनेरी इत्यादीसारख्या बर्याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते.

*तानसा आणि भातसा*
ठाणे-नाशिक महामार्गावर आटगावहून तानसा आणि याच भातसा धारणाकडे जाणारा रस्ता आहे. इथेदेखील एक दिवसीय पावसाळी सहलीला जाता येईल.

*कळसूबाई*
कळसुबाई, भंडारदरा आणि रंध धबधब्याला पावसाळ्यात भेट द्या. इथले अमृतेश्वर मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे. साम्रद गावाजवळील सांधण दरी अप्रतिम आहे. रतनगड किल्लादेखील याच परिसरात असून अनेक मंडळी रतनगड ते हरिश्चंद्रगड असा ट्रेकदेखील करतात.

*तोरणमाळ*
धुळे-नंदुरबार इथून जवळ असलेल्या तोरणमाळ या ठिकाणची सुंदरता काही औरच आहे.इथले जंगल, डोंगरदऱ्या, पक्षी, रंगीबेरंगी फुले आपले मन प्रसन्न करून टाकतील यात वादच नाही.

*पावणादेवी* 
नाशिकच्या पुढेच असणाऱ्या चाळीसगावाजवळील पावणादेवी आणि त्या परिसरातील जंगल हे पावसाळ्यात पर्यटनाचे आणखी काही पर्याय ठरू शकतात. इथे असलेला कण्हेरगड किल्ला आणि केदारेश्वर धबधबा पाहण्यासारखा आहे.

*चिखलदरा*
हे अमरावतीहून जवळ असणारे आणि विदर्भवासीयांचे आवडते ठिकाण. इथे असणारा गाविलगड किल्ला, किचकदरा यासारखी बरीच ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.चिखलदर्याहून जवळच्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला नक्की भेट द्या.

*कासचे पठार*
सातारा जिल्ह्यातलं कासचे पठार म्हणजे महाराष्ट्रातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. साधारण सप्टेंबर महिन्यात या पठारावर असंख्य विविधरंगी फुले फुलतात आणि त्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक इथे भेट देतात. कासबरोबरच साताऱ्या जवळ नदीकिनारी आणि जुन्या मंदिरांचा समूह असणाऱ्या माहुली तसेच अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा पाहण्यासारखा आहे. सातारहून ८ कि.मी. असलेल्या कण्हेर धरणाला सुद्धा भेट देता येईल.

*पन्हाळगड ते विशाळगड*
ट्रेकर्सनी पन्हाळगड ते विशाळगड हा पावसाळी ट्रेक नक्की करावा. मसाईचे विस्तीर्ण पठार, शेती, जंगल, ओढे, नदी, नाले, छोटी छोटी गावे अशा ठिकाणांहून हा ट्रेक पूर्ण होतो.

*वरंधाघाट*
पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटा लगतच कावळ्या या किल्ल्यावर जाता येईल. डोंगरातून वाहणारे छोटे मोठे झरे, धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्या दरीत दिसणारं छोटंसं गाव, आणि त्या गावालगत वाहणारी नदी असे वेड लावणारं सौंदर्य वरंधाघाटात आहे. वरंधाघाट उतरल्यावर शिवथरघळ इथली गुहा आणि त्या गुहेबाहेर पडणारा पाऊस, धबधबा म्हणजे क्या बात!

*सुरगड किल्ला*
रायगड जिल्ह्यातील नागोठणेजवळील सुकेळी खिंडीजवळ खांबगाव नजीक सुरगड किल्ल्याला देखील भेट देणं छान वाटेल. मुंबईहून महाडकडे जाताना याच सुकेळी खिंडीपासून पायवाटेने साधारण २० मिनिटांनंतर एक उंच धबधबा दिसतो. त्या धबधब्याचं पाणी आणि नदी हे एक अतिशय सुंदर आणि सुरक्षित ठिकाण आहे.

*दुरशेत*
रायगड जिल्ह्यात खोपोली पाली रस्त्यालगत दुरशेत गावाआधी उंबरखिंड हे स्थान आहे. खंडाळ्याच्या डोंगरातून पडणारे पाणी उंबरखिंडीत येते आणि नदीमार्गे कोकणात जाते.दुरशेतहून पुढे जांभूळपाड्यामार्गे भेलीव गावालगतचा मृगगड हा किल्ला आणि त्याकडे जाणारा नदीलगतचा मार्गही पर्यटकांना भुरळ पाडतो. गणपतीच्या पाली गावाआधी ठाणाळे हा लेणी समूह आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पावसाळ्यात आपले विलोभनीय रूप दाखवतो. पाली गावालगतच सरसगड हा किल्ला आहे, आणि तेथून पुढे असणारा सुधागड किल्ल्याला देखील पावसाळ्यात भेट देणं मस्तच.