! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 4 June 2017

मार्लेश्वर

महाराष्ट्र राज्यातील, रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर नावाचा एक छोटासा तालुका आहे. त्याच तालुक्यात देवरुख ह्या गावापासून १६ किमी अंतरावर मार्लेश्वर हे शिवाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. हे शिवस्थान डोंगरावरील गुहेत आहे. ह्या गुहेत दोन शिवपिंडी आहेत, त्यातील एक मल्लिकार्जुन तर दुसरी मार्लेश्वर ह्या नावाने ओळखल्या जातात. असे सांगण्यात येते की, हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ आहे. जेव्हा हे स्थान निर्माण झाले तेव्हा येथे पार्वती नव्हती. आणि म्हणूनच ह्या देवस्थानाची अशी पद्धत आहे की येथे दर मकर संक्रांतीला शिव-पार्वतीचे लग्न लावले जाते. मार्लेश्वर हा वर तर साखरपा ह्या गावाची भवानी मंदिर (गिरिजादेवी) ही वधू समजून लग्न लावले जाते. हा लग्न सोहळा लिंगायत पद्धतीने लावला जातो. ह्या शिव पिंडी स्वयंभू आहेत.

गावापासून दूर असलेल्या छोट्याश्या गुहेत असलेले हे ठिकाण निसर्गरम्य व हिरव्यागार वनराईने नटलेले आहे. ह्या स्थानाचे एक आकर्षण म्हणजे येथे वाहणारा धबधबा. सुमारे २०० फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा धारेश्वर ह्या नावाने ओळखला जातो. सह्याद्रीच्या कड्यावरून हा धबधबा पुढे बावनदी म्हणून वाहू लागतो. माघ महिन्यात ह्या धबधब्याखाली आंघोळ करणे हे खूप पवित्र समजले जाते.

मार्लेश्वरला जाण्यासाठी साखरपा, देवरुख तसेच रत्नागिरीहून राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या आहेत.

Saturday, 3 June 2017

आंबोली

आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या प्रसिद्ध शहरापासून ३० कि.मी. अंतरावर आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कुशीतच समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर असलेले हे स्थान निसर्गरम्यता आणि चांगले हवामान यासाठी प्रसिद्ध आहे. सभोवताली पसरलेले दाट जंगल, डोंगरदर्‍या, अप्रतिम सृष्टिसौंदर्य हे या स्थानाचे वैशिष्ट्य आहे.
#AmboliGhat #FaktaMarathi

Sunday, 21 May 2017

Tuesday, 16 May 2017

जव्हार हिल स्टेशन

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात आहे. नितांत सुंदर दऱ्या-खोऱ्या, घनदाट समृद्ध जंगले आणि सुखद हवामानाची देणगी या ठिकाणी आहे. जव्हार हे वारली चित्रकलेसाठी सुप्रसिद्ध आहे. जव्हारला पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर देखील म्हणतात. हे नाशिकपासून ८० किमी तर मुंबईपासून १८० किमीवर आहे. जव्हारच्या आसपास काही पर्यटन स्थळे म्हणजे जय विलास महाल, भूपतगड किल्ला, दादर-कोप्रा आणि पलुसा धबधबे, हनुमान आणि सनसेट पॉईंट्स आणि शिर्पामड. जव्हारच्या जवळचा विमानतळ मुंबई आणि नजिकचे रेल्वे स्थानक इगतपुरी मध्य रेल्वेवर ६१ किमीवर आहे परंतु नाशिक जास्त सोयीचे आहे.

Saturday, 13 May 2017

छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव

*नितिवंत , किर्तिवंत , यशवंत , रणधुरंदर , महापराक्रमी , स्वराज्याचे धाकले धनी ,  प्रौढप्रतापी , छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव निमित्त सर्व मराठमोळया जनतेला शुभेच्छा...###

शुभेच्छूक :- बीजे

Sunday, 30 April 2017

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!

आणि …

पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

!!!जय महाराष्ट्र!!!

रतनगड

सफर गडकोट किल्ल्यांची...

       अहमदनगर जिल्ह्यात घनचक्कर रांगेत, प्रवरा नदीचा उगमस्थान असलेला हा किल्ला आहे. भंडारदरा धरणामुळे सधन आणि सुपीक झालेला हा प्रदेश आहे. एकीकडे घनदाट जंगल आणि दुसरीकडे भंडारदर्‍याचा विस्तीर्ण जलाशय असा हा निसर्गरन्य परिसर आहे.

इतिहास

रतनवाडी हे गडाच्या पायथ्याचे गावं आहे. या रतनवाडीतच अमृतेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे. अमृतेश्वराचे मंदिर हे हेमाडपंथी आहे. साधारण १२०० वर्षा पूर्वीचे हे मंदिर यादवकालीन स्थापत्यशास्त्राची ओळख करुन देते.पेशवे काळात या मंदिरा संबधी उल्लेख आढळतो तो असा:-

श्री महादेव रतनगडी किल्ल्याखाली आहे, त्यास बालाजी कराळे यांनी किल्ले रतनगड समयी नवस केला, त्याप्रमाणे रतनगड देविले सदरहून सामान श्रीच्या गुरवाजवळ देऊन नित्य नैवेद्य व नंदादीप ताकीद करुन चालविणे म्हणून मोरो महादेव यास सनद दिली.

रतनगडाच्या भौगोलिक स्थानामुळे रागूर व अलंग हे घाटमाथ्यावरचे अन्‌ सोकुलीवाडी हा कोकणातला महाल या गडाच्या अधिपत्याखाली होते.

पहाण्याची ठिकाणे :

रतनगडावर जाण्याअगोदर पायथ्याशी रतनवाडीत असणारे अमृतेश्वराचे मंदिर पाहावे. हे मंदिर म्हणजे हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरावर प्रचंड प्रमाणात कोरीव काम आढळते. यामध्ये यक्षकिन्नरच्या मूर्ती, पुराणातील प्रसंग, समुद्रमंथन, मुक्त शिल्पे यांचा समावेश आहे. मंदिराच्या बाजुलाच प्रशस्त अशी पुष्करणी आहे, यालाच विष्णुतीर्थ असे म्हणतात. यात विविध प्रकारच्या मूर्ती ठेवण्यासाठी कोनाडे आहेत. विष्णु आणि गणपती यांनी शस्त्रे धारण केलेल्या मूर्त्या आहेत. अमृतेश्वराच्या मंदिराशी साधर्म्य साधणारे एक मंदिर नाणेमावळ प्रांतात आढळून येते. किल्ले चावंडजवळील कुकडी नदीच्या उगमापाशी असणारे कुकडेश्वर मंदिर व किल्ले चावंडवरील पुष्करणी हे समकालीन असावेत. शिडीच्या मार्गाने गडावर जातांना प्रवरा नदीचे पात्र आपणा बरोबरच धावत असते. हा रस्ता घनदाट जंगलातून जाणारा आहे. साधारण दुसर्‍या पठारावर आल्यावर डावीकडे सरळ जाणारी वाट हरिश्चंद्रगडाकडे घेऊन जाते, तर समोरच्या वाटेने शिडी चढून गेल्यावर गडाचा पहिला दरवाजा लागतो. दरवाजावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे.दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडची वाट गुहांकडे घेऊन जाते, तर डावीकडची वाट गडाच्या दुसर्‍या दरवाजाकडे जाते, दुसर्‍या दरवाजातून पुढे गेल्यावर आपल्याला भग्नावस्थेतील गोल बुरुज दिसतो, येथेच पाण्याची दोन ते तीन टाके आहेत, येथून थोडे पुढे गेल्यावर वाटेत इमारतीचे अवशेष आढळतात. साधारणत: १० मिनिटे चालल्यावर डावीकडील बाजूस साम्रद गावाकडील कोकण दरवाजा लागतो, दरवाजा उध्वस्त स्थितीत आहे, येथून उतरणारी वाट मात्र मोडकळीस आलेली आहे. या वाटेने उतरणे धोकादायक आहे. येथून पुढे गेल्यावर दोन विस्तीर्ण टाके लागतात. काही लोकांच्या मते येथे तळघर किंवा भुयार असावे. पुढे आणखी थोडे गेल्यावर अनेक टाक्यांची रांगची रांग आढळते. याच मार्गाने पुढे गेल्यावर गडाच्या कातळभिंतीत निसर्गनिर्मीत नेढे आढळते. नेढ्यातून चहू बाजुंचा परिसर दिसतो. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, आजोबा, हरिश्चंद्रगड, खुट्टा, माहुली हा सर्व परिसर दिसतो. डावीकडे खाली चांगल्या स्थितीतील दरवाजा आहे. ३० ते ४० कातळात कोरलेल्या पायर्‍याही आहेत. संपूर्ण दरवाजा कातळात कोरलेला आहे. दरवाज्यातून खुट्टा सुळक्याचे दर्शन घडते. नेढ्याच्या दुसर्‍या बाजुने उतरल्यावर अर्ध्या तासावरच प्रवरा नदीचे उगमस्थान आहे. संपूर्ण गड पाहण्यास दोन तास लागतात.

पोहोचण्याच्या वाटा :

१) रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून :-

एक वाट रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून जाते. या वाटेने गडावर जातांना ५० ते ६० कातळात कोरलेल्या पायर्‍या लागतात. या मार्गे गडावर पोहोचण्यासाठी २ तास लागतात. वाट सोपी आहे.

२) शिडीची वाट :-

ही वाट गडाच्या डावीकडून जाते. या वाटेने गडावर जातांना दोन शिड्या लागतात. गडावर जाण्यास साधारण २ तास पुरतात, वाट तशी सोपी आहे.

राहाण्याची सोय :

शिडीच्या वाटेने वर चढल्यावर पहिल्या दरवाजाच्या उजव्या बाजूस तीन गुहा आहेत. यात ७० ते ७५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय :

गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.

पाण्याची सोय :

गडावर बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ :

शिडीच्या वाटेने गडावर जाण्यास २ तास लागतात.