! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 16 April 2017

फोटोग्राफी

– एक काळ होता जेंव्हा फोटो काढणे म्हणजे श्रीमंतांचे काम असायचे. खानदानी फोटो काढुन भिंतींवर चढवायचा रिवाजच होता ना तेंव्हा. नंतर मात्र सर्वसामान्य एक चैन म्हणुन महिन्यातुन एकद वेळेस स्टुडीओ मध्ये जाऊन सहकुटुंब फोटो काढुन घेऊ लागले. फिल्म रोल असेपर्यंत तरी फोटो काढणे हे तसे चैनीचेच काम होते. आवश्यक तेंव्हाच, सणा-समारंभाचेच फोटो काढले जायचे. डिजीटल युग अवतरले आणि फोटोग्राफीचा कायापलट झाला. अनेक उदयोन्मुख फोटोग्राफर जन्माला आला. फुलं, झाडं, किडे-मकोडे, निसर्ग इतकंच काय भिकारी, रस्त्यावरील वाहतुक, प्राणी, पक्षी अश्या अनेक चित्र-विचीत्र गोष्टींचे फोटो निघु लागले आणि सौदर्याचे एक वेगळेच दालन सर्वांसाठी उघडले गेले.

डिजीटल एस.एल.आर ने तर क्रांतीच घडवुन आणली. खुद्द डोळ्यांनी सुध्दा जी गोष्ट सुंदर दिसु शकत नाही तितके सौदर्य ह्या कॅमेराने प्रत्येक गोष्टीला बहाल केले. केवळ फोटोग्राफीचा छंद म्हणुन कॅमेरा आणि त्याला लागणारे फिल्टर्स, लेन्स ह्यासाठी लाखो रुपायांवर हसत हसत पाणी सोडणारे कित्तेकजण आजुबाजुला दिसतील. नुसता पैसाच नाही तर त्यासाठी लागणारी चिकाटी, संयम सुध्दा वाखाणण्यासारखा आहे. काही दिवसांपुर्वीच एका वृत्तपत्रामध्ये एका प्रसिध्द छायाचित्रकाराने काढलेला दोन सिहिणींचा फोटो आला होता. हा फोटो मिळवण्यासाठी तो म्हणे २७० तास एका जागी खिळुन होता.

अर्थात ही झाली व्यावसायीक बाजु. परंतु केवळ छंद म्हणुन सुध्दा अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. सिंहगडावर जाणारी नेहमीची वाट सोडुन गडावर नं जाता गडाच्या थोडे खाली जाळीमध्ये, पाणवठ्याच्या ठिकाणी गेलात तर पक्ष्यांची छायाचित्र टिपण्यासाठी तासंतास एका जागी चिकटुन बसलेले अनेक हौशी छायाचित्रकार दृष्टीस पडतील. 

Saturday, 15 April 2017

छत्रपति_शिवरायांचे_तख्त

#
मुजरा राजं
करवीर छत्रपतींच्या जुन्या राजवाड्यामध्ये छत्रपतींच्या देवघरालगतच एक तख्त ठेवलेले आहे. त्या तख्तावर भगवे वस्त्र अंथरलेले असून त्यावर शिवरायांची तसबीर ठेवलेली आहे. राजवाड्यास भेट देणाऱ्या अनेक पर्यटकांच्या मनात हा प्रश्न येतो की, हे तख्त कुणाचे असावे ? तर, हे तख्त खुद्द छत्रपति शिवरायांच्या दैनंदिन वापरातील तख्त आहे. गेली साडेतीनशे वर्षांपासून छत्रपति घराण्याने हे तख्त जपून ठेवलेले आहे.

कोल्हापूरास राजधानी स्थापन झाल्यानंतर छत्रपति शिवाजी महाराज दुसरे यांनी १७८८ साली हे तख्त पन्हाळगडावरुन कोल्हापुरास आणले व आपल्या राजवाड्यामध्ये तख्ताची स्थापना केली. पण अनेकांस असा प्रश्न पडतो की, स्वराज्याची राजधानी सुरुवातीस राजगड व त्यानंतर रायगडावर होती, तर शिवरायांचे तख्त पन्हाळगडावर कसे ? तर, कोल्हापूरच्या राजवाड्यातील शिवरायांचे हे तख्त म्हणजे महाराजांचे 'सिंहासन' नसून, महाराजांच्या दैनंदिन वापरातील 'आसन' होते. शिवकाळात स्वराज्यात असणाऱ्या प्रत्येक गडावर एक तख्त ठेवलेले असायचे. महाराज गडावर आले की फक्त महाराजच या तख्तावर बसायचे. हे तख्तही याच पद्धतीचे असून पन्हाळगडास सिद्दी जौहरचा वेढा पडला असताना महाराज गडावर होते, तेव्हा महाराज याच तख्तावर बसत असत. आपल्या आयुष्यातील सलग सर्वाधिक काळ महाराजांनी पन्हाळगडावर व्यतीत केला, ते याच तख्तावर विराजमान असत, यामुळे महाराजांच्या या तख्तास ऐतिहासिक व भावनिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे.

किल्ले पन्हाळगडावर करवीर राज्याची स्थापना केल्यानंतर ताराऊंनी आपले सुपुत्र छत्रपति शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला पण हे तख्त खुद्द थोरल्या महाराजांचे असल्याने तख्ताचा आदर राखण्यासाठी शिवरायांनंतर कोणतेही छत्रपति या तख्तावर बसले नाहीत, उलट छत्रपतींनी या तख्तास मुजरा करण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. आजही कोल्हापूरचे छत्रपति शिवरायांच्या या तख्तास मुजरा करतात. पन्हाळगडावरील हे तख्त शिवरायांचेच असल्याने महाराणी ताराराणींसाठी हे तख्त पूजनीय होते. म्हणूनच त्यांनी या तख्ताचा मान राखण्यासाठी विशेष दंडक घालून दिलेला आहे.

काही अभ्यासक अशी शक्यता वर्तवतात, कि छत्रपतींच्या गादीवर शिवरायांनंतर "शिवाजी" या नावाचे एकूण चार छत्रपति झाले, त्यामुळे हे तख्त थोरल्या शिवाजी महाराजांचे नसून नंतरील एखाद्या शिवाजी महाराजांचे असावे. याविषयी थोडासा जरी अभ्यास केला तर असे लक्षात येते की, शिवरायांनंतर गादीवर आलेले "शिवाजी" म्हणजे राजारामपुत्र शिवछत्रपति होय. पण या शिवछत्रपतिंना कैद करुन राजारामपुत्र दुसरे संभाजी गादीवर आले. संभाजीराजेंनी ज्यांना कैद केले, त्यांच्याच तख्ताची ते पूजा अथवा त्यास मुजरा करतील, हे शक्य नाही. त्यामुळे हे तख्त राजारामपुत्र शिवाजी महाराजांचे असावे, हि शक्यता फोल ठरते.

यानंतर संभाजीराजेंच्या पुत्राचे नावही शिवाजीच होते, पण हे तेच शिवाजी महाराज ज्यांनी १७८८ साली हे तख्त पन्हाळगडावरुन कोल्हापूरास आणले व राजवाड्यामध्ये स्थापित केले. ते या तख्तावर बसत नसायचे, त्यामुळे हे तख्त या शिवाजी महाराजांचेही नव्हे. याच शिवाजी महाराजांनी शिवरायांचे तख्त कोल्हापूरास आणले असल्यामुळे यानंतरच्या दोन शिवाजी महाराजांपैकी एकाचे हे तख्त असण्याची शक्यताच उरत नाही.
शिवरायांचे हे तख्त अत्यंत साध्या पद्धतीचे असून लाकडी आहे. कोल्हापूरच्या छत्रपतिंना एखादे तख्त पूजायचेच असते, तर त्यांचेकडे असणाऱ्या सोन्याच्या तख्ताची त्यांनी पूजा केली असती. पण सुवर्णसिंहासनावर बसणारे कोल्हापूरचे छत्रपति लाकडी तख्तास मुजरा करतात, त्यापुढे नतमस्तक होतात, त्याअर्थी हे तख्त साधेसुधे नसून खुद्द शककर्ते शिवछत्रपति महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेले तख्त आहे, हे सिद्ध होते.

तसेच कोल्हापूरचे छत्रपति शहाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स.मा. गर्गे यांनी लिहिलेल्या "करवीर रियासत" या ऐतिहासिक ग्रंथामध्येदेखील हे तख्त शिवरायांचे असल्याबाबतची विशेष नोंद आहे.

कोल्हापूरच्या छत्रपति घराण्यामध्ये अनेक प्रथा परंपरा पूर्वापार चालत आलेल्या आहेत. शिवरायांच्या वापरातील अनेक ऐतिहासिक मौल्यवान वस्तू कोल्हापूरच्या छत्रपतींनी जपून ठेवलेल्या आहेत. जुन्या राजवाड्यातील शिवरायांचे तख्तही यांपैकीच एक आहे. शककर्ते शिवछत्रपति महाराजांचे हे तख्त फक्त छत्रपति घराण्यासाठीच नव्हे तर आपणा सर्वांसाठी वंदनीय आहे.

#करवीर_राज्य

Friday, 14 April 2017

ग्रामदैवत

ग्रामदैवत श्री सिध्दनाथ मंदिर
म्हसवड ता.मान जि. सातारा

Monday, 10 April 2017

#हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा#

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान |
एक मुखाने बोला,बोला जय जय हनुमान
दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया |
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया |
हादरली ही धरणी, थरथरले आसमान ||१||
लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण |
द्रोणागिरी साठी राया केले तू उड्डाण |
तळ हातावर आला घेऊनी पंचप्राण ||२||
सीतामाई शोधा साठी गाठलीस लंका |
तिथे राम नामाचा तू वाजविला डंका |
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण ||३||
हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला |
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला |
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान ||४||
आले किती, गेले किती, संपले भरारा |
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा |
धावत ये लवकरी, आम्ही झालो रे हैराण ||५||
धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा |
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा |
घे बोलावूनआता कंठाशी आले प्राण ||६||

पवणपुञ हनुमान की जय.......
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Friday, 7 April 2017

चंदेरी


२३००फुट
मुंबई-पुणे लोहमार्गावरून कल्याणहुन कर्जतकडे जातांना एक डोंगररांग आहे. त्यातून आपला भलाथोरला माथा उंचावलेआ एक प्रचंड सुळका दिसतो. त्याचे नाव चंदेरी.
बदलापूर-वांगणी स्थानकादरम्यान बदलापूर-कर्जत रस्त्यावर गोरेगाव नावाचे गाव आहे. येथूनच चंदेरीची वाट आहे.
चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड आव्हान आहे.
तामसाई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणार्‍या गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे.

Sunday, 2 April 2017

3 एप्रिल

आज
हा दगडाचा सह्याद्री अश्रूंनी भिजला होता,
त्या दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ रायगडाने
टाहो फोडला होता........

१६८० साली आजच्याच दिवशी "शककर्ते
छत्रपती शिवराय" यांचे रायगडावर
महानिर्वाण झाले. या सह्याद्रीचा सिंह
चीरनिद्रेत गेला.

पण शिवराय आम्हाला सोडून
गेले नाहीत, ते अजूनही आमच्या रक्ताच्या प्रत्येक
थेंबात जिवंत आहेत आणि हा चंद्र,सूर्य असे तोवर
राहतील..

शककर्ते छत्रपती शिवराय
यांना त्यांच्या महानिर्वानादिनी

या छोट्याश्या शिवभक्ताकडून मनाचा मुजरा...
राज्ज तुम्ही आहात माझ्या नसा-नसात,
या धमन्यात वाहणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक
थेंबा-थेंबात.....

ll करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात
आहेत झुंजणारे अजून काही ll
ll विझून माझी चिता युगे
लोटली तरीही विझायचे राहिले निखारे अजून
काही ll

🚩🚩छत्रपतींच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन 💐🙏🚩🚩

आज 3 एप्रिल 2017 म्हणजे अवघ्या महाराष्ट्र राज्य चं परम दैवतं


               'सर्वजन प्रतिपालक, कुळवाडीभुषण , अद्वितीय , रणधुरं ,युद्धकुशल रणनितीकार ,सर्वधर्मसमभाव पालन कर्ते ,परम मातृ व पितृ भक्त आणी शत्रुने सुद्धा स्तुती करावी असा जगाच्या पाठीवरील एकमेव अद्वितीय राजा
                    श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुण्यानुमोदन दिवस.आजच्या दिवशी 3 एप्रिल1680  या दिवशी रायगडावर  महाराज  कालकथित झाले.महाराज देहाने जरी आज आमच्यात नसले तरी त्यांच्या  कार्याने ते अमर आहेत. यावत् चंद्रदिवाकरौ ते अमर राहतील यात शंका नाही .आज महाराजांच्या पुण्यतिथी  दिन महाराजांना  मानाचा त्रिवार मुजरा .!!
              
                   !! छत्रपती शिवाजी महाराज  की जय  !!