! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 14 April 2017

ग्रामदैवत

ग्रामदैवत श्री सिध्दनाथ मंदिर
म्हसवड ता.मान जि. सातारा

Monday, 10 April 2017

#हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा#

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान |
एक मुखाने बोला,बोला जय जय हनुमान
दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया |
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया |
हादरली ही धरणी, थरथरले आसमान ||१||
लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण |
द्रोणागिरी साठी राया केले तू उड्डाण |
तळ हातावर आला घेऊनी पंचप्राण ||२||
सीतामाई शोधा साठी गाठलीस लंका |
तिथे राम नामाचा तू वाजविला डंका |
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण ||३||
हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला |
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला |
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान ||४||
आले किती, गेले किती, संपले भरारा |
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा |
धावत ये लवकरी, आम्ही झालो रे हैराण ||५||
धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा |
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा |
घे बोलावूनआता कंठाशी आले प्राण ||६||

पवणपुञ हनुमान की जय.......
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Friday, 7 April 2017

चंदेरी


२३००फुट
मुंबई-पुणे लोहमार्गावरून कल्याणहुन कर्जतकडे जातांना एक डोंगररांग आहे. त्यातून आपला भलाथोरला माथा उंचावलेआ एक प्रचंड सुळका दिसतो. त्याचे नाव चंदेरी.
बदलापूर-वांगणी स्थानकादरम्यान बदलापूर-कर्जत रस्त्यावर गोरेगाव नावाचे गाव आहे. येथूनच चंदेरीची वाट आहे.
चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड आव्हान आहे.
तामसाई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणार्‍या गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे.

Sunday, 2 April 2017

3 एप्रिल

आज
हा दगडाचा सह्याद्री अश्रूंनी भिजला होता,
त्या दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ रायगडाने
टाहो फोडला होता........

१६८० साली आजच्याच दिवशी "शककर्ते
छत्रपती शिवराय" यांचे रायगडावर
महानिर्वाण झाले. या सह्याद्रीचा सिंह
चीरनिद्रेत गेला.

पण शिवराय आम्हाला सोडून
गेले नाहीत, ते अजूनही आमच्या रक्ताच्या प्रत्येक
थेंबात जिवंत आहेत आणि हा चंद्र,सूर्य असे तोवर
राहतील..

शककर्ते छत्रपती शिवराय
यांना त्यांच्या महानिर्वानादिनी

या छोट्याश्या शिवभक्ताकडून मनाचा मुजरा...
राज्ज तुम्ही आहात माझ्या नसा-नसात,
या धमन्यात वाहणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक
थेंबा-थेंबात.....

ll करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात
आहेत झुंजणारे अजून काही ll
ll विझून माझी चिता युगे
लोटली तरीही विझायचे राहिले निखारे अजून
काही ll

🚩🚩छत्रपतींच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन 💐🙏🚩🚩

आज 3 एप्रिल 2017 म्हणजे अवघ्या महाराष्ट्र राज्य चं परम दैवतं


               'सर्वजन प्रतिपालक, कुळवाडीभुषण , अद्वितीय , रणधुरं ,युद्धकुशल रणनितीकार ,सर्वधर्मसमभाव पालन कर्ते ,परम मातृ व पितृ भक्त आणी शत्रुने सुद्धा स्तुती करावी असा जगाच्या पाठीवरील एकमेव अद्वितीय राजा
                    श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुण्यानुमोदन दिवस.आजच्या दिवशी 3 एप्रिल1680  या दिवशी रायगडावर  महाराज  कालकथित झाले.महाराज देहाने जरी आज आमच्यात नसले तरी त्यांच्या  कार्याने ते अमर आहेत. यावत् चंद्रदिवाकरौ ते अमर राहतील यात शंका नाही .आज महाराजांच्या पुण्यतिथी  दिन महाराजांना  मानाचा त्रिवार मुजरा .!!
              
                   !! छत्रपती शिवाजी महाराज  की जय  !!

Tuesday, 28 March 2017

भेटा माझ्या मात्रभूमीला...👌👌👍👍

अनेक गढकिल्ले फिरल्या नंतर आता मात्र वेळ ..
होती ती मात्र गावच्या मातीची ..
म्हणूनच स्वराज्याची गुढी ही माझ्या..
गावातीलच जहागिरदार गढीतच गुढी ..
ऊभा केली मला या ठिकाणाला चांगला..
दर्जा मिळावा यासाठी मला प्रयत्न करायला
आवडेल..
.
.
वादळ

Monday, 27 March 2017

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा...👌👍

मराठी वर्षाचा आज शेवटचा  दिवस राहिला आहे..... धन्यवाद ....  असाच सहवास तुमचा  आयुष्यभर लाभो...   चुकून जर मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा...... ज्यांच्यामुळे माझं हे संपूर्ण वर्ष हसतखेळत आनंदात गेलं त्यांचे मी आभार मानलेच पाहिजेत.  त्यामध्ये तुम्हीही आहात. तुमचे मनःपुर्वक आभार!  . पुढील वर्षी आपला असाच आनंददायी सहवास लाभो .. दिनांक  २८/३/१७ पासून सुरू होणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा 💐🙏