! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 2 April 2017

3 एप्रिल

आज
हा दगडाचा सह्याद्री अश्रूंनी भिजला होता,
त्या दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ रायगडाने
टाहो फोडला होता........

१६८० साली आजच्याच दिवशी "शककर्ते
छत्रपती शिवराय" यांचे रायगडावर
महानिर्वाण झाले. या सह्याद्रीचा सिंह
चीरनिद्रेत गेला.

पण शिवराय आम्हाला सोडून
गेले नाहीत, ते अजूनही आमच्या रक्ताच्या प्रत्येक
थेंबात जिवंत आहेत आणि हा चंद्र,सूर्य असे तोवर
राहतील..

शककर्ते छत्रपती शिवराय
यांना त्यांच्या महानिर्वानादिनी

या छोट्याश्या शिवभक्ताकडून मनाचा मुजरा...
राज्ज तुम्ही आहात माझ्या नसा-नसात,
या धमन्यात वाहणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक
थेंबा-थेंबात.....

ll करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात
आहेत झुंजणारे अजून काही ll
ll विझून माझी चिता युगे
लोटली तरीही विझायचे राहिले निखारे अजून
काही ll

🚩🚩छत्रपतींच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन 💐🙏🚩🚩

आज 3 एप्रिल 2017 म्हणजे अवघ्या महाराष्ट्र राज्य चं परम दैवतं


               'सर्वजन प्रतिपालक, कुळवाडीभुषण , अद्वितीय , रणधुरं ,युद्धकुशल रणनितीकार ,सर्वधर्मसमभाव पालन कर्ते ,परम मातृ व पितृ भक्त आणी शत्रुने सुद्धा स्तुती करावी असा जगाच्या पाठीवरील एकमेव अद्वितीय राजा
                    श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुण्यानुमोदन दिवस.आजच्या दिवशी 3 एप्रिल1680  या दिवशी रायगडावर  महाराज  कालकथित झाले.महाराज देहाने जरी आज आमच्यात नसले तरी त्यांच्या  कार्याने ते अमर आहेत. यावत् चंद्रदिवाकरौ ते अमर राहतील यात शंका नाही .आज महाराजांच्या पुण्यतिथी  दिन महाराजांना  मानाचा त्रिवार मुजरा .!!
              
                   !! छत्रपती शिवाजी महाराज  की जय  !!

Tuesday, 28 March 2017

भेटा माझ्या मात्रभूमीला...👌👌👍👍

अनेक गढकिल्ले फिरल्या नंतर आता मात्र वेळ ..
होती ती मात्र गावच्या मातीची ..
म्हणूनच स्वराज्याची गुढी ही माझ्या..
गावातीलच जहागिरदार गढीतच गुढी ..
ऊभा केली मला या ठिकाणाला चांगला..
दर्जा मिळावा यासाठी मला प्रयत्न करायला
आवडेल..
.
.
वादळ

Monday, 27 March 2017

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा...👌👍

मराठी वर्षाचा आज शेवटचा  दिवस राहिला आहे..... धन्यवाद ....  असाच सहवास तुमचा  आयुष्यभर लाभो...   चुकून जर मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा...... ज्यांच्यामुळे माझं हे संपूर्ण वर्ष हसतखेळत आनंदात गेलं त्यांचे मी आभार मानलेच पाहिजेत.  त्यामध्ये तुम्हीही आहात. तुमचे मनःपुर्वक आभार!  . पुढील वर्षी आपला असाच आनंददायी सहवास लाभो .. दिनांक  २८/३/१७ पासून सुरू होणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा 💐🙏

Monday, 20 March 2017

छ्त्रपती शिवाजी महाराजांच ओरिजनल छायाचित्र

छ्त्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या समोर बसून काढलेले चित्र आहे. त्यावर खुद्द महाराजांची स्वाक्षरी आहे.

हे चीत्र मॉस्को येथील म्युझियम मध्ये आहे.

Wednesday, 15 March 2017

कोपेश्वर मंदिर

हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे.
#KopeshwarTemple #FaktaMarathi

Monday, 27 February 2017

शिवछत्रपतिंच्या नाण्यांबद्द्ल प्राथमिक माहीती..........

       ६ जुन १६७४, जेष्ठ शुद्ध त्रियोदशी, शनिवार ये दिवशी शिवाजी महाराज “सिंहासनाधीश्वर” झाले. रायगडावर आनंदी-आनंद झाला होता,आज एक “मराठा राजा” सिंहासनाधीष्टीत नृपती झाला होता. सभासदाच्या तोंडून पडलेले ते उद्गार या सर्वाची साक्ष देउन जातात, सभासद म्हणतो “ये पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा येवढा मर्हाटा पातशाहा “छत्रपति” जाहला ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही” यांचे वरील वर्णन महाराजांच्या दैदिप्यमान, अतुलनीय अशा राज्याभिषेक सोहळ्याची यथोचित माहिती देते….
      या दिवशी राज्याभिषेक सोहळ्याला “हेन्री आक्झिंडेन” नावाचा इंग्रज अधिकारी देखिल उपस्थित होता,त्या दिवशी त्याने शिवाजी महाराजांना विविध २० मागन्या केल्या होत्या, त्यातील एक मागनी होती की “इंग्रजी चलन स्वराज्यात चालु द्यावं”, त्या २० मागन्यांपैकी महाराजांनी १९ मागन्या मान्य करुन एक मागनी मात्र अमान्य केली ती म्हणजे “इंग्रजी चलन स्वराज्यात चालु द्यावं”,त्याला प्रतीउत्तर म्हणून महाराजांनी त्यांना सांगीतलं कि “इंग्रजी शिक्क्याचे रुपये वा पैसे वा मोरा या मुलुकात चालणार नाहीत !!!”……………..

इ.स.१६७४ पासुन शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं स्वचलन सुरु केलं असावं,ज्याला आपणं “शिवराई” म्हणतो तांब्याच्या शिवराई बरोबरचं महाराजांनी सोन्याचे “होणं” देखिल सुरु केले,तद्वत त्यांनी मोगली वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारुन देवनागरी लिपीत   पाडलेली स्वतःची “नाणी” ही एक दुरगामी व क्रांतीकारी घटना होती. बिंदुमय वर्तुळात एका बाजुला तिन ओळीत “श्री राजा शिव” व दुसर्या बाजुस दोन ओळीत “छत्रपत्ती” असे महाराजांच्या नाण्याचे सर्वसाधारण स्वरुप होते.तांब्याच्या या शिवराई पैशाचे वजन साधारणतः १२ ते १४ ग्रॅम इतके असते.शिवाजी महाराजांना आपल्या हिंदु धर्माचा रास्त अभिमान होता असे यावरून दिसते. तसेच मोगलांप्रमाणे सोन्याच्या मोहोरा न पाडता विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या धर्तीवर सोन्याचे २.७२८ ग्रॅम वजनाचे होन पाडले.त्यावरही शिवराई प्रमाणे बिंदुमय वर्तुळात एका बाजुला तिन ओळीत “श्री राजा शिव” व दुसर्या बाजुस दोन ओळीत “छत्रपत्ती” असे लिहीलेले असे.