छ्त्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या समोर बसून काढलेले चित्र आहे. त्यावर खुद्द महाराजांची स्वाक्षरी आहे.
हे चीत्र मॉस्को येथील म्युझियम मध्ये आहे.
छ्त्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या समोर बसून काढलेले चित्र आहे. त्यावर खुद्द महाराजांची स्वाक्षरी आहे.
हे चीत्र मॉस्को येथील म्युझियम मध्ये आहे.
हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे.
#KopeshwarTemple #FaktaMarathi
६ जुन १६७४, जेष्ठ शुद्ध त्रियोदशी, शनिवार ये दिवशी शिवाजी महाराज “सिंहासनाधीश्वर” झाले. रायगडावर आनंदी-आनंद झाला होता,आज एक “मराठा राजा” सिंहासनाधीष्टीत नृपती झाला होता. सभासदाच्या तोंडून पडलेले ते उद्गार या सर्वाची साक्ष देउन जातात, सभासद म्हणतो “ये पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा येवढा मर्हाटा पातशाहा “छत्रपति” जाहला ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही” यांचे वरील वर्णन महाराजांच्या दैदिप्यमान, अतुलनीय अशा राज्याभिषेक सोहळ्याची यथोचित माहिती देते….
या दिवशी राज्याभिषेक सोहळ्याला “हेन्री आक्झिंडेन” नावाचा इंग्रज अधिकारी देखिल उपस्थित होता,त्या दिवशी त्याने शिवाजी महाराजांना विविध २० मागन्या केल्या होत्या, त्यातील एक मागनी होती की “इंग्रजी चलन स्वराज्यात चालु द्यावं”, त्या २० मागन्यांपैकी महाराजांनी १९ मागन्या मान्य करुन एक मागनी मात्र अमान्य केली ती म्हणजे “इंग्रजी चलन स्वराज्यात चालु द्यावं”,त्याला प्रतीउत्तर म्हणून महाराजांनी त्यांना सांगीतलं कि “इंग्रजी शिक्क्याचे रुपये वा पैसे वा मोरा या मुलुकात चालणार नाहीत !!!”……………..
इ.स.१६७४ पासुन शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं स्वचलन सुरु केलं असावं,ज्याला आपणं “शिवराई” म्हणतो तांब्याच्या शिवराई बरोबरचं महाराजांनी सोन्याचे “होणं” देखिल सुरु केले,तद्वत त्यांनी मोगली वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारुन देवनागरी लिपीत पाडलेली स्वतःची “नाणी” ही एक दुरगामी व क्रांतीकारी घटना होती. बिंदुमय वर्तुळात एका बाजुला तिन ओळीत “श्री राजा शिव” व दुसर्या बाजुस दोन ओळीत “छत्रपत्ती” असे महाराजांच्या नाण्याचे सर्वसाधारण स्वरुप होते.तांब्याच्या या शिवराई पैशाचे वजन साधारणतः १२ ते १४ ग्रॅम इतके असते.शिवाजी महाराजांना आपल्या हिंदु धर्माचा रास्त अभिमान होता असे यावरून दिसते. तसेच मोगलांप्रमाणे सोन्याच्या मोहोरा न पाडता विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या धर्तीवर सोन्याचे २.७२८ ग्रॅम वजनाचे होन पाडले.त्यावरही शिवराई प्रमाणे बिंदुमय वर्तुळात एका बाजुला तिन ओळीत “श्री राजा शिव” व दुसर्या बाजुस दोन ओळीत “छत्रपत्ती” असे लिहीलेले असे.
💐💐दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि …
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!💐💐💐
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
🚩
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
किल्ल्याचा प्रकार - जलदुर्ग श्रेणी - सोपी
जिल्हा - सिंधुदूर्ग
सागरी प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी छ. शिवाजी महाराजांना जलदुर्ग उभारण्याची निकड जाणवू लागली. यासाठी त्यांनी मालवण शेजारील "कुरटे' बेटाची निवड केली. महाराजांच्या आज्ञेनुसार हिरोजी इंदुलकरांच्या नेतृत्वाखाली हजारो मजूरांनी सलग 3 वर्षे मेहनत घेऊन सिंधुदर्गची निर्मिती केली. याकामी सुमारे एक कोटी होन खर्ची पडले.( १ होन = ४ रू.)
इतिहास -
सिंधुदुर्गच्या उभारणीस 25 नोव्हेंबर 1664 रोजी सुरवात झाली. सलग 3 वर्षे हे काम चालू होते. सिंधुदुर्ग हा 48 एकर परसलेला आहे आणि तटबंदी 2 मैल (3 कि.मी.) आहे. सिंधुदुर्गच्या तटाच्या भिंतीची उंची सुमारे 30 फूट (9.1 मी) तर रुंदी 12 फूट (3.7 मी) आहे. सागरी लाटांपासून तसेच परकीय आक्रमणापासून संरक्षणासाठी या प्रचंड भिंती उभारलेल्या आहेत. छ. शिवाजी महाराजांच्या तसेच छ. संभाजीराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्यावर हल्ला करण्याचे धाडस कोणीही दाखविले नाही.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
होडीतून किल्ल्यामध्ये पायउतार झाल्यावर महाद्वारातून आत प्रवेश करावा. किल्ल्याचे प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर दगडी पायऱ्यांनी नगारखान्यात प्रवेश करता येतो. नगारखान्याच्या डाव्या बाजूला दोन घुमट्या आढळतात. किल्ल्याचे बांधकाम चालू असताना त्याच्यी पाहणी करण्यासाठी महाराज आले होते. त्यावेळी चुन्याच्या ओल्या गिलव्यावरून महाराज चालत गेले. महाराजांच्या डाव्या पायाच्या व उजव्या हाताचा ठसा तेथे उमटला. आज त्या जागेवर घुमट्या बांधून त्याचे जतन केले आहे. इथून पुढे गडाच्या तटफेरीला सुरवात करावी, भल्यामोठ्या बुरूजांचे व नागमोडी तटबंदीचे निरीक्षण करीत चालत रहावे. किल्ल्यावर एकूण 42 बुरूज आहेत. तटामध्ये पहारेऱ्यांसाठी असणारे शौचकप आहेत. एका बुरूजाच्या बाजूने बाहेर समुद्राकडे जाण्यासाठी दरवाज आहे. तथील पळण आपले लक्ष वेधून घेते, याला "राणीच्या वेळा' असे म्हणतात. राणी जलक्रीडा करण्यासाठी याचा वापर करीत. तटफेरी पूर्ण करून शिवराजेश्वर मंदिराकडे चालू लागायचं. शिवराजेश्वर मंदिर हे राजाराम महाराजांनी बांधलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणात कोरलेली शिवछत्रपतींची मूर्ती आहे. दररोज भल्या पहाटे मुर्तीला अभिषेक घातला जातो. त्यानंतर चांदीचा मुखवटा, जिरेटोप आणि वस्त्रे चढविली जातात. समोर एक तलवार ठेवण्यात येते. महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदीर आहे. पुढे महादेवाचे मंदीर आहे. पुढे भवानी मातेचे मंदीर लागते. गडावर दहीबाव, साखरबाव, दुधबाव अशा नावांच्या विहीरी आढळतात. वाड्याचे पडके अवशेष पाहत निशाणकाठी बुरूजावर यावे, तेथून गडाची तटबंदी तसेच गडाचा विस्तृत प्रदेश नजरेस पडतो.
संपूर्ण गड पाहण्यास 2-3 तास लागतात.
✌नव्हते संविंधान , नव्हते आरक्षण , नव्हता कायदा , नव्हते संरक्षण नव्हते आमदार नव्हते खासदार .
तरी आत्ता पेक्षा दहा पटीने सुखी होती माझी प्रजा कारण राज्य करत होता
🚩 *शिवाजी राजा*🚩
🙏🏻 सर्वांना शिवजयंतीच्या भरभरून शुभेच्छा
*माझ्या तमाम शिवभक्तांना ⛳महाराष्ट्राचे आराध्य दैवत⛳ 🐅छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या भगव्या शुभेच्छा*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏