पाकिस्तान व अफगाणिस्तान च्या सीमेवरील हाच तो अटक चा किल्ला जिथे मराठ्यांनी भगवा फडकवला होता. म्हणुन " अटकेपार झेंडे लावणे " ही म्हण पडली.
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !
Friday, 4 November 2016
Tuesday, 1 November 2016
---|| बहिण माझी... ||---
---|| बहिण माझी... ||---
मायेची छाया
प्रेमळ काया
सर्वांची लाडकी
बहिण माझी..........
निर्मळ मनाची
सुंदर स्वभावाची
आपुलकीने वागते
बहिण माझी.........
आई-बाबांची काळजी
भावंडांची चिंता
मनी धरून जगते
बहिण माझी.........
सर्वांची लाडकी
आनंदी सावली
माझ्या हृदयी राहिली
बहिण माझी................
Friday, 28 October 2016
ठोसेघर धबधबा
ठोसेघर धबधबा
साताऱ्याची तुलना कोणाशी करायची झाल्यास ती फक्त साताऱ्याशीच होऊ शकते
ठोसेघर धबधबा ! सातारा , thoseghar waterfall ! satara
'ठोसेघर' चा धबधबा तसा साता-याशी निगडीत सर्व लोकांना नक्कीच ठाऊक असेल.
सर्व सातारकरांना विनंती कि फोटो share करून साऱ्या जगाला दाखवा
आणि सातारा पर्यटन वाढीस चालना द्या …
सातारा शहरापासून तासाभराच्या अंतरावर हा धबधबा आहे.
पावसाळ्यामध्ये या धबधब्याला भेट म्हणजे एक सुखद रोमांचकारक अनुभव आहे.
विविध भागातून पर्यटक इथे भेट देतात व धबधब्याचा आनंद मनमुराद लुटतात.
'धबाबा आदळे तोय' या समर्थ रामदास स्वामींच्या पक्तींचा अनुभव
रामदासस्वामींच्याच सज्जनगडापासून जवळ असणाऱ्या ठोसेघर धबधबा पाहणाऱ्या पर्यटकांना येणार आहे
पावसाळा सुरू झाला की ठोसेघरचा प्रसिद्ध धबधबा पर्यटकांना जणू मोहिनी घालतो.
म्हणूनच यंदा ठोसेघर ग्रामपंचातीने पर्यटकांच्या स्वागतासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
धबधब्याचा जलप्रपात पाहण्यासाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना गुलाबपुष्प देऊन
झुणका-भाकरची मऱ्हाटमोळी झणझणीत मेजवानी दिली जाणार आहे.
भारतीय सैनिकांना समर्पित दिपोत्सव..
सीमेवर ते लढले म्हणून
गावात आपल्या दिवाळी आली आहे....
पणती त्यांच्या घरातली
विझवूनआपल्या घरी दिवाळी आली आहे...
तुमच्या आनंदाबरोबर दुःख त्यांचे असू द्या....
तुमच्या घरी एक पणती जवानांसाठी असू द्या
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या.............. जय हिंद
एक पणती माझ्या *स्वराज्याची*
एक पणती माझ्या *स्वराज्याची*
एक पणती माझ्या *राजमाता जिजाऊंची*
एक पणती *माझ्या धनी शिवरायांची*
एक पणती माझ्या *सर्जा शंभूरायाची*
एक पणती ह्या *मातीसाठी रक्त सांडलेल्या मावळ्याची*
एक पणती *अभेद्य बुलंद आमच्या गडकोटांची*
एक पणती *माझं स्वराज्य रक्षिलेल्या त्या प्रत्येक चिर्याची*
एक पणती *माझ्या राजा पुढं झुकलेल्या त्या सागरी लाटांची*
एक पणती *बाजीची, तानाची, जीवाची*
एक पणती *थोर भाग्यवंत त्या काशीद शिवाची*
एक पणती *त्या अफाट बेलाग सह्याद्रीची*
एक पणती *उरी दाटलेल्या अभिमानाची*
एक पणती *प्रेम वात्सल्य मायेची*
एक पणती *अभिमान, शौर्य, राष्ट्रप्रेमाची*
एक पणती *माझ्या स्वराज्याच्या थाटाची*
एक पणती *राजं तव चरणी माझ्या परिवाराची!!*
॥
*~दिवाळीच्या आपणांस खूप खूप हार्दिक शुभेच्छा*
Monday, 24 October 2016
स्वराज्य निर्माता...👌👌👌
स्वराज्य निर्माण करावे, स्वराज्य जनतेसाठी असावे
राजा जनतेचा असावा, आणि राजाची जनता असावी
जनतेच्या हक्कासाठी लढ म्हणणारा नसावा तर स्वतः तलवारीची धार तपापनारा असावा
राजा असावा माझ्या शिवबा सारखा.
Sunday, 23 October 2016
राजे...!!
🚩ना होते *कलम*
ना होता *कायदा*
तरीही
सुखी होती *प्रजा*
कारण
*सिहांसनावर* बसला होता माझा *राजा...*
🚩 *जय शिवराय*🚩
🚩 *जयस्तु मराठा*🚩