! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Tuesday, 1 November 2016

---|| बहिण माझी... ||---

---|| बहिण माझी... ||---

मायेची छाया
प्रेमळ काया
सर्वांची लाडकी
बहिण माझी..........

निर्मळ मनाची
सुंदर स्वभावाची
आपुलकीने वागते
बहिण माझी.........

आई-बाबांची काळजी
भावंडांची चिंता
मनी धरून जगते
बहिण माझी.........

सर्वांची लाडकी
आनंदी सावली
माझ्या हृदयी राहिली
बहिण माझी................

Friday, 28 October 2016

ठोसेघर धबधबा

ठोसेघर धबधबा

साताऱ्याची तुलना कोणाशी करायची झाल्यास ती फक्त साताऱ्याशीच होऊ शकते 
ठोसेघर धबधबा ! सातारा , thoseghar waterfall ! satara

'ठोसेघर' चा धबधबा तसा साता-याशी निगडीत सर्व लोकांना नक्कीच ठाऊक असेल.
सर्व सातारकरांना विनंती कि फोटो share करून साऱ्या जगाला दाखवा 
आणि सातारा पर्यटन वाढीस चालना द्या …

सातारा शहरापासून तासाभराच्या अंतरावर हा धबधबा आहे.
पावसाळ्यामध्ये या धबधब्याला भेट म्हणजे एक सुखद रोमांचकारक अनुभव आहे. 
विविध भागातून पर्यटक इथे भेट देतात व धबधब्याचा आनंद मनमुराद लुटतात.

'धबाबा आदळे तोय' या समर्थ रामदास स्वामींच्या पक्तींचा अनुभव 
रामदासस्वामींच्याच सज्जनगडापासून जवळ असणाऱ्या ठोसेघर धबधबा पाहणाऱ्या पर्यटकांना येणार आहे

पावसाळा सुरू झाला की ठोसेघरचा प्रसिद्ध धबधबा पर्यटकांना जणू मोहिनी घालतो. 
म्हणूनच यंदा ठोसेघर ग्रामपंचातीने पर्यटकांच्या स्वागतासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. 
धबधब्याचा जलप्रपात पाहण्यासाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना गुलाबपुष्प देऊन 
झुणका-भाकरची मऱ्हाटमोळी झणझणीत मेजवानी दिली जाणार आहे.

भारतीय सैनिकांना समर्पित दिपोत्सव..

सीमेवर ते लढले म्हणून
गावात आपल्या दिवाळी आली आहे....
पणती त्यांच्या घरातली
विझवूनआपल्या घरी दिवाळी आली आहे...
तुमच्या आनंदाबरोबर दुःख त्यांचे असू द्या....
तुमच्या घरी एक पणती जवानांसाठी असू द्या
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या.............. जय हिंद

एक पणती माझ्या *स्वराज्याची*

एक पणती माझ्या *स्वराज्याची*
एक पणती माझ्या *राजमाता जिजाऊंची*
एक पणती *माझ्या धनी शिवरायांची*
एक पणती माझ्या *सर्जा शंभूरायाची*
एक पणती ह्या *मातीसाठी रक्त सांडलेल्या मावळ्याची*
एक पणती *अभेद्य बुलंद आमच्या गडकोटांची*
एक पणती *माझं स्वराज्य रक्षिलेल्या त्या प्रत्येक चिर्याची*
एक पणती *माझ्या राजा पुढं झुकलेल्या त्या सागरी लाटांची*
एक पणती *बाजीची, तानाची, जीवाची*
एक पणती *थोर भाग्यवंत त्या काशीद शिवाची*
एक पणती *त्या अफाट बेलाग सह्याद्रीची*
एक पणती *उरी दाटलेल्या अभिमानाची*
एक पणती *प्रेम वात्सल्य मायेची*
एक पणती *अभिमान, शौर्य, राष्ट्रप्रेमाची*
एक पणती *माझ्या स्वराज्याच्या थाटाची*
एक पणती *राजं तव चरणी माझ्या परिवाराची!!*

*~दिवाळीच्या आपणांस खूप खूप हार्दिक शुभेच्छा*

Monday, 24 October 2016

स्वराज्य निर्माता...👌👌👌

स्वराज्य निर्माण करावे, स्वराज्य जनतेसाठी असावे
राजा जनतेचा असावा, आणि राजाची जनता असावी
जनतेच्या हक्कासाठी लढ म्हणणारा नसावा तर स्वतः तलवारीची धार तपापनारा असावा
राजा असावा माझ्या शिवबा सारखा.

Sunday, 23 October 2016

राजे...!!

🚩ना होते *कलम*
ना होता *कायदा*
तरीही
सुखी होती *प्रजा*
कारण
*सिहांसनावर* बसला होता माझा *राजा...*
🚩 *जय शिवराय*🚩
🚩 *जयस्तु मराठा*🚩

Friday, 21 October 2016

छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराविषयीचे धोरण

Indian navy.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराविषयीचे धोरण आज्ञापत्रात स्पष्ट दिसते. ‘ज्याचे आरमार त्याचा समुद्र’
हे त्यांनी पुरेपूर ओळखले होते.

आरमाराला साथ देण्याकरीता त्यांनी जलदुर्गांची एक शृंखलाच कोकण किनारपट्टीवर उभी केली. शिवकालीन नौका

1) संदेश वाहक होडी-
हा होडीचा सर्वात लहान प्रकार असून तो केवळ वल्हवता येत असे.यावर डोलकाठी नसत क्वचितच एखादे शिड असे. होड्या केवळ संदेश आणि पिण्याचे पाणी ने आण करण्याकरिता वापरल्या जात.

2) मचवा –
मचवा हे एक छोटे जहाज असून ते वल्हवता येत असे.त्यावर सुमार २५-४० सैनिक असत.हे जहाज त्वरेने हालचाल करत असे.ह्यावर शक्यतो तोफा नसत व केवळ छर्रे व ठासणीची बंदुके असणारी शिपायांची तुकडी असे. असलीच तर लहान पल्ल्याची व छोटे गोळे फेकणारी एक तोफ मचव्यावर असत व तोफ असताना सैनिकांची संख्या कमी असे.

3) शिबाड –
शिबाड हा मालवाहू जहाजाचा प्रकार आहे त्यावर तोफा बसवून ते युद्धासाठीही वापरता येत असे.यावर एक डोलकाठी व शिड असून हे जहाज वल्हवता येत नसे. ते केवळ वारयाच्या आधारे एकाच दिशेने चालत असे.

4) गुराब –
हे जहाज शिबाडापेक्षा मोठे असून त्यावर किमान २ व क्वचित ३ डोलकाठ्या असत व प्रत्येक डोलकाठीवर २ चौकोनी शिड असत व बऱ्याचदा एक लहान त्रिकोणी शिडही असे.ह्यामुळे ते विविध दिशांच्या वाऱ्याच उपयोग करून विविध दिशांना चालवता येत असे.गुराबेवर जहाजाच्या लाम्बीशी काटकोनात प्रत्येक बाजूने ५-७ तसेच नाळेवर समोरून व पिछाडीस एक तोफ असे.या तोफा माध्यम पल्ल्याच्या असून त्या ५-६ पौंड वजनाचे गोळे फेकू शकत. ह्यावर सुमार १००-१५० सैनिक असत.

जगाच्या पाठिवरचा सर्वात बुध्दिवान आणि काळाच्या पुढे एक पाऊल असणारा रयतेचा राजा

म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज…