! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 21 October 2016

नोबेल पारितोषिक

जनक :- आल्फ्रेड नोबेल, जगप्रसिद्ध वैज्ञानिक
स्थळ :- स्टॉकहोम - स्विडीश ,
जन्म :- १३ ऑक्टोबर १८३३,
मृत्यू :- १० डिसेंबर १८८६,

जगातील सर्वात प्रतिष्ठेचे मानले गेलेले नोबेल पारितोषिक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले जाते.

नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वत शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले.यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी आफ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरीस वडील बंधूचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर आल्फ्रेडने स्वतला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे डायनामाइटचा शोध लावला. डायनामाइटच्या शोधामुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले. यातून नोबेलने गडगंज संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वत: इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते.

त्यामुळेच त्यांनी मृत्यूपत्र लिहतांना नोबेल पारीतोषिकाची व्यवस्था केली. त्यांनी आपल्या उत्पादनाच्या ९४ टक्के रक्कम - दहा लाख स्विडीश क्रोनरचा निधी देऊन ट्रस्ट स्थापन केली या विविध पुरस्कारांसाठी राखून ठेवली. त्या कारणाने जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देण्याचे सुरू केले. हे पारितोषिक म्हणजेच नोबेल पारितोषिक होय.

नोबेल यांना विज्ञानाबरोबरच साहित्य, कला, शांतिकार्य या क्षेत्राचीही आवड होती. विविध क्षेत्रातील व्यक्तींचा योग्य बहुमान व्हावा असे त्यांना वाटे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १९०१ पासुन हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. शांतिकार्य, साहित्य, पदार्थविज्ञन, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र व अर्थशास्त्र ह्या विषयात संशोधन करणार्‍यांना नोबेल पुरस्कार दिले जातात.

Tuesday, 18 October 2016

महाबळेश्वर


हे एक अनेक निसर्गरम्य स्थानांपैकी असे एक निसर्ग रम्य ठिकाण आहे .तेथील घाट चढतांना आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसर पाहून मन कसे हरवून जाते .वळण -वळणांचे रस्ते व नागमोडी रस्ते हे अतिशय विलोभनीय असून पुढील रस्ते तर दाट झाडांनी कसे अगदी हिरवेगार वाटतात.मधेच एखादी दरी दिसली कि डोळे कसे घट्ट बंद करावे असे वाटते . महाबळेश्वरची खासियत म्हणजे मुंबई ठिकाण तेथून सूर्यास्ताची एक आगळीवेगळीशोभा  दिसते शिवाय  परतीच्या उतारावरची सुंदर हिरवळ जशी सूर्य सारखी कुणीतरी हिरवागार गालीचा पसरवला आहे .

Wednesday, 12 October 2016

सह्याद्री ...!!!

नभा नभातुनी 

दऱ्या खोऱ्यांतुनि   

गर्जितो माझा सह्याद्री ...!!

दिशा दिशांना 

साद घालूनी 

पुलकित होतो सह्याद्री ...!!!

    

मी निसंर्ग प्रेमी आहे अन सह्य वेडा हि..अन  म्हणूनच  सह्याद्रीत वारेमाप भटकताना मी स्वतः असा विरून जातो . प्रेरित इतिहासाची अन भौगोलिक दुनियाची सांगड घालत. 

तर कधी ह्या सृष्टी सौंदर्याने  नटाटलेल्या निसर्गाशी एकरूप होतं त्याच्याशी हितगुज करतं  ..

Tuesday, 11 October 2016

दसरा

"शिवछत्रपतीं"च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रभूमीत आपली  स्वप्नं साकार होण्यासाठी 'प्रयत्नांचे सीमोल्लंघन' होऊन आपल्या आयुष्यात सतत "विजयादशमी" साजरी व्हावी .याच खऱ्या दसऱ्याच्या शुभेच्छा . 😊🙏🏻

Monday, 10 October 2016

दसरा...!@@👌

दसरा....
या दिवशी म्हणे सोन वाटतात...
सर्वांना सोन वाटण्या एवढा मी श्रीमंत नाही...
पण नशीबानं मला जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली...
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच...
सदैव असेच राहा...
आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या......

तुम्हासर्वांना
आणि तुमच्या सह परिवाराला
दस-याच्या कोटी कोटी शुभेच्छा

  

Sunday, 9 October 2016

जिवाजी महाले'

*छञपतींचे जिवलग व निष्ठावंत अंगरक्षक शिलेदार 'जिवाजी महाले' यांच्या 381 व्या जयंतीनिमित्त हार्दिक अभिवादन!!!!!*

Thursday, 6 October 2016

ठोसेघर धबधबा

पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारा ठोसेघर धबधबादरवर्षी जून-जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या पावसामुळे उशिरा वाहतो. परंतु सन २०११ मध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे या धबधब्याचे तांडवनृत्य जरा लवकरच सुरू झाले होते. त्यामुळे त्यावर्षी उन्हाने हैराण झालेल्या पर्यटकांनी अंगावर रोमांच उभे करणाऱ्या धबधब्याचा जलौघ पाहण्यासाठी ठोसेघरकडे मोठ्या संख्येने धाव घेतली होती.

ठोसेघर धबधबा

हा धबधबा......नदीवर आहे. धबधब्याच्या जवळचे गांव ठोसेघर आहे. जाण्यासाठी रेल्वेने महाराष्ट्रातल्या सातारास्टेशनवर उतरून, बसने ठोसेघर गांवी पोहोचावे.