हे एक अनेक निसर्गरम्य स्थानांपैकी असे एक निसर्ग रम्य ठिकाण आहे .तेथील घाट चढतांना आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसर पाहून मन कसे हरवून जाते .वळण -वळणांचे रस्ते व नागमोडी रस्ते हे अतिशय विलोभनीय असून पुढील रस्ते तर दाट झाडांनी कसे अगदी हिरवेगार वाटतात.मधेच एखादी दरी दिसली कि डोळे कसे घट्ट बंद करावे असे वाटते . महाबळेश्वरची खासियत म्हणजे मुंबई ठिकाण तेथून सूर्यास्ताची एक आगळीवेगळीशोभा दिसते शिवाय परतीच्या उतारावरची सुंदर हिरवळ जशी सूर्य सारखी कुणीतरी हिरवागार गालीचा पसरवला आहे .
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !
Tuesday, 18 October 2016
महाबळेश्वर
Wednesday, 12 October 2016
सह्याद्री ...!!!
नभा नभातुनी
दऱ्या खोऱ्यांतुनि
गर्जितो माझा सह्याद्री ...!!
दिशा दिशांना
साद घालूनी
पुलकित होतो सह्याद्री ...!!!
मी निसंर्ग प्रेमी आहे अन सह्य वेडा हि..अन म्हणूनच सह्याद्रीत वारेमाप भटकताना मी स्वतः असा विरून जातो . प्रेरित इतिहासाची अन भौगोलिक दुनियाची सांगड घालत.
तर कधी ह्या सृष्टी सौंदर्याने नटाटलेल्या निसर्गाशी एकरूप होतं त्याच्याशी हितगुज करतं ..
Tuesday, 11 October 2016
दसरा
"शिवछत्रपतीं"च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रभूमीत आपली स्वप्नं साकार होण्यासाठी 'प्रयत्नांचे सीमोल्लंघन' होऊन आपल्या आयुष्यात सतत "विजयादशमी" साजरी व्हावी .याच खऱ्या दसऱ्याच्या शुभेच्छा . 😊🙏🏻
Monday, 10 October 2016
दसरा...!@@👌
दसरा....
या दिवशी म्हणे सोन वाटतात...
सर्वांना सोन वाटण्या एवढा मी श्रीमंत नाही...
पण नशीबानं मला जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली...
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच...
सदैव असेच राहा...
आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या......
तुम्हासर्वांना
आणि तुमच्या सह परिवाराला
दस-याच्या कोटी कोटी शुभेच्छा
Sunday, 9 October 2016
जिवाजी महाले'
*छञपतींचे जिवलग व निष्ठावंत अंगरक्षक शिलेदार 'जिवाजी महाले' यांच्या 381 व्या जयंतीनिमित्त हार्दिक अभिवादन!!!!!*
Thursday, 6 October 2016
ठोसेघर धबधबा
पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारा ठोसेघर धबधबादरवर्षी जून-जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या पावसामुळे उशिरा वाहतो. परंतु सन २०११ मध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे या धबधब्याचे तांडवनृत्य जरा लवकरच सुरू झाले होते. त्यामुळे त्यावर्षी उन्हाने हैराण झालेल्या पर्यटकांनी अंगावर रोमांच उभे करणाऱ्या धबधब्याचा जलौघ पाहण्यासाठी ठोसेघरकडे मोठ्या संख्येने धाव घेतली होती.
ठोसेघर धबधबा
हा धबधबा......नदीवर आहे. धबधब्याच्या जवळचे गांव ठोसेघर आहे. जाण्यासाठी रेल्वेने महाराष्ट्रातल्या सातारास्टेशनवर उतरून, बसने ठोसेघर गांवी पोहोचावे.
Tuesday, 4 October 2016
Ek maratha .
|| हातात तुझ्या पूर्वजांची राख मराठा ||
|| दिल्लीच्या तख्ताला तुझा धाक मराठा ||
||फोडुन डरकाळी जगाला सांग मराठा ||
|| एकटा नव्हे तु एक मराठा लाख मराठा ||