तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना
सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
🚩गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया🚩
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना
सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
🚩गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया🚩
माथ्यावर छत्र नाही, चरणावर फुल नाही कि दिव्याचा मिणमिणता उजेड नाही... मित्रानो हे कोणते ठिकाण आहे माहित आहे का...?
हे आहे छत्रपती शिवरायांच्या बरोबरीने रयतेसाठी हयातभर खस्ता खात रयतेच्या स्वराज्याची स्वप्न पाहणाऱ्या आई जिजाऊच्या लाडक्या स्नुषा, छत्रपती शिवरायांची प्रिय अर्धांगिनी, छत्रपती संभाजीराजे यांच्या वंदनीय मातोश्री व स्वराज्याच्या पहिल्या महाराणी सईबाईसाहेब महाराज यांची किल्ले राजगडावरती उघड्यावरती आहे
आज ज्या राज्यात न पावणाऱ्या देवाला सोन्याचे सिंहासन मिळते..हाती तलवार हि न धरलेल्या शेंबड्या वीरांची महाकाय स्मारके उभारली जातात..कुडमुड्या लेखक व कवींची स्मृतिस्थळे जोपासली जातात..भ्रष्टाचारने बरबटलेल्या नेत्यांच्या महाकाय समाध्या उभ्या केल्या जातात..औरंजेबाच्या व आफ्झुल्याच्या समाधीला पंचतारांकित सुविधा मिळतात..त्याच राज्यात आज छत्रपती शिवरायांना कायम स्फुर्तीस्थानी असलेल्या व छत्रपती संभाजी महाराज नावाच्या तुफानाला जन्म देणाऱ्या ह्या स्वराज्याचा आध्य महाराणींच्या समाधीला मात्र वनवासच लाभत आहे हे पाहून कुठल्याही मराठी माणसाच्या काळजाला भोके पडली पाहिजेत दुर्दैवाने पण तसे होताना मात्र दिसत नाही..ज्यांची पाऊले आपण वंदन केली पाहिजेत त्याच सईबाईसाहेबाची हि अवहेलना होत आहे ह्याहून आपल्या महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट कोणती असू शकते..?
आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी अखंड लक्ष्मी अलंकृत सखल सौभाग्यामंडीत महाराणीसरकार सईबाईसाहेब यांची 358 वी पुण्यतिथी त्यानिमित्त आपल्या मराठी माणसांना त्यांची एक आठवण...
नको तिथे लख्ख दिवे अन गरज तिथे काजवे. सरकार आपले खिसे भरण्यात मग्न आहे.
बुलढाणा बुलढाणा
पद्म व स्कंद पुराणात उल्लेख आहे असे हे सरोवर या जिल्ह्यात आहे. सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी उल्कापाताने तयार झालेल्या लोणार सरोवरामुळे बुलढाणा जिल्हा अनेकांना परिचित झाला आहे. जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या सरोवरांपैकी दुसर्या क्रमांकाचे नैसर्गिक सरोवर म्हणून लोणारचे सरोवर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. तसेच हे सरोवर जगातील तिसर्या क्रमांकाचे खार्या पाण्याचे सरोवर आहे.
१. उंदरांचं मंदिर - करणी माता मंदिर, राजस्थान
बिकानेरपासून ३० किलोमीटर अंतरावर असणारं हे मंदिर २०,००० उंदरांचं घर आहे. इतकंच नाही तर इथे उंदरांची पूजाही केली जाते. हे उंदिर म्हणजे देवीचा अवतार असल्याचं इथे मानलं जातं.
२. पक्ष्यांची सामूहिक आत्महत्या - जतिंगा, आसाम
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आसाममधील जतिंगा गावात स्थलांतर करणारे हजारो पक्षी अतिवेगाने उडत येतात आणि येथील झाडांना आणि घरांना मुद्दामून आपटतात आणि मरण पावतात. ते असं का करतात, हे एक मोठं कोडं आहे.
३. लोकतकचा तरंगता तलाव - मणिपूर
मणिपूरचा लोकतक तलाव हा जगातील एक नैसर्गिक आश्चर्य आहे. या तलावात अनेक अशी बेटं आहेत जी तरंगत राहतात. माणसं या बेटांवर शेती करतात. तसेच तेथे जगातील काही दुर्मिळ प्राणीही आढळतात. दरवर्षी हजारो पर्यटक या बेटांना भेट देतात.
४. रुपकुंड तलाव - उत्तराखंड
उत्तराखंडात हिमालयाच्या कुशीत १६,५०० फुटांवर रुपकुंड तलाव आहे. इथे कोणत्याही प्रकारची मानवी वस्ती अस्तित्वात नाही. तरीही इथे नवव्या शतकातले ६०० मानवी सांगाडे सापडले आहेत. हे सांगाडे इथे कसे आले त्याची कोणालाही माहिती नाही.
५. कुंभलगड किल्ल्याच्या भिंती - राजस्थान
चीनच्या ग्रेट वॉलबद्दल तर आपल्याला माहिती असतं. पण, राजस्थानच्या कुंभलगड किल्ल्याला असलेली ३६ किलोमीटरची भिंत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत आहे. या भिंतीत जवळपास ३०० मंदिरं आहेत.
६. कोलकत्यातील वडाचे झाड
कोलकत्याच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये असलेले हे वडाचे झाड म्हणजे एक आश्चर्य आहे. हे वडाचे झाड म्हणजे एक जंगलच आहे. ते २०० वर्ष जुने आहे. ते इतके पसरले आहे की त्याचा परीघ जवळपास २ किलोमीटर इतका प्रचंड आहे.
७. चुंबकीय टेकडी - लडाख
लेह लडाख येथे असलेली चुंबकीय टेकडी हे एक मोठे आश्चर्य आहे. इथे एका विशिष्ट जागी न्यूट्रल गीअरमध्ये गाडी उभी केल्यास ती आपोआप या टेकडीकडे आकर्षित होते.
८. कोडीन्ही गाव - केरळ
केरळमधील या २००० लोकवस्ती असलेल्या गावात तब्बल ३५० जुळ्यांचा जन्म झाला आहे. दर १००० लोकांमागे ४२ जुळ्यांचा जन्म या गावात नोंदवला गेला आहे.
९. पंबन बेटावरचे तरंगते दगड - रामेश्वरम
रामेश्वरमनजीकच्या पंबन बेटावरुन रामाने रामसेतू बांधला अशी आख्यायिका आहे. याच बेटावर असे काही दगड आढळतात जे पाण्यावर तरंगतात. रामाने सेतू बांधण्यासाठी हेच दगड वापरले असावेत अशी समजूत आहे.
१०. झाडांच्या मुळांचे पूल - चेरापूंजी, मेघालय
मेघालयमधील लोकांनी इथल्या जंगलातील झाडांच्या विस्तृत मुळांना असा काही आकार दिला की त्या मुळांचे साकव तयार झाले. गावातील लोक हे साकव दळणवळणासाठी वापरतात.
११. लटकते खांब - लेपक्षी, आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेशातील लेपक्षी मंदिरातील ७० खांबांपैकी एक खांब असा आहे जो कोणत्याही आधाराशिवाय लटकतो. या खांबाच्या खालून एखादा कपडा किंवा ओढणीही आरपार जाऊ शकतो.
१२. महाबलीपुरममधील झुलता दगड - तामिळनाडू
भौतिकशास्त्राच्या सर्व नियमांना तिलांजली देणारा एक मोठा खडक महाबलिपूरम येथे आहे. त्याला प्रेमाने कृष्णाचा लोण्याचा गोळा असंही म्हटलं जातं. कोणत्याही आधाराशिवाय हा पाच मीटर व्यासाचा खडक एका उतरत्या पृष्ठभागावर गेली अनेक शतकं उभा आहे.
१३. बडा इमामबरा - लखनऊ, उत्तर प्रदेश
लखनऊतील १८व्या शतकात बांधलेल्या या महालाचा राजदरबार ५० मीटर रुंद आहे. विशेष म्हणजे इतक्या रुंद दरबारात एकही खांब नाही. वास्तूविशारदांमध्ये या दरबाराच्या बांधकामाविषयी आश्चर्य व्यक्त केलं जातं.
१४. मोटरसायकल बुलेट बाबाचं मंदिर - राजस्थान
एका व्यक्तीच्या रस्त्यात झालेल्या अपघातानंतर त्याची बुलेट पोलिसांनी पोलीस स्थानकात आणली. दुसऱ्या दिवशी ती बुलेट अपघाताच्या ठिकाणी सापडली. पोलिसांनी ती पुन्हा आणून तिला साखळदंडांनी बांधून ठेवलं. तरीही ती अपघाताच्या ठिकाणी गेली. ती कशी गेली याची कोणालाच माहिती नाही. आता मात्र या बुलेटची पूजा केली जाते. प्रत्येक वाटसरू या बुलेट बाबाला वंदन करतो आणि मगच पुढचा प्रवास करतो.
१५. आशियातील स्वच्छ गाव - मावलिंनॉग, मेघालय
मेघालयमधील चेरापुंजीजवळ असलेलं हे गाव आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तसंच या गावात साक्षरतेचं प्रमाण १०० टक्के इतकं असून इथे प्रत्येकाला अस्खलित इंग्रजी बोलता येतं.
ही भारता विषयी माहिती तुम्हाला आवडतली तर नक्की पुढील ग्रुपला पाठवावी
उतरुन खाली आलो आणि समोर जे काही पाहिले त्याचे वर्णन शब्दांत करणे शक्यच नाही.
अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा पाषाणकडा. मनावर दडपण येणे साहजिकच. यालाच थ्रिल म्हणत असावेत बहुतेक. आतपर्यंत ऊन पोचणे शक्यच नव्हते, अतिशय थंडगार वातावरण. एकदोन ठिकाणी या उन्हाळ्यातही गुढगाभर पाणी. तेही एकदम थंडगार गोठवणारे.
२६जाेनवारी १९५०तंजावर भाेसले सरकारच्या पाठपुरावा नंतर सरकारने छत्रपतीशिवाजी महाराजवर तिकीट काढले
जयजिजाऊ जय शिवराय जयशुभंराजे
बुलढाणा नांदुरा
बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा येथे १०५ फूट उंच अशी हनुमानाची मूर्ती आहे. ही जगातील सर्वांत मोठी हनुमानाची मूर्ती आहे असे म्हणतात