! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 2 September 2016

आशिया खंडातील सर्वात मोठी दरी सांधन दरी...

उतरुन खाली आलो आणि समोर जे काही पाहिले त्याचे वर्णन शब्दांत करणे शक्यच नाही. 

 

अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर  कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा पाषाणकडा. मनावर दडपण येणे साहजिकच. यालाच थ्रिल म्हणत असावेत बहुतेक. आतपर्यंत ऊन पोचणे शक्यच नव्हते, अतिशय थंडगार वातावरण. एकदोन ठिकाणी या उन्हाळ्यातही गुढगाभर पाणी. तेही एकदम थंडगार गोठवणारे.

Thursday, 1 September 2016

महाराजांचे पोस्ट तिकिट.।।।

२६जाेनवारी १९५०तंजावर भाेसले सरकारच्या पाठपुरावा नंतर सरकारने छत्रपतीशिवाजी महाराजवर तिकीट काढले
जयजिजाऊ जय शिवराय जयशुभंराजे

जगातील सर्वांत मोठी हनुमानाची मूर्ती

बुलढाणा  नांदुरा

 

बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा येथे १०५ फूट उंच अशी हनुमानाची मूर्ती आहे. ही जगातील सर्वांत मोठी हनुमानाची मूर्ती आहे असे म्हणतात

१२ ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग परळी

बीड  परळी

 

१२ ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग परळी येथे आहे. ते जवळजवळ सातशे वर्ष जुने असून अहिल्याबाई होळकरांनी त्याचा इ.स. १७०६ मध्ये जिर्णोध्दार केला.

श्रीतुळजाभवानीचे मंदिर,

उस्मानाबाद  तुळजापूर

महाराष्ट्राची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणार्‍या श्रीतुळजाभवानीचे तुळजापूर येथील मंदिर हेमाडपंती शिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. मोठ्या प्रमाणावर असणार्‍या चिंचेच्या झाडांमुळे तुळजापूरला अगोदर चिंचपूर म्हणून ओळखले जाई, पुढे तुळजाभवानीमुळे याचे नामकरण तुळजापूर असे करण्यात आले.

Wednesday, 31 August 2016

आई...।।।।

बायको सतत आईवर आरोप करत होती..........

आणि

नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता...

पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती

ती  जोरजोरात ओरडून सांगत होती

"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये"

गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..

तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..

पत्नीला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली

आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला....

कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??

तेव्हा पति ने उत्तर दिले

त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले

पति ने पत्नी ला सांगितले..

"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले

आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मारुन थोड़े पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.

आई एका ताटात भाकर वाढायची

आणि

रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची

माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.

मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो

आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.

आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं

आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो

पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,

ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..

तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.

मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.😔

हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.

ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....✍🏻

या मेसेज़ला शेयर करायला कोणतीच शपथ नाहिये.
आवडला तर नक्कीच शेयर करा..🤗

मी किल्क केलेला अमेझिंग फोटोग्राफ....।।।।।