! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 23 May 2016

{ शिवराज्याभिषेक }





पानाच्या समस्याविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेतछत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिनेअगोदर सुरु झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपर्‍यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे ११००० ब्राह्मण यातील काही आपल्या कुटुंबीयांबरोबर आले होते. (एकंदर आकडा ५००००). इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिने त्यांना मिष्ठान्नाबरोबर त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. ब्राह्मण सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसर्‍या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एक धार्मिक विधी आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवर्शन केले. चिपळूणला परशुराम यांचे दर्शन घेतले पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. पुन्हा चार दिवसांनी ते प्रतापगडावरीलप्रतिष्ठापणा केलेल्या भवानीमाता यांच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसर्‍या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. (त्यावेळीही). यावेळी गागाभट्टाला७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळुन १७००० होन दक्षिणा दिली.दुसर्‍या दिवशी सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसं आणि लोखंड अशा सात धातूंची वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. हे सर्व आणि शिवाय लाखभर होन ब्राह्मणांना देण्यात आले. ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरु झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्र भेट देण्यात आले. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेक याचा अर्थ राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावरशिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडी बांधलेली सोयराबाई दुसर्‍या मंचावर तर बालसंभाजी थोडासा मागे बसलेला होता. अष्टप्रधानातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारतीओवाळली. यानंतर शिवाजीने लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. बरोबर मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. भव्य सिंहासन सभासदबखर म्हणते त्या प्रमाणे) ३२ मण सोन्याचे [१४ लाख रुपये मूल्य असलेले] सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेला होता. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्ण्यांनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. राजाला आशीर्वाद दिला. राजेंनी त्यांना भेटवस्तू दिल्या. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. प्रत्येग गडावर ठरल्याप्रमाणे तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभटांनी पुढे येऊन त्यांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून आशीर्वाद दिला. इतर ब्राह्मण मंडळी पुढे झाली आणि त्यांनीही त्यांना आशीर्वाद दिले. राजे शिवाजी महाराजांनी ब्राह्मण आणि इतर सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. सोळा प्रकारचे महादान त्यांनी केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन त्यांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पद, नियुक्तीपत्रे, धन,घोडे,हत्ती,रत्न,वस्त्र,शस्त्र प्रदान केले. हे सर्व सकाळी आठ पर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे शिवाजी महाराज गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तीवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेनेचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिराचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.शिवराज्याभिषेक

पानाच्या समस्याविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेतछत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिनेअगोदर सुरु झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपर्‍यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे ११००० ब्राह्मण यातील काही आपल्या कुटुंबीयांबरोबर आले होते. (एकंदर आकडा ५००००). इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिने त्यांना मिष्ठान्नाबरोबर त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. ब्राह्मण सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसर्‍या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एक धार्मिक विधी आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवर्शन केले. चिपळूणला परशुराम यांचे दर्शन घेतले पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. पुन्हा चार दिवसांनी ते प्रतापगडावरीलप्रतिष्ठापणा केलेल्या भवानीमाता यांच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसर्‍या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. (त्यावेळीही). यावेळी गागाभट्टाला७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळुन १७००० होन दक्षिणा दिली.दुसर्‍या दिवशी सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसं आणि लोखंड अशा सात धातूंची वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. हे सर्व आणि शिवाय लाखभर होन ब्राह्मणांना देण्यात आले. ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरु झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्र भेट देण्यात आले. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेक याचा अर्थ राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावरशिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडी बांधलेली सोयराबाई दुसर्‍या मंचावर तर बालसंभाजी थोडासा मागे बसलेला होता. अष्टप्रधानातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारतीओवाळली. यानंतर शिवाजीने लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. बरोबर मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. भव्य सिंहासन सभासदबखर म्हणते त्या प्रमाणे) ३२ मण सोन्याचे [१४ लाख रुपये मूल्य असलेले] सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेला होता. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्ण्यांनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. राजाला आशीर्वाद दिला. राजेंनी त्यांना भेटवस्तू दिल्या. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. प्रत्येग गडावर ठरल्याप्रमाणे तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभटांनी पुढे येऊन त्यांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून आशीर्वाद दिला. इतर ब्राह्मण मंडळी पुढे झाली आणि त्यांनीही त्यांना आशीर्वाद दिले. राजे शिवाजी महाराजांनी ब्राह्मण आणि इतर सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. सोळा प्रकारचे महादान त्यांनी केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन त्यांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पद, नियुक्तीपत्रे, धन,घोडे,हत्ती,रत्न,वस्त्र,शस्त्र प्रदान केले. हे सर्व सकाळी आठ पर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे शिवाजी महाराज गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तीवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेनेचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिराचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

Thursday, 12 May 2016

! " शिवराज्याभिषेक " !

शिवराज्याभिषेक      

      तक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली. जडित सिंहासन सिद्धं केले, रायरीचे नाव ‘रायगड’ म्हणून ठेविले. तक्तास स्थळ तोच गड नेमीला. गडावरी तक्ती बसवावे असे केले. सप्तमहानदियांची उदके व थोर थोर नदियांची उदके व समुद्राची उदके, तीर्थक्षेत्रे नामांकित तेथील तीर्थोदके आणिली. सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजियांस अभिषेक करावा असा निश्चय करून, सुदिन पाहून मुहूर्त पाहिला. ‘शालीवाहन शके १५९६, ज्येष्ठ मासी शुद्ध १३स मुहूर्त पाहिला.’        साडेचार् हजार राजांना निमंत्रणे गेली. रायगडावर साडेचार हजार राजे जमले. गागाभट्टानि पवित्र साप्तनद्यांचे पाणी आणले. राजे ब्रम्हा मुहूर्तावर उठले, स्नान केले, शिवाई मातेला अभिषेक केला आणि जिजाऊ मातांचे दर्शन घेतले. कवड्यांच्या माळा घातल्या, जिरेटोप डोक्यावर घातला, भवानी तलवार कंबरेला जोडली आणि राजे गड फिरू लागले.        राजे सभागृहात आल्याबरोबर साडेचार हजार राजांनी मानवंदना दिली, बत्तीस मणांचे सिंहासन वर ठेवलेले होते त्याला तीन पायर्या होत्या. पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर राजांचे हृदय हेलावले, राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि चटकन आठवण आली " राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये , शिवा न्हावी कितीही जन्माला येतील शिवा काशीद जन्माला येतील परंतु रयतेचा राजा, शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणे नाही राजे". राजांच्या डाव्या डोळ्यातून अश्रू गळाले.        राजांनी दुसर्या पायरीवर पाय ठेवला आणि आठवण आली " राजे तुम्ही सुखरूप विशालगडावर जावा आणि पाच तोफांची सलामी द्यावी. जोपर्यंत हे कान पाच तोफांची सलामी ऐकत नाही न राजे तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे देह ठेवणार नाही राजे." राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू गळाला .        तिसर्या पायरीवर पाऊल ठेवल्याबरोबर आठवण आली "राजे आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाच. जगून वाचून आलोना राजे तर लेकराच लग्न करीन नाहीतर माय बाप समजून तुम्हीच लग्न लावून टाका. " राजे धळाधळा रडू लागले.        साडेचार हजार राजांना कळेना काय झाले. आज आनंदाचा दिवस, अनाथ झालेल्या हिंदुना बाप भेटणार, मराठी मातीला नवरा भेटणार , शिवाजी राजा होणार आणि राजांच्या डोळ्यातून अश्रू ... तोच तिथे उभ्या असलेल्या एका वडीलधार्या व्यक्तीला राजांनी आवाज दिला. मदारी काका जवळ आले आणि विचारले राजा आज आनंदाचा दिवस आणि तू रडतोस. त्यावर राजे म्हणाले काका ज्यांच्यामुळे माळा सिंहासन मिळाले तेच पाहायला राहिले नाहीत. कोणत्या तोंडाने या सिंहासनावर बसू काका. हे सिंहासन टोचेल मला. यातून उतराई होण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. या गेलेल्यांचे पाईक म्हणून तुम्ही काहीतरी मागा. मदारी काकांनी सांगितले " राजा अरे ते गेले तरी त्यांनी काही मागितले नाही, माझ्यासारख्याने काय मागावे ? " राजे म्हणाले काहीतरी मागा काका म्हणजे मला उतराई होता येईल. यावर मदारी काका म्हणतात " हे असेच म्हणतो ना शिवबा तर एकच दे, या बत्तीस मणांच्या सिंहासनाची चादर बदलण्याचे काम राजे या गरिबाला दे मला दुसरे काही नको."

Thursday, 14 April 2016

! " राम नवमी च्या शुभेच्छा " !

फाडली आमची
#छाती तर दिसेल मुर्ती #श्रीरामाची
अन कापल्या आमच्या नसा तर उडेल धार भगव्या
# रक्ताची
# श्रीराम नवमीच्या आपणास व आपल्या
कुंटुबियास हार्दिक शुभेच्छा
   🚩जय श्रीराम🚩

Wednesday, 6 April 2016

! " सोलापूर महापालिकेची देखणी इमारत " !




30 जून 2015जगभरातील सर्वोत्कृष्ट स्थापत्य पद्धतीचा वापर करण्यात आलेली देखणी इमारत ‘इंद्रभुवन’! उद्योजक मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद यांनी सोलापूर शहराच्या सुवर्णवैभवी काळाची साक्ष देणारी ती इमारत 1899 साली बांधण्यास सुरुवात केली. तिचे बांधकाम तेरा वर्षे चालले. त्यांच्या कायमस्वरुपी वास्तव्यासाठी व्हिक्टोरियन स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली ती इमारत (नव्हे महालच) बांधली. त्यांना त्या बांधकामासाठी साडेचार लाख रुपये खर्च आला. त्यांनी जगभर दौरे करून त्या इमारतीसाठी सुबक व आकर्षक वस्तू आणल्या; जगभरातील अत्याधुनिक बांधकाम साहित्यही वापरले. जगातील विविध स्थापत्यकलांच्या मिश्रणातून तो प्रासाद साकारला गेला आहे. ती इमारत इ.स. 1912 साली पूर्णत्वास आली, पण त्याआधी 1911 साली आप्पासाहेब वारद यांना मृत्यू आला व त्या भव्य महालात त्यांना राहता आले नाही. वारद कुटुंबीय त्या ‘इंद्रभुवन’मध्ये राहू लागले. त्यांना नंतरही वारद कुटुंबीयांना आणखी दोन लाख खर्च आला. नंतर ती शासनाने ताब्यात घेतली. 1964 साली सोलापूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्यावर शासनाने पालिका कार्यालय त्या इमारतीत हलवले. आता शासकीय कार्यालये, मामलेदार कचेरी व न्यायालय त्या इंद्रभुवनमध्ये आहे.त्या इमारतीच्या प्रत्येक खांबावर सिंह व वाघाची प्रतिकृती आहे. अनेक देवता, नृत्यांगणा, प्राणी व फळे यांची शिल्पे जागोजागी कोरली आहेत. सोलापूरची शान असलेल्या ‘इंद्रभुवन’चा गौरव करण्यासाठी टपालखात्याने 2004 साली त्या इमारतीचे चित्र असलेले टपाल तिकिट काढले.वैभववारसाइतिहाससोलापूरऐतिहासिक वास्तू

Tuesday, 22 March 2016

! " भगवाच " !

ज्या दिवशी तलवारीच्या मूठीवर
" "हिंदूंचा "हात असेल त्या
दिवसा पासून .. "दाही दिशा
आणि अटकेपार ......फक्त आणि
फक्त ........
🚩 भगवाच .......असेल 

Monday, 22 February 2016

! " हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या महाराणीसाहेब सईबाई यांचे समाधी स्थळ " !




महाराणी सईबाई साहेब यांची राजगड च्या पायथ्याशी असलेल्या समाधी"" एक पावन पणती जिने छत्रपती शिवरायंच्या आयुष्यात असंख्य सुखाचे दीप उज्लवले.. एक हवेची सुखद झुळूक जिच्या पोटी छत्रपती शंभूराजे नावाचे तुफान जन्मले.. स्वराज्याच्या पहिल्या महाराणीसाहेब अखंड सौभाग्य अलंकृत सईबाईसाहेब शिवाजीराजे भोसले ""

Thursday, 11 February 2016

! " डोळ्याचा पारणं फेडणारा हरिहरगड " !

शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले बांधलीत. त्याच्या गड किल्यांची रचना अतिशय बुद्धीकौशल्याने केलेली असायची. महाराष्ट्राची आणखी एक ओळख म्हणून गड-किल्ल्यांना देखील तेवढंच महत्त्व आहे. असाच एक किल्ला आहे ज्याचं आकर्षण ठरतं ते त्याच्या पायऱ्या.


पायऱ्या नष्ट करण्याच्या कुत्सित हेतूने आलेला इंग्रज अधिकारिही या पाय-यांच्या प्रेमात पडला. म्हणून आजही ते अस्तित्वात आहे. पहिला दरवाजा दिसतोय त्याच्यापलिकडेही डोळ्याचे पारणे फेडणा-या पाय-या आहेत. जीवनात हा थरार एकदा तरी अनुभवण्या सारखाच आहे.

नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हा किल्ला जिंकला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली.

८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला. शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. कारण आजही या किल्ल्याच्या पायथ्याच्या वाडयांना टाकेहर्ष, आखली हर्ष अशा नावाने ओळखलं जातं.

त्रिकोणी आकाराचा हरिहरगड त्याचा सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग, पुढे लागणारा बोगदा आणि गडावरील सर्व दुर्ग अवशेष वैशिष्टयपूर्ण असेच आहेत. त्याच्यावर पोहोचण्यासाठी दगडात खोदलेल्या खडया जिन्याच्या मार्गामुळे दुर्गयात्रींच्या परिचयाचा आहे. समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा असलेला हा त्रिकोणी आकाराचा किल्ला, त्याचा कातळ कोरीव पाय-या



 त्याची बोगद्यातून करावी लागणारी अंतिम चढाई हे सारं सारं गिरिप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.


१८१८ सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला आणि उद्गारला, "या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ आणि तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात".

खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा आणि प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले सुद्धा पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.