! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 22 February 2016

! " हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या महाराणीसाहेब सईबाई यांचे समाधी स्थळ " !




महाराणी सईबाई साहेब यांची राजगड च्या पायथ्याशी असलेल्या समाधी"" एक पावन पणती जिने छत्रपती शिवरायंच्या आयुष्यात असंख्य सुखाचे दीप उज्लवले.. एक हवेची सुखद झुळूक जिच्या पोटी छत्रपती शंभूराजे नावाचे तुफान जन्मले.. स्वराज्याच्या पहिल्या महाराणीसाहेब अखंड सौभाग्य अलंकृत सईबाईसाहेब शिवाजीराजे भोसले ""

Thursday, 11 February 2016

! " डोळ्याचा पारणं फेडणारा हरिहरगड " !

शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले बांधलीत. त्याच्या गड किल्यांची रचना अतिशय बुद्धीकौशल्याने केलेली असायची. महाराष्ट्राची आणखी एक ओळख म्हणून गड-किल्ल्यांना देखील तेवढंच महत्त्व आहे. असाच एक किल्ला आहे ज्याचं आकर्षण ठरतं ते त्याच्या पायऱ्या.


पायऱ्या नष्ट करण्याच्या कुत्सित हेतूने आलेला इंग्रज अधिकारिही या पाय-यांच्या प्रेमात पडला. म्हणून आजही ते अस्तित्वात आहे. पहिला दरवाजा दिसतोय त्याच्यापलिकडेही डोळ्याचे पारणे फेडणा-या पाय-या आहेत. जीवनात हा थरार एकदा तरी अनुभवण्या सारखाच आहे.

नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हा किल्ला जिंकला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली.

८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला. शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. कारण आजही या किल्ल्याच्या पायथ्याच्या वाडयांना टाकेहर्ष, आखली हर्ष अशा नावाने ओळखलं जातं.

त्रिकोणी आकाराचा हरिहरगड त्याचा सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग, पुढे लागणारा बोगदा आणि गडावरील सर्व दुर्ग अवशेष वैशिष्टयपूर्ण असेच आहेत. त्याच्यावर पोहोचण्यासाठी दगडात खोदलेल्या खडया जिन्याच्या मार्गामुळे दुर्गयात्रींच्या परिचयाचा आहे. समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा असलेला हा त्रिकोणी आकाराचा किल्ला, त्याचा कातळ कोरीव पाय-या



 त्याची बोगद्यातून करावी लागणारी अंतिम चढाई हे सारं सारं गिरिप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.


१८१८ सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला आणि उद्गारला, "या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ आणि तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात".

खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा आणि प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले सुद्धा पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. 

Wednesday, 3 February 2016

! " छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची राजमुद्रा " !



छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा
छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-

संस्कृत :
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"

मराठी  :
ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.

इंग्रजी :
The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji (Maharaj ) will grow like the first day moon .It will be worshiped by the world & it will shine only for well being of people.

Tuesday, 26 January 2016

! " महाराजांना ञिवार मुजरा " !

तव शौर्याचा एक अंश दे !
तव धैर्याचा जरा स्पर्श दे !
तव तेजांतिल एक किरण दे !
जीवनांतला एकच क्षण दे !
त्या दीप्तीतुनि दाहि दिशा द्रुत उजळुनि टाकू !
पुसू पानिपत !
पुन्हां लिहाया अमुचे भारत,व्यास-वाल्मिकी येतील धावत !!"
राजवंदना"-





महाराजांच्या चरणी सदैव नतमस्तक...!!

बीजे

Friday, 22 January 2016

! " पांडवलेणी, नाशिक " !



नाशिक येथील पांडव लेण्यांना त्रिरश्मी लेणी असेही संबोधले जाते.












 पांडवलेणी ही सुमारे इ.स. १२०० च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. भारत सरकारने या लेणीला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केलेले आहे.[१] सातवाहन राजांनी या गुहा खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो.


[पांडवलेणी]
स्वरूप संपादन करा
यात अनेक गुहा असून काही गुहा अतिशय कलाकुसरीने कोरलेल्या आहेत. यातील स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आढळतात. या गुहांमध्ये एक प्रमुख चैत्यगृह आढळते जे संपूर्ण सुस्थितीत आहे. पूर्व दिशेचे प्रवेशद्वार सुस्थितीत आहे.


[पुर्व दिशेचे प्रवेशद्वार]

पांडवलेणे पूर्व दिशेचे प्रवेशद्वार - सकाळचे दृश्य
काही पश्चिमेकडील लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहिलेले दिसून येते.

अधिक माहिती संपादन करा
या लेणी पाहण्यास फी आकारली जाते. तसेच या टेकडीवर पाण्याची टाके आहेत परंतु पिण्याच्या पाण्याची सोय नसू शकते. मात्र टेकडीवर प्राचीन काळी केलेले पाण्याचे टाके दिसून येते. या टेकडीवर आता वनखात्याने वृक्षराजी वाढवली आहे.


[नाशिक शहराचे विहंगम दृश्य]
पांडवलेण्यावरून नाशिक शहराचे विहंगम दृश्य दिसते. टेकडीखाली दादासाहेब फाळके स्मारक आहे. पांडवलेणे, नाशिक येथे वर जाण्यासाठी पायऱ्यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो.

चित्र:पांडवलेणे नाशिक येथील पायऱ्या.JPG
[पांडवलेणे, नाशिक येथील पायऱ्या]न
वाहतूक व्यवस्था संपादन करा
पंचवटी, मध्यवर्ती बसस्थानक तसेच नाशिकरोड येथून नाशिक बौद्घ लेण्यासाठी बसेस सुटतात. अंबडला जाणाऱ्या बसनेही येथे उतरता येते. तसेच नाशिक दर्शन ही बसही येथे आपला थांबा घेते.

! " त्रंबकेश्वर मंदिर " !


निसर्गरम्य परिसर - त्रंबकेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेले नयनरम्य स्थान आहे. श्रावण महिन्यात हिरव्या पाचूच्या बेटासारखे हे चिमुकले गाव दिसते. मध्यभागी गंगासागर कुंड आहे. गावाचा पाणीपुरवठा येथून होतो. कुशावर्त कुंड तर तीर्थांचे तीर्थ म्हणून समजले जाते. ब्रम्हगिरी पर्वत समुद्रसपाटीपासून १२९४ मीटर्स (४२४६ फुट ) उंच आहे. अनेक धार्मिक विधी केले जातात. नारायण नागबली विधीसाठी देशाच्या कानाकोप-यातून मान्यवर येत असतात. येथे क्षेत्रस्थ ब्राहमणांनी आपल्या यजमान घराण्याच्या पुरातन वंशावली जपल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक ऐतिहासिक मान्यवरांचे हस्ताक्षर आहे.
भगवान शंकराचे हे भव्य मंदिर हेमाडपंथी पध्दतीने बांधलेले आहे. या मंदिरास त्या काळी सुमारे ३० लाख रूपये खर्च आला. १७४५ ते १७७५ च्या दरम्यान पेशव्यांनी हे पवित्र कार्य केले. मंदिराचे काम संपूर्ण काळया दगडात आहे. कोरीव काम अतिशय सुबक असून मंदिर भव्य आणि पवित्र आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नगारा घर आहे. मंदिराच्या चहुबाजूंनी मोठी तटवजा भिंत आहे, तर परिसर दगडांनी बांधलेला आहे, आत भक्तांना स्नान करायला व पाय धुवायला कुंड आहे. मंदिराचा गाभारा अतिशय शांत व पावित्राने आणि मांगल्याने भरलेला आहे. शिवलिग हे स्वयंभू आहे. पिडीत ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे दर्शन होते. दर सोमवारी पालखी निघते. मंदिराचा कळस सोन्याचा आहे.





! " रायगढ महोत्सव " !

खूशखबर ....!!!        खुशखबर ....!!!!!       खूशखबर ....!!!!!

तमाम शिवभक्त आणि शिवप्रेमी मित्र मंडळींना कळवणयात अत्यंत आनंद होतो
की,  सध्या किल्ले शरायगढावर शिवकालीन रायगढ बघण्याचा योग जुळून आला
आहे कारण रायगढावर दि.21/01/2016 ते दि. 24/01/2016 या दिवसांत 
रायगढ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे जसे त्या काळात होते ते हूबेहूब
तर याची देहि याच डोळा बघण्याची संधी तूम्ही सोडू नये म्हणून आपल्या माहिती
साठी हे पोस्ट .... 

धन्यवाद ...!!!!!

आपलेच बीजे