! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 21 December 2015

! " मांगी तुगी मंदीर " !

 नाशिक पासुन 125 कि.मि. अंतरावर सटाणा तालुक्यात आहे.समुद्रसपाटीपासुन 4343 फुट उंचीवर मांगी शिखर तर समुद्र सपाटीपासून 4366 उंचीवर तुंगी शिखर आहे. मांगी तुंगी हे प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. मांगी तुंगीच्या पायथ्याशी ‘’भिलवाडी’’ हे गांव आहे. येथे साधना केल्याणे मोक्ष प्राप्ती मिळते असे मानले जाते. मांगी मांगी शिखराची उंची जास्त नसली तरी येथे सराईत गिर्यारोहकच चढु शकतात. शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, अदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव इ. यांच्या 356 कोरीव मुर्ती आहेत. गुफांमध्ये देखील काही कोरीव काम आढळते. या ठिकाणी “ मांगीगिरी मंदीर ‘’ आहे. तुंगी तुंगी शिखर मांगी शिखरापेक्षा उंच आहे. या शिखराला देखील तुंगी शिखरासारखीच प्रदक्षिणा करता येते. प्रदक्षिणा मार्गावर तीन गुंफा आहे. त्या पैकी एका गुंफेत “ तुंगीगिरी मंदीर ‘’ असून. भगवान बुध्दांच्या 99 कोरीव मुर्ती येथे आहेत  




Bj

! " काळाराम मंदिर नाशिक " !

काळाराम मंदीर नशिक शहरात पंचवटी भागात स्थित आहे. हे मंदीर मध्यवर्ती बस स्थानका पासुन 3 कि.मि.अंतरावर आहे. मंदिरात जाणेसाठी नाशिक शहरातुन विविध ठिकाणाहुन शहर बस सेवा व ऑटोरिक्षा उपलब्ध आहेत. काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभु रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते,असे मानले जाते.सदर मंदीराचे बांधकामासाठी 2000 कारागिर 12 वर्ष राबत होते.पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदीर आहे.245 फुट लांब व 145 फुट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे.मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे.मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.।




बीजे

Saturday, 19 December 2015

!! रतनगड !!



‘रतनगड’, रतनवाडी, ता. अकोले जि. अहमदनगर येथील हा किल्ला गिर्यारोहक, निसर्गप्रेमी आणि साहसी चढाई करण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक पर्वणीच आहे. ४३०० फुट उंच असलेला हा गड समुद्रसपाटीपासून ३५२३ फुट उंचीवर आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्याशी असलेल्या रतनवाडीहून जाता येते. रतनवाडीला संगमनेरहुन-अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते.

   हा किल्ला कोळी सरदार जावजी यांनी १७६३ साली ताब्यात घेतल्याची सरकार दप्तरी नोंद असून हा किल्ला म्हणजे एक महत्वाचे ठाणे मानले जाई. १८२० साली कॅप्टन गॉर्डनने किल्ला ताब्यात घेतल्या नंतर १८२४ साली आदिवासी सेनानी रामोजी भांगरेंनी पुन्हा ताब्यात घेतला.

हा गड अतिशय प्रेक्षणीय असून पूर्ण गड चढण्यासाठी अनेक ठिकाणी साहस आणि धैर्य अंगी असणे महत्वाचे आहे.

किल्ल्यावर गणेश दरवाजा, रत्नादेवीची गुहा, मुक्कामाची गुहा, देवीदेवतांची शिल्पे कोरलेला प्रमुख दरवाजा, गडावरील जुन्या इमारतींचे अवशेष ज्याला इमारतींचे जोतेही म्हणतात, कडेलोट स्थळ, राणीचा हुडा म्हणून ओळखला जाणारा भग्न बुरुज, प्रवरा नदीचे उगमस्थान, मोर्च्याची ठिकाणे आणि बुरुज, अंधारकोठी आणि त्यातील पिण्यास योग्य असलेले मधुर पाण्याचे तळे, खडकाला आरपार भगदाड असलेले गडावरील अत्युच्च ठिकाण जे नेढा म्हणून ओळखले जाते आणि कल्याण दरवाजा हि प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.

गडावर राहण्याच्या सोयीसाठी दोन गुहा असून ३०-३५ लोक मुक्काम करू शकतात आणि पिण्याचे पाणीही उपलब्ध आहे. खाण्याची व्यवस्था मात्र गडावर नाही. गडावर जाण्यासाठी रतनवाडी, कुमशेतच्या शिवकालीन मार्गाने किंवा साम्रदहून जाता येते.

मुंबई किंवा नाशिकहून इगतपुरी-घोटीmargeमार्गे भंडारदरा धरणाला वळसा घालून रतनगडला पोहोचता येते. रतनवाडीहून गड तीन तासांच्या अंतरावर आहे.

Friday, 18 December 2015

छत्रपती शाहू महाराजांची समाधी ( माहुली ), कास तलाव

छत्रपती शाहू महाराजांची समाधी ( माहुली ), कास तलाव
सातारा
शहराजवळील माहुली येथे कृष्णा-वेण्णा नद्यांचा संगम असून येथे छत्रपती शाहू महाराजांची समाधी आहे. सातार्‍यापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावरील कास तलाव हे ठिकाणदेखील अलीकडच्या काळात नैसर्गिक सुंदरता व शांताता यांमुळे प्रसिद्ध होत आहे. पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात.





SHIVBHAKAT BJ....!!!!

Thursday, 5 November 2015

! " शिवाजी महाराज की जय " !



_ 🚩_
          "प्रौढ प्रताप पुरंदर"
      "महापराक्रमी रणधुरंदर"
        "क्षत्रिय कुलावतंस्"
          "सिंहासनाधीश्वर"
          "महाराजाधिराज"
              "महाराज"
               "श्रीमंत"
                 "श्री"
                 "श्री"
                 "श्री"
              "छत्रपती"
              "शिवाजी"
              "महाराज" 
                 "की"

      🚩🚩.....🚩🚩




!" छञपतीना मानाचा मुजरा " !


ईतिहासाची पाने चाळतांना"...

शिवाजी महाराजांच्या गडाला 
कुठल्याही देवाचे नाव नाही. 
गणपतीचे सुद्धा नाही....... 

ज्या मनुस्मृतीने समुद्र 
ओलांडू नये असे बंधन 
घातले होते त्यांच्याविरूद्ध 
शिवाजी महाराजांनी जाऊन 
समुद्रात आरमार उभारले....... 

गड जिंकल्यावर तीथे सत्यनारायण 
कधीच घातला नाही.......

अमावस्या अशूभ मानली जाते. 
काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही 
पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या राञी व्हायच्या, कारण अंधाराचा फायदा घेऊन 
ते गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे असे कीतीतरी विज्ञानवादी व दैववादाला मुठमाती देणारे उदाहरणे देता येतील. 

महाराजांनी दैववाद अंधश्रद्धा 
कधीच मानली नाही कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता....😊☺