! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Thursday, 25 June 2015

! " मी निसर्ग वेडा " !



वेड्याहुनी वेडा मी
वेड्याहुनी वेडा मी
एक निसर्ग वेडा मी
सह्याद्रीतल्या दर्या- खोर्यातुनी
भटकणारा एक भटक्या मी

वेड्याहुनी वेडा मी
एक दुर्ग वेडा मी
सह्याद्रीतल्या दर्या- खोर्यातुनी
भटकणारा एक भटक्या मी

वेड्याहुनी वेडा मी
एक पुस्तक वेडा मी
कथा , कादंबर्या , चरित्रांचा
ललित लेखनाचा ,
आवडत्या लेखकांचा
एक वेडा वाचक मी

वेड्याहुनी वेडा मी
एक काव्य वेडा मी
कवितेतुनी भावनांना
शब्दात उतरविणारा एक
निर्मल कागद मी

वेड्याहुनी वेडा मी .....
एक निसर्ग वेडा मी

Monday, 22 June 2015

!!! " निसर्ग " !!!

वसंतातल्या भल्या पहाटे
साखरझोपेतून मजला
फुलपाखरांनी जागवावे
सुखद थंडसे पहाटवारे
सर्वांगाला स्पर्शुन जावे...

फुलांच्या धुंद मंद गंधाने
गायचे मी विसरलो असे
कोकिळाने गार्‍हाणे गावे
लटक्या रागात मग त्याने
डहाळीवर झुलत रहावे..

शेवाळल्या क्षीण प्रवाहाने
चाहुल माझी लागता मग
थबकून मजकडे पहावे
वरुन पान एक टपकता
चटकन पुढे निघुन जावे...

गार हिरव्या वृक्षांनी अन
ऊंच काळ्या कड्यांनी काही
हितगुज मेघांशी करावे
अवचित कंठातून माझ्या
गीत एक लकेरून जावे...


!!!! " बीजे एक वादळ " !!!!!

Sunday, 21 June 2015

! " शिंपले " !

अथांग  असा सागर आणि
त्या सागरातले लहानसे शिंपले

रेतीचा एक कण
हळूच त्यात शिरावा व
शिंपल्याने अलगद तो
आपल्या कवेत घ्यावा

शिंपल्याच्या प्रेमात आणि सहवासात
त्या कणाचा मोतीच बनून जातो

मोत्याचा प्रवास थेट शिंपल्यातून
राजकन्येच्या गळ्यात होतो
आणि ते शिंपले मग
पायदळी तुडवल्या जाते

शिंपले नाहीसे होण्याचे दुखः
मोत्यांवर उमटलेले नसते , कारण

त्यांना काय माहित
शिंपल्यांनी आपल्याला
केवढे जपले असते.


!!!! " बीजे एक वादळ " !!!

!! " पहिला पाऊस ....!!!!



पहिला पाऊस, पहिली आठवण,
पहिल्या पावसातले ते अविस्मरणिय क्षण ...
आजही घालतात साद मला, या पहिल्या पावसाच्या सरी ...
तुझ्या आठवणित गुंफतात मला, या पहिल्या पावसाच्या सरी ...

नकळत हात तुझा हातात येता,
उमललेली ह्दयाची कळी ...
वाढलेले ह्दयाचे ठोके,
तुने करिता चावट खोडी ..

पावसात चिंब भिजताना,
तुला पाहन्याचा तो आनंद ...
ढगांच्या गर्जनाने तुझा,
माझ्या मीठीत येण्याचा तो प्रसंग ...

तो थेंब पावसाचा, तुझ्या गालावरती थांबलेला ..
घेताना मीठीत तुला, माझ्या ओठांनी मी टीपलेला ..
सोबतिला असलेला मातिचा ही गंध,
अजूनही आहे श्वासात माझ्या, तुझ्या गजर्‍याचा सुगंध ..

कितीतरी अशा आठवणि, आनी बरेच असे क्षण,
पडत असतो पाऊस बाहेर, आनी आतमध्ये रडते माझे मन ..

असा हा पाऊस वेडा, नेहमिच तुझी आठवण घेऊन येतो,
होताना एकरूप मातीशी, माझ्या पापण्यांना ओल करून जातो ..

पहिला पाऊस, पहिली आठवण,
पहिल्या पावसातले ते अविस्मरणिय क्षण .....................

Tuesday, 16 June 2015

! " जिजाऊच्या स्मृतीदिनी मानाचा मूजरा " !

जिजामाता (जन्म – १२ जानेवारी १५९८, : मृत्यू – १७ जून १६७४) ह्या मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाऊंचे वडील होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले. हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला . या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता
जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. जिजाबाईंना पहिले आपत्य झाले नाव काय ठेवायचे हा प्रश्न होता ६ महिन्यानंतर दीराचे नावा प्रमाणे संभाजी ठेवले. यानंतर त्यांना ४ मुले झाली चार ही दगावली,७ वर्षाचा काळ निघुन गेला. १९ फेब्रुवारी फाल्गुन वैद्य तृतीया सुर्यास्ताच्या वेळी शिवनेरीत जिजाऊंना मुलगा झाला. छत्रपती शिवाजीराजे भोसलेयांचा जन्म झाला. शिवनेरीत पाळणा बांधला नाव ठेवले “शिवाजी”. स्वतः च्या कर्तुत्वाने अगर थोर पती मिळाल्याने ज्यांचे आयुष्य कीर्तिमंत ठरले अशा नामवंत स्त्रीया पुष्कळ आहेत. पण मुलगा अत्यंत थोर व कर्तबगार निपजल्यामुळे जिच्या मातृत्वाची कीर्ती चहूकडे वर्षानुवर्ष गाजत राहिली अशी भाग्यवती एक राजमाता जिजाबाईच श्री. छत्रपतींची माता.
शिवाजी या लहानच, पण या क्षणापासून दोन उत्तम गुरु त्याला लाभले. एक दादाजी व दुसरा परमश्रेष्ठ गुरु प्रत्यक्ष माता जिजाबाई! माता जिजाबाईचं कर्तृव्य फार थोड म्हटलं पाहिजे शिवाजीच्या बालमनावर त्यांचे संस्कार घडी – घटकेला होत होते. हिऱ्याला पैलू पाडण्यासारखं हे जिजाऊंनी कठीण काम केलं महाभारत व रामायणातल्या आदर्श पुरुषांच्या शौर्याच्या व न्यायाच्या कथा ती मुलाला रोज सांगे, तर दुसऱ्या तऱ्येचे राजकारणाचे धडे, जहागीरीची व्यवस्था व शालेय शिक्षण यांची माहिती दादाजी कोंडदेव देत होते. शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली.कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगितल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता.
प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मी ही – पारतंत्र्यात आहोत, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. यवनांचा उच्छेद करून आपण्याच मराठ्यांचे राज्य स्थापन करण्याचे विचार शिवरायांचा मनात घोळू लागले. माता जिजाऊच्या व माता जगदंबेच्या शुभशीर्वादाने शिवाजीने तोरणा गड घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे शिवबाने आजूबाजूचे किल्ले जिंकून घ्यायला सुरुवात केली. १६४६ सालापासून शिवाजीने चाकण,पुरंदर,रोहीडा, राजमाची अशी अनेक किल्ले घेतले आणि १९७४ साली शिवाजी छत्रपती झाले !
जिजाबाईंच्या आयुष्यातली एकच एक इच्छा ‘आपलं मराठयाचं स्वत्रंत्र राज्य व्हावं’ ही तिच्या अलौकिक पुत्रांनी पूर्ण केली. जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या. या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे


! " मी मावळा शिवाजी महाराजांचा " !

शब्दांचे जाळे आम्ही विनत नाही
भावनांशी खेळ आम्ही खेळत नाही
पैशासाठी ईमान आम्ही विकत नाही
स्वार्थासाठी खोट आम्ही बोलत
नाही
दुसर्यास होईल त्रास असे कधी वागत
नाही



माणुसकी नाती अन माती हाच
आमचा श्वास
आहे जोवर या भुवरी करणार तोवर
शिवभक्ती
हाच आमचा ध्यास
कारण आम्ही जाणतो
पति
करोडपती होणे सोपे आहे पण
छत्रपती नाही छत्रपती ऐकदाच झाले
ते म्हणजे
राजे शिवछत्रपती
जय जिजाऊ...
जय शिवराय...
जय शंभूराजे...

Monday, 15 June 2015

! " महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर " !









करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मीमहालक्ष्मी मंदिर पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. ते कोल्हापुरात (करवीर) आहे. मंदिराच्या मांडणीवरुन ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे.कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरेल. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.या देवस्थानाची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत गणना होते.मुसलमानांनी देवळाचा विध्वंस केला तेव्हा मूर्ती अनेक वर्षे पुजाऱ्याने लपवून ठेवली होती. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे.देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.