! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Thursday, 4 June 2015

!!! " शिवरायांचा पायांचा आणि हाताचे ठसे यांचा ठसा " !!!




नक्की वाचा खास तुमच्यासाठी 

छायाचित्रे : - शिव भक्त बीजे 
: महाराष्ट्राच्या मराठी तनामनात स्फूर्ती आणणा-या राजाला सारेच मानवंदना देत आहेत. महाराजांचे कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व आज जगाला दीपस्तंभाप्रमाणे आहे. महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले आज हिंदवी स्वराजाचा इतिहास सांगत आहेत. छत्रपतींचा इतिहास आपण ऐकतो. त्यांचे दर्शन घेतो, त्यांचे पोवाडे गातो. छत्रपतींना अनुभवण्याचा प्रयत्न करतो. यात सिंधुदुर्ग भाग्यवान आहे. या किल्ल्यावर इतिहासाचे सोनेरी पान न्याहाळायला मिळते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा डाव्या पायाचा अन् उजव्या हाताचा ठसा येथे पाहता येतो. खरं तर भक्कम उभा असलेला सिंधुदुर्ग हा अरबी समुद्रातला हिंदवी स्वराज्याचा शिलेदार. याच सिंधुदुर्गवर शिवस्मारक उभे केल्यास प्रत्यक्ष छत्रपतींचा हा लाडका किल्ला अधिकच प्रेरणा देईल!
गडावर प्रचंड धावपळ सुरू होती. राजे कोणत्याही क्षणी दाखल होणार होते. ते मालवणमध्ये पोहोचल्याची वर्दी गडावर मिळाली होती. अरबी समुद्रही त्यांच्या स्वागतासाठी आतुर झाला होता. भरतीच्या लाटा किना-यावर आदळत होत्या. सा-यांचीच लगबग सुरू होती. नावाडी महाराजांच्या प्रतीक्षेत होते. नगारा वाजू लागला.. तोफांना बत्ती द्यायची बाकी होती आणि समुद्र उभा राहिला. भरतीच्या अत्युच्च टोकाला समुद्र स्थिर होतो. याच क्षणी महाराजांची पावले सिंधुदुर्गावर पोहोचली. तो दिवस होता श्रीनृप शालिवाहन शके १५८९ पल्वंग नामसंवत्सर, चैत्रशुद्ध पौर्णिमा, म्हणजेच शुक्रवार, २६ मार्च १६६७!
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वास्तुशांतीचा मुहूर्त साधला गेला होता. यासाठी किल्ला सर्व तयारीनिशी सज्ज झाला होता. तीन वर्षे सुरू असलेले काम शिवरायांनी पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग कृतकृत्य झाला होता. एक नवा इतिहास अरबी समुद्रात घडला होता. जणू काही अरबी समुद्र शिवरायांच्या या धाडसाला कुर्निसात करत होता.
सिंधुदुर्ग! मुद
 यावे हिरोजी, आपणास काय हवे ते मागावे, हा सिंधुदुर्ग बनवून आपण स्वराज्यासाठी अजोड कामगिरी केला आहात. आता रायगडाचेही काम आपणच करायला हवे. चंद्र, सूर्य असेपर्यंत काहीही भंग पावू नये असे काम करा.’
राजांच्या या आदेशाने हिरोजींना आकाशाला हात पोहोचल्याचा आनंद झाला. हिरोजी म्हणाले, ‘महाराज’ तुम्ही स्वराज्यासाठी एवढे करत आहात. दिवस-रात्र मेहनत घेत आहात. आम्ही आणखी काय मागायला हवे. या स्वराज्यासाठी आम्हाला संधी देत आहात हाच आपला मोठेपणा आहे.
दरबार शांत होता. हिरोजींचे शब्द आणि महाराजांचा संवाद प्रत्येक जण कान टवकारून ऐकत होता. या शांततेचा हिरोजींनी भंग केला. ‘‘महाराज एक विनंती आहे. तुमचा चरणस्पर्श करण्याची संधी मिळावी, आम्हावर आपले आशीर्वाद कायम असावेत!’’
‘‘हिरोजी आपल्यात अंतर आहेच कुठे?’’ छत्रपती वदले. सारेच भारावले. हिरोजींनी प्रसंगावधान जपत महाराजांना मुजरा केला आणि म्हणाले, ‘‘महाराज या किल्ल्यावर तुम्ही सदैव असावे असे आम्हाला वाटते. आमची एक इच्छा आहे. तुमचे चरणकमल आमच्या नेहमी दृष्टीस पडावेत.’’
छत्रपती हिरोजींकडे बघतच राहिले. महाराजांनी होकार देताच चुनखडी आणि जस्ताचे मिश्रण असलेले तबक हिरोजींनी मागविले. दोन तबके पुढे आणण्यात आली आणि हिरोजींनी महाराजांना आपले एक पाऊल या तबकात ठेवण्यास सांगितले.
महाराजांनी आपला डावा पाय तबकात ठेवला. तर दुस-या तबकात आपला उजवा हात. स्वत: राजांनी.. दुस-या कुणीही नव्हे, चुन्यामध्ये उठविले आपल्या हाताच्या पंज्याचे आणि पावलांचे ठसे! हिरोजींचा चेहरा प्रचंड उजळला. त्यांना कधी नव्हे तो आनंद झाला होता. तुतारी निनादली. तोफांचे बार उडाले. पुन्हा चौघडा वाजू लागला.
हिरोजींनी या रयतेच्या राजाचे चरणकमल चुनखडीवर मुद्रित करून सिंधुदुर्ग किल्ल्यावर इतिहासाचे एक सोनेरी पान साकारले होते. असंख्य लाटांना झेलत या किल्ल्या�
किल्ल्यावर महाराजांचे चरणकमल आणि हस्तमुद्रेचा दस्तावेज जपत महाराष्ट्रालाच नव्हे तर हिंदवी स्वराज्याला एक नवी ऊर्जा बहाल केली आहे.

Wednesday, 3 June 2015

!!! "समुद्र के किनारे … " !!!





कितने सारे पेड़ चाहिएं नारियल के

इस प्रदेश को हरा-भरा दिखने के लिए

और बगल से, वेग से आगे बढ़ता पानी समुद्र का

जिस पर जलते हुए सूर्य की चिंगारी ठंडी होती हुई।

इस रेतीले तट पर निशान ही निशान लोगों के

जैसे सभी को पहचान दे सकती हो यह जगह।

हवा उठती है बार-बार लहरों की तरह

मेरे पंख हों तो मैं भी उड़ चलूं।

चारों तरफ यात्री ही यात्री

और सामने सूचना पट पर लिखा है

खतरा है पानी के भीतर जाने से

और एकाएक अनुशासन को टटोलता हूं

मैं अपने भीतर।

और यकीन करता हूं कि

खुशियों के  साथ इनका भी कुछ संबंध है।




!!! " महाराष्ट्र किल्ले दश॔न " !!!







!!! " बीजे एक वादळ " !!!

!!! " सफर मैञीची " !!!

 काहीजण मैत्री कशी करतात?



काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.
मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर
मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?
कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात
या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला
आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा या लक्षात गोष्टी


बीजे एक वादळ

Thursday, 2 April 2015

!!! " 3 एप्रिल अत्यंत दु:ख चा दिवस " !!!

३ एप्रिल १६८०
चैत्र शुध्द पोर्णिमा शके १६०२
शौर्य, धैर्य, नितीमत्ता, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत
असलेले व गुलामगीरीच्या साखळदंडात अडकलेल्या
 मानवाला मुक्त करण्यासाठी व ह्या भुतलावर सुवर्ण
स्वराज्य निर्माण करणारे तुमचे आमचे नाही   तर ह्या
सकळ त्रिलौक्याचे पालनकर्ते, तारणहार, राजमान्य
 राजश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत, महापराक्रमी,
महाप्रतापी, महाराजाधिराज श्रीमंत शिवछत्रपती
महाराज हे सर्व त्रिलौक्याला पोरके करुन अनंतात
विलीन झाले. ज्यांच्या उपकाराची परत पेढ
आपण आजन्म करु शकत नाही.
अशा या युगपुरुषाला मानाचा त्रीवार मुजरा.
बीजे एक. वादळ

Thursday, 26 February 2015

!! " मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा " !!

सुप्रभात
आज  २७ फेब्रुवारी...
मराठी भाषा दिन...!!🚩🚩

प्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारी जगभरातले मराठी
भाषिक लोक ‘मराठी भाषा दिवस’
साजरा करतात.

मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर
ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे
औचित्य साधून ‘मराठी भाषा दिवस’
पाळण्याची प्रथा सुरू झाली.

आपल्याला दोन गोष्टी लयं आवडतात
एक म्हणजे ढोल ताशा आणि
दुस़री म्हणजे मराठी भाषा...!!

🚩🚩...जय महाराष्ट्र ...🚩🚩

Monday, 23 February 2015

!! " मराठी चिञपटचा नायक " !!

कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (८ ऑगस्ट, इ.स. १९३२ ; नायगांव, मुंबई - १४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई, महाराष्ट्र) हेमराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वयर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली.विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत.