! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Thursday, 2 April 2015

!!! " 3 एप्रिल अत्यंत दु:ख चा दिवस " !!!

३ एप्रिल १६८०
चैत्र शुध्द पोर्णिमा शके १६०२
शौर्य, धैर्य, नितीमत्ता, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत
असलेले व गुलामगीरीच्या साखळदंडात अडकलेल्या
 मानवाला मुक्त करण्यासाठी व ह्या भुतलावर सुवर्ण
स्वराज्य निर्माण करणारे तुमचे आमचे नाही   तर ह्या
सकळ त्रिलौक्याचे पालनकर्ते, तारणहार, राजमान्य
 राजश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत, महापराक्रमी,
महाप्रतापी, महाराजाधिराज श्रीमंत शिवछत्रपती
महाराज हे सर्व त्रिलौक्याला पोरके करुन अनंतात
विलीन झाले. ज्यांच्या उपकाराची परत पेढ
आपण आजन्म करु शकत नाही.
अशा या युगपुरुषाला मानाचा त्रीवार मुजरा.
बीजे एक. वादळ

Thursday, 26 February 2015

!! " मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा " !!

सुप्रभात
आज  २७ फेब्रुवारी...
मराठी भाषा दिन...!!🚩🚩

प्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारी जगभरातले मराठी
भाषिक लोक ‘मराठी भाषा दिवस’
साजरा करतात.

मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर
ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे
औचित्य साधून ‘मराठी भाषा दिवस’
पाळण्याची प्रथा सुरू झाली.

आपल्याला दोन गोष्टी लयं आवडतात
एक म्हणजे ढोल ताशा आणि
दुस़री म्हणजे मराठी भाषा...!!

🚩🚩...जय महाराष्ट्र ...🚩🚩

Monday, 23 February 2015

!! " मराठी चिञपटचा नायक " !!

कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (८ ऑगस्ट, इ.स. १९३२ ; नायगांव, मुंबई - १४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई, महाराष्ट्र) हेमराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वयर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली.विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत.

Wednesday, 18 February 2015

!!! " एक सचा शिवभक्तताची ईच्छा " !!!

!! मिञहो हे नक्की वाचा !!
!! मिञहो नमस्कार मी बीजे !!
" प्रथम तूम्हाला माझ्या कडून शिवजयंती च्या मराठमोळ्या लाख लाख शुभेच्छा "
" मिञहो थोडा विचार करा, आपले प्रेरणाञोत आणि दैवत असलेले
" श्री शिवछञपती शिवाजी महाराज "
" त्यांनी आपले  अवघे जिवन या मराठी स्वराज्य आणि रयतेसांठी खच॔ केले "
" आणि किल्ले बांधले , अनेक मोठ्या लढयांना सामोय॔ जावून या मराठी रयतेसांठी "
" आपले जिवन व्यतीत केले . त्यांचेच. आज हे किल्ले आणि हा इतिहास आपल्या  "
" पासून दूर जातोय याचे मला आगदी मनापासून दू:ख होतेय आणि तेवढीच खंतही "
" वाटतेय आणि आपण शिवजयंती च्या नावावरुन मोठमोठे डिजिटल बॅनर्स, कक॔श "
" आवाज आणि प्रदुषण करणारे डि.जे , ढोल पथके , झांझ पथके  लावून खूशाल दारू "
" पिऊन धिंगाणा घालतो हे तुम्हाला पटतही असेल पण मला ते पटत नाही म्हणुन "
" सांगतो सुधारा आता आणि हा विनाकारण खच॔ करू नका आणि वाचलेला पैसा "
" आपल्या राजाच्या गढकोट आणि किल्ले संवध॔नासांठी हा देण्यात यावा हीच "
" या  शिवभक्तताची मनापासून ईच्छा आहे आणि तुम्ही या महाराष्ट्रातील तरूनांनी "
" यांत पुढाकार घेवून असे प्रत्यक्षात घडवून आणले तर हा साथ॔ शिवरायांना "
" शिवजयंती दिनी मानाचा मुजराच असेल "
" धन्यवाद "
!!!! " बीजे एक वादळ " !!!!

Tuesday, 17 February 2015

!!! *माझ्या शिवबाच एक राज्य होत स्वर्गाहुन सुंदर ते स्वराज होत* !!!

माझ्या शिवबाच एक
राज्य होत
स्वर्गाहुन सुंदर ते स्वराज
होत
माज नव्हता जिथे
कुणाला जातीचा
आभिमान
दरवळायचा चोहीकडे
मातीचा
संह्याद्रीच्या कडेपारीतुन
सुटणारा सुगंधाचा श्वास
होता ...
प्रत्येकाच्या वाट्याला सुखाचा घास
होता .
जो जगला रयतेसाठी तो राजा काय
होता
कुतहुल कराव जगाने
आसा त्याचा न्याय
होता ..
रयतेच्या भरदशावर
जगणारे बहुत होऊन गेले ..
रयतेसाठी जगणारे माझे
फक्त शिवराय होऊन
झाले ...
!!! शुरवीर
राजा शिवछञपती !!!
हिंदवी स्वराज सस्थापक
पुण्यश्लोक
छञपती शिवाजी माहाराज
एका शिवप्रेमी कढुन
मानाचा मुजरा....
जय जिजाऊ जय शिवराय
!!! जय महाराष्ट्र !!! — 

!!! " शिवराय एक वादळ " !!!

श्वासांत रोखूनी वादळ;
डोळ्यांत रोखली आग;
देव आमुचा छञपती;
एकटा मराठी वाघ;
हातात धरली तलवार;
छातीत भरले पोलाद;
धन्य-धन्य हा महाराष्टू;
धन्य जिजाऊंची औलाद...!!!
श्वासांत रोखूनी वादळ्, डोळ्यांत रोखली आग;
देव आमुचा छञपती, एकटा हिंदु वाघ;
हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद;
धन्य-धन्य हा महाराष्टू, धन्य हे आपले महाराज ||
आम्ही तलवारी सोडल्यापण हात तलवारी चालवायला विसरलो नाहीत ....,
आम्ही नांगर सोडलेपण जमीन फाडायला विसरलो नाहीत...,
तोच रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे...!
डोळ्यातला निखारा लालबुंद आहे....!
पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे...!
आडवे येऊ नका मनातला शिवाजी आजही जिवंत आहे

Sunday, 15 February 2015

!!! " राजा आमचा लय भारी " !!!

गरुडाचं पोर ते, गरुडंच व्हनार ते, रयतेचं भलं ज्यात, तेच करणार ते, भवानीचा अभय त्यासी, कुना नाही भ्ययचं......, गुनी मोठं, थोर व्हतं, लेकरु त्या, 'आईचं'......!, अंगी बळ, अन पाठबळ, ...महादेवाच्या, 'पायचं..........!

"छत्रपती श्री शिवाजी महाराज" सूर्य किरणे गारव्याला होती जाळत शिवनेरी वर भगवा हि होता खेळत.. येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल..... ...मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता... आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता...


!!! " बीजे एक वादळ " !!!