! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 10 November 2014

॥ शिवरायांची आरती ॥

महाराजांच्या कविता
शिवरायांची आरती

जय देव, जय देव, जय जय शिवराया ।
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ॥ धृ ॥


अर्थ :- हे शिवरायातुझा जयजयकारअसो.
तुझ्याशी अनन्यशरण झालेल्याआर्यांचे (भारतीयांचे) तारण करण्याकरता, त्यांच्यावरील आलेल्यासंकटांचे निवारण करण्याकरता तु ये. (धृवपद)

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला ।
आला आला सावध हो शिवभूपाला ।
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला ।
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला ॥१॥


:- या आर्यभूमीवर इस्लामचे आक्रमण आले आहे त्या मुळे हे भूमीच्यापालनकर्त्या शिवराया तू सावध हो. सद्गतित कंठाने ही भूमाता तुजलाआळवत आहे. हा करुणाघन असा आवाज तुझे हृदय भेदून टाकीत नाहीकाय ? (१)

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी ।
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी ।
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता ।
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता ॥२॥
[10:55, 11/11/2014] Fakt BJ: :- शुंभ निशुंभ यांचे निर्दालन करणारी ही जगन्माता. दशानन रावणाचेमर्दन करुन या जगदंबेचे रक्षण श्रीरामांनी केले. असे सपूत ही भारत माताप्रसवली. अशी ही भारतमाता इस्लामच्या छळाने गांजून गेलेली आहे. हेशिवराया तुझ्या शिवाय दुसरा तारणहार या मातेला कोण आहे बरे ?

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो ।
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो ।
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया ।
भगवन भगवदगीता सार्थ कराया या ॥३॥


:- अतिशय त्रस्त झालेले आम्ही दीन लोक तुझ्या शरणास आलेलोआहोत. पारतंत्र्यामुळे आम्हाला मरणकळा आलेली आहे. संतसज्जनांच्या संरक्षणाकरता दैत्यांच्या नाशाकरता परमेश्वर अवतार घेतोअसे गीतावाक्य आहे. श्रीकृष्णाचे हे वाक्य सार्थ ठरवण्याकरता हे शिवरायतुम्ही या. (३)

ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरला ।
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला ।
देशास्तव शिवनेरी घेई देहाला ।
देशास्तव रायगडी ठेवी देहाला ।
देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला ।
बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ॥४॥


:- आर्यमंडळाचा पृथ्वीवरील धावा ऐकून स्वर्गाधिष्ठीत तो शिव राजागहिवरुन गेला. या देशासाठीच तो शिवनेरी गडावर जन्म घेता झाला अन्देशासाठीच रायगडावर देह ठेवता झाला. या देशाला स्वातंत्र्य प्रदान करताझाला.
अशा शिवराजाचा जयजयकार करा. बोला, छत्रपती शिवाजी महाराज कीजय ! (४)

!!सुप्रभात!!

धुक्याची चादर घेऊन
      पहाट यावी .
कोकिळेच्या भूपाळीने
      जाग यावी .
ऊगवत्या नारायणाची
       लाली न्याहाळावी .
गोठ्यातील कपिलेची
     धार चाखावी.
तुक्याची एक तरी
      ओवी गुणगुणावी .
प्रसन्न ,संपन्न आयुष्याची
      प्रार्थना करावी .
एक सकाळ ....
      अशीही अनुभवावी  
   
 !!सुप्रभात!!

Thursday, 6 November 2014

॥ शिवछ्त्रपती ॥

होता तो सिंहाचा छावा
खेळून गनिमी कावा
माजवून रणदुदुंभी रणांगणात
खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात
जिंकून घेतलं आकाश त्यानं
जिंकून घेतले दुर्ग
विशाल सागरालाही पायबंध घातला त्यानं
बांधून सिंधुदुर्ग
नाव होतं त्याचं ''छत्रपती शिवाजी''.

॥ अर्थतज्ञ्ज्ञ शिवराय ॥



स्वराज्याची आर्थिक घडी बसविताना महाराजांना लष्करी आघाडीवर मोगल, आदिलशाही, सिध्दी यांच्याशी लढावे लागले तर व्यापारविषयक आघाडीवर इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज,डच अशा बहुराष्ट्रीय कंपन्या ज्यांच्यामागे त्यांचे अख्खे देश पूर्ण ताकदीनिशी उभे होते अशा बलाढयांशी स्पर्धा करून व्यापार- उद्दीम वाढवावा लागला आणि एकवेळ अशी आणली की जगाकडून जकात घेणारया पोर्तुगीजांना सुध्दा महाराजांना जकात दयावी लागली आणि इंग्रजांच्या तर महाराजांनी मुसक्याच आवळल्या होत्या हे इंग्रजांचे वकील सारखे महाराजांशी बोलणी करायला यायचे यावरून कळते.आर्थिक आघाडीवर दुर्लक्ष करून २२ वर्षे शहाजहान ताजमहल बांधत बसला आणि कर्जबाजारी झाला.महाराजांनी याबाबतीत अत्यंत जागरुक राहून व्यक्तिगत खर्च खुप कमी ठेवून प्रचंड बचत करून तेच पैसे स्वराजच्या भांडवल निर्मितीसाठी गुंतवणूक केले.आयुष्यात केवळ उत्पादक गोष्टीवर गुंतवणूककरीत किल्ले
बांधले पण खर्चाची अनावश्यक बाब म्हणून राजमहल बांधणे टाळले.आर्थिक शहाणपण नव्हते म्हणूनच औरंगजेब कायम लढाया करण्यात गुतंलेला होता. त्यामुळेच आशियातील सर्वात श्रीमंत बादशहा मराठ्यांचा सामना करता करता बाद झाला आणि सर्वात छोटे असलेले स्वराज्य वाढत गेले.महाराज आशियातील सर्वात श्रीमंत राजे झाले. ते याच आर्थिक शाहणपणातून,त्यामुळेच आज ३५० वर्षानंतरही रयत महाराजांना विसरु शकली नाही,ती त्यांच्या लोककल्याणकारी धोरणांमुळेच. जगाच्या इतिहासात शिवाजी महाराज अमर झालेत ते केवळ लढाया जिंकल्या म्हणून नाही तर आर्थिक आघाडीवर महाराजांनी प्रचंड यश मिळवले. १०,००० कोटींच्या सिंहासनावर बसणारे आणि २१ कोटी ६० लाखांच्या तलवारी बाळगणारे तरीही साधेपणाने राहणारे शिवाजी महाराज खरच महान होते.त्यांचा श्रीमंतांना गरीब करणारा समाजवाद नव्हे तर गरिबाला श्रीमंत करणारा समतावाद होता

Wednesday, 5 November 2014

॥ लोकराजा शाहूमहाराज ॥

खुप छान कथा आहे.....
आठवडी बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून
घराकडे निघाली होती. आया-
बाया चपला फरफटत पाय उचलत होत्या.
धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती.
म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताठ
उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून
त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट
झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली.
लाडवांची पुरचुंडी प्लास्टिकच्या पिशवीत
चुंबळीच्या पदराखाली सरकवली.
आजी एस्.टी.च्या खांबाशी पोहोचते,
तो एस्.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुलाने
तिला हटकलंच,
म्हातारे, आज उशीरसा?'
माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज
बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं
खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं
सांगावं, असं तिला पण वाटत होतं. तेवढ्यात
समोरुन मोटार येताना दिसली.
आजीने चकटनं विचार केला, एस्.टी.ला दोन आणे
पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण
अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू!
आजीने आपला काळा फाटकोळा हात
झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून
थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदार गडी वाटला.
तो आजीकडे बघून हसला.
"काय पायजे आजी?" त्यानं
विचारलं.आजीला त्यातला त्यात बर वाटलं.
म्हणाली, "माका सत्तर मैलार जांवचा आसा.
सोडशील रे? "यष्टी चुकली बग!'
ड्रॉयव्हर खाली उतरला.
म्हातारीची पाटी डिकीत
टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर
बसायला सांगितलं. आजी हरकली. चक्क पुढं
बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च
नाही. पण तिला हळहळपण वाटली.
बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही.
ती म्हणाली, "ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता.
मियां तुका तीन आणे देतयं. चलात?''
ड्रॉयव्हर हसत म्हणाला, "आजी, तुला परवडतील
ते दे. तू मला मायसारखी ''
आजीचाजीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच
हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु
झाली.बांगडीवालामुलगा तोंड वासून आश्चर्यानं
पाहत होता. गाडी हलली तसा तो ओरडलाच, "अगे
म्हातारे..... -पण आजीला आता त्याच्याकडे
बघायला सवड कुठं होती?
मऊ गादीवर आजीला फार सुख वाटलं,
एस्.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही.
गाडी कशी भन्नाट निघाली होती. आजीनं
मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले.
दिवस भराच्या उन्हान,धुळीनं ती थकली होती.
आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली.
"आजी, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं.
इथंच उतरायच ना?"
आजी खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून
ड्रॉयव्हरच्याहातावर ठेवले. तेवढ्यात त्यान
डिकीतून तिची पाटी काढून दिली.
म्हाताऱ्या आजीला काय वाटलं कोण जाणे.तिनं
अलवार हातानं पुडी उलगडली.
त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला.
ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली,
"खा माझ्या पुता! "
ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं
आणि म्हातारीकडं डोळे भरुन पाहिलं
गाडी निघाली, तसा बाजूला उभा असलेला माणूस
म्हणाला,
"कुणाच्या गाडीतून इलंय?""
"टुरिंग गाडीतनं." आजी म्हणाली
आजीचं बोलणं ऐकून तो माणूस आणखीच
बुचकळ्यात पडला. तशी आजी खणखणीत
आवाजात म्हणाली
"तीन आणे मोजूनदिलंय त्येका",
"त्यांनी ते घेतलं?
अग म्हातारे तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार
नव्हती ती.आपल्या राजांची गाडी.
या आपल्या  कोल्हापूरच्या शाहु महाराजांच्या शेजारी बसून आलीस
तू!'' दुसऱ्यानं माहिती पुरवली.
"अरे माझ्या सोमेश्वरा, खळनाथा'' म्हणत
म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं
तिन भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय'
म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू
खाणाऱ्या,त्या लोकराजाच्या आठवणीनं,तिच
अंतःकरण भरुन आलं.

याला  म्हणतात " लोकराजा"...

॥ शिवबा लाखात नाही तर जगात एक ॥

अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात
"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" हा 100
मार्काचा पेपर
घेतला जातो.
पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात
"आदर्श राजा असा असावा"
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो.
अनेक देशांमध्ये आदर्श राजे
छत्रपतींचा इतिहास
अभिमानाने शिकवतात.
पण आमचं दुर्दैव.......
आमच्याकडे शिवरायांचा इतिहास
पुसण्याचाच प्रयत्न केला जातो.
गर्व असेल
शिवाजी महाराजांच्या भूमीत
जन्म घेतल्याचा तर आदशॆ ठेऊण शेयर
करा ..
शिवाजी महाराज जर मुसलमानांचे
विरोधक असते
तर …
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख
कोण होता ?
…. "इब्राहीम खान"...!
…. ,
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
…"दौलत खान"....!
…,
शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख कोण होता ?….
"सिद्दी हिलाल"......!
शिवाजी महाराजांचा पहिला
सर-सेनापती कोण होता ?
…. "नूर खान"…. !
शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला …
"मदारी मेहतर"…. …।
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील
…."काझी हैदर" …।
शिवाजी महाराजांचे एकमेव
चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे
नाव
...."मीर मोहम्मद" ……
आणि शिवाजी महाराजांना
अफझलखानाचा वध
करण्यासाठी वाघनख्या पाठवून
देणारा…
"रुस्तुमे जमाल" हा हि मुसलमान…।
जर एवढे मुसलमान
अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात
असू शकतात तर शिवाजी महाराज
मुसलमानाचे विरोधक असू शकतात
काय ?…।
शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड
होते त्यापैकी 10 मुसलमान होते … ….
शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद
पाडली नाही । एकही कुराण जाळले
नाही ….
याचा गांभीर्याने विचार या देशात
झाला पाहिजे ….
रायगड
किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे
जगदीश्वराचे मंदिर बांधले …
महाराजांनी मंत्र्याला विचारले,"जगदीश्
वराचे मंदिर बांधले" पण
माझ्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद कुठे
आहे ?…
मंत्र्याने विचारले महाराज
जागा दाखवा ….??
महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे
आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली
… हा इतिहास आपल्या देशात
का सांगितला जात नाही ?….
हा इतिहास जर समाजापुढे गेला तर
या देशात सामाजिक दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले
……
जिजाऊनि विचारले ,
अफझल खानाचे काय झाले ?
महाराज उत्तरले,
'मासाहेब'
अफझल खान मारला गेला ….
जिजाऊनि विचारले
त्याचं प्रेत कुठ आहे ?
….
महाराज उत्तरले,
प्रतापगडाच्या पायथ्याशी ….
काय म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा... अफझल खान जिवंत
असेपर्यंत त्याच्याशी वैर होते, अफझल
खान संपला(मेला ) आता वैरही संपले...
तुझ्या राज्यात
कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने
तोडावे हे शोभणार नाही ….
त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर …
आणि तुझ्या विजयाचे प्रतिक म्हणून
तेथे स्मारक बांध …। .
शिवाजी महाराजांनी अफझल
खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले
व तेथे त्याची कबर बांधली ….
"जय शिवराय "
""16 व्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला ...
जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला,
पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला ,
ज्याच्या हातुन महाराष्ट्र घङला .""
कृपा करुन
हा आपल्या राजाचा इतिहास
लोकांसमोर आणून
जगाला दाखवा की,
"
आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध
नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता"!!
सर्वाना विनंती आहे कि,
काळजीपूर्वक वाचा व विचार करा .
शक्य तेवढा फोरवर्ड करा..
लाईक आणी कमेंट करण्यापेकश्या शेयर
कले तर खुप आनंद होईल...
॥ जय जिजाऊ-जय शिवराय " ॥

Tuesday, 4 November 2014

॥ जगप्रसिद्ध ताजमहल ॥

ताजमहाल : ईजिप्तमधील पिरॅमिड, ग्रीसमधील पार्थनॉन अशा अद्वितीय व जगातील सात आश्चर्यात भारतातील ताजमहाल या वास्तूची गणना होते.

स्थूलतः १५५६ ते १६५५ ही शंभर वर्षे हा भारतातील मोगल राजसत्तेचा वैभवाचा काळ समजला जातो. याच काळात अकबर, जहांगीर व शहाजहान या तीन बादशहांनी उत्तर भारतावर राज्य केले. तिघेही राजे रसिक, दृश्य कलांची आवड असणारे व कला आणि कलावंतांबद्दल आदर बाळगणारे होते. वास्तुकलेला तर हा काळ फारच भाग्याचा होता. अकबराने वसविलेली फतेपुर सीक्री येथील नवीन राजधानी, सलीम चिश्तीचा मकबरा, सिकंदरा, पंचमहाल; जहांगीराने वसविलेल्या काश्मीर प्रदेशातील शालिमार व निशात या बागा, आग्रा येथील इतमाद उद्दौलाची कबर, शहाजहानने बांधविलेली दिल्लीची जामा मशीद व लाल किल्ल्यातील दिवाण–इ–आम, दिवाण–इ–खास या इमारती याच काळातल्या होत. वास्तूकलेतील पर्शियन–मोगल–भारतीय अशा या परंपरेचा मुगुटमणी म्हणजे शहाजहानने आग्रा येथे बांधविलेली ताजमहाल ही वास्तू होय.

हांगीर बादशहाचे लग्न मिर्झा गियासउद्दीनच्या मुलीशी झाले. हीच पुढे नूरजहान म्हणून प्रसिद्धीस आली आणि तिने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ आग्रा येथे इतमाद उद्दौलाची कबर बांधविली. वास्तुयोजनेचे संकल्पन, देखणेपणा आणि पृष्टभागावरील कलाकुसर यांत ही ताजमहालच्याच तोडीची वास्तुकृती आहे व हिचीच वास्तुपरंपरा ताजमहालने पुढे नेली आहे. जहांगीरचा पुत्र खुर्रम याचे लग्न नूरजहानचा भाऊ असफखान याच्या अर्जुमंद बानू नावाच्या मुलीशी झाले. राज्यरोहणानंतर ही दोघे शहाजहान व मुमताज महल म्हणून प्रसिद्धीस आली. मुमताज १६३१ साली बऱ्हाणपूर येथे पुत्रजन्मात मृत्यू पावली. तिच्या स्मरणार्थ शहाजहानने राजा जयसिंगाकडून विकत घेतलेल्या यमुना तीरावरील एका जागेत, त्याच साली ही वास्तू बांधावयास सुरुवात केली. तिच्या बांधकामात २०,००० माणसे २२ वर्षे खपत होती आणि तिला त्या काळात ६ कोटी रुपये खर्च आला, अशी माहितीबादशाहनाम्यातून मिळते.

ताजमहालच्या वास्तुयोजनेत ताजमहाल हा प्रमुख घटक आहे; पण त्याचबरोबर त्या योजनेत इतरही अनेक घटक आहेत. आपल्या मनावर या वास्तुयोजनेचा जो परिणाम होतो, त्यात या सर्वांचाच वाटा असतो. यासाठी या संपूर्ण वास्तुयोजनेकडे प्रथम बघणे जरूर आहे. (आ. १) : यमुनेच्या तीरावर, प्रवाहाला काटकोनात असलेला ५७९·१२ मी. (१,९०० फूट) X ३०४·८० मी. (१,००० फूट) असा दक्षिणोत्तर पसरलेला लंबचौकोन. त्यातल्या मधल्या ३०४·८० मी. X ३०४·८० मी. या समचौकोनात विस्तीर्ण बाग, तीरावरील १३७·१६मी. (४५० फूट) X ३०४·८० मी. या चौकोनात मध्यभागी ताजमहाल व त्याच्या दोन्ही बाजूंना मशीद व जवाब अशा दोन इमारती; अलीकडील १३७·१६ मी. X३०४·८० मी. या चौकोनात प्रवेशद्वार, चौक, ओसऱ्या व बाजार. या सर्वांभोवती एक उंच, लाल दगडांतून बांधलेली भिंत. आग्र्यावरून येताना ताजमहाल पूर्णपणे दिसतच नाही, त्याचा घुमट फक्त दिसतो. पुढच्या प्रवेशद्वारातून आत गेले व चौकातून डावीकडे वळले, की ताजमहालासमोरील विस्तीर्ण बागेचे प्रवेशद्वार दिसते. या प्रवेशद्वाराच्या चौकटीतूनच ताजमहाल संपूर्ण असा प्रथमच दृष्टीस पडतो. या लाल दगडांतून बांधलेल्या भव्य प्रवेशद्वारातील टोकदार कमानीभोवती पांढऱ्या संगमरवरी अक्षरांनी कुराणातील आयते कोरेलेले आहेत. प्रवेशद्वारापलीकडे असलेल्या चौथऱ्यावरून बघतांना खाली पसरलेली विस्तृत बाग दिसते. गर्द हिरवळींचे चौकोन; बहुरंगी फुलांनी बहरलेल्या वृक्षवेली; पूर्व–पश्चिम व उत्तर–दक्षिण मध्यरेषांवर, कारंजी असलेले वाहत्या पाण्याचे पाट; या पाटाभोवती लाल दगडांच्या पाउलवाटा आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना रांगेने लावलेली निरुंद, उंच सुरुची झाडे. पश्चिम वाट्यांच्या टोकांवर भिंतीतील प्रवेशद्वारे; बागेच्या मध्यभागी थोडा उंच असा पांढऱ्या संगमरवरातील चौथरा, त्यात सुंदर तळे; समोर रुंद लाल दगडांचा चौथरा, त्यावर दोन्ही बाजूंना दोन इमारती व त्यामध्ये एका उंच पांढऱ्या संगमरवरी चौथऱ्यावर ताजमहालची मुख्य वास्तू; मागे निळे आकाश व ढग. ज्या चौथऱ्यावर ताजमहाल उभा आहे, तो ९५·४० मी. (३१३ फूट) ९५·४० मी. व ६·७० मी. (२२ फूट) उंच. ताजमहालची वास्तू ही ५६·७० मी. चा (१८६ फूट) घनचौकोन. मूळ चौकोनाकृती; तथापि कोन छाटल्यामुळे अष्टकोनी झालेली. चार दिशांच्या चार प्रमुख बाजूंना २८ मी. (९२ फूट) उंचीची टोकदार कमानीची प्रवेशद्वारे आणि कोपऱ्यांच्या बाजूंत खोल महिरपी आणि वर छोट्या घुमट असलेल्या चार छत्र्या. वास्तूच्या आत मध्यभागी दोन कबरी (या दर्शनापुरत्या; खऱ्या कबरी खाली तळघरात) आणि वास्तूवर १७·६७ मी. (५८ फूट) व्यासाचा, २२·५५ मी. (७४ फूट) उंचीचा कंदाकार घुमट. सर्व प्रमुख पृष्टभागांवर संगमरवर कोरून आत रंगीत खडे बसवून केलेले मीनाकाम व इतर पृष्टभागांत कोरीव संगमरवरी जाळ्या. प्रमुख वास्तूच्या चौथऱ्याच्या चारी कोपऱ्यांवर ४१·७५ मी. (१३७ फूट) उंचीचे तीन सज्जे व अगदी वर खांबावर घुमट असलेले चार मनोरे (आ. २).

ताजमहालच्या वास्तुयोजनेतील भिंत, प्रवेशद्वारे, पाउलवाटा, चौथरा, मशीद व जवाब या इमारती हे सारेच घटक फत्तेपुर सीक्रीच्या लाल दगडांतून बांधलेले आहेत. प्रमुख वास्तू, तिच्या खालील चौथरा, मनोरे, सर्व लहानमोठे घुमट व बागेच्या मध्यभागी असलेल्या तळ्याभोवतीचा चौथरा हे घटक मक्रानाहून आणलेल्या पांढऱ्या संगमरवरातून घडविलेले आहेत.

से हे सगळे या वास्तुयोजनेचे घटक. प्रवेशद्वारातून होणारे ताजमहालचे पहिले दर्शन हा एक अनुभव असतो. बाजूच्या उंच दगडी भिंतीमुळे आतील संपूर्ण विश्व बाहेरच्या विश्वापासून विलग केले जाते, स्वयंपूर्ण होते व प्रेक्षकाला ताब्यात घेते. समोरच्या हिरव्या, पिवळ्या, निळ्या रंगसोहळ्यात ताजमहालची शुभ्र संगमरवरी वास्तू  कारात्म भासते, वास्तू’ म्हणून न जाणवता कमानीतील एक चित्र म्हणून जाणवते. या वास्तूला वजनच नसावे, ती हलकेच जमिनीवर टेकलेली असावी, असे वाटून दृष्टिभ्रम होतो व दुरून पाहताना तिचा आकार प्रत्यक्षात केवढा असावा, याचा अंदाज करता येत नाही. हलत्या पाण्यात सततच दिसणाऱ्या प्रतिबिंबामुळे वास्तूचा वास्तुपणा सततच कमी होत जातो. वास्तूतील घुमट–कमानींच्या लपेटदार रेषा भुरळ घालतात (आ. ३). बहुरंगी खड्यांतून केलेल्या कोरीवकामामुळे त्याचा संगमरवरी पृष्टभाग दिवस–रात्रीच्या निरनिराळ्या प्रहरांत हलकेच छटा बदलतो. सकाळच्या धुक्यात दुरून बघताना ताजमहाल काचेवरील अस्पष्ट प्रतिबिंबासारखा वाटतो. दुपारच्या उन्हात बाग, शांतता, वाहते पाणी, गर्द फुलांमागील शुभ्र ताजमहाल हे सारे वातावरणच अद्‌भूत, परिकथेसारखे वाटते आणि रात्रीच्या मंद चंद्रप्रकाशात दुःखाच्या नयनांतील एक अश्रू, पृथ्वीवर उतरलेला पांढरा मेघसंगमरवरी स्वप्न अशी त्याची केली जाणारी वर्णने खरीच वाटू लागतात. रेषा, आकार, घनता, पृष्टभाग, छायाप्रकाश, अवकाश, निसर्ग–वनश्री, पाणी याच साधनांच्या या योजनेत केलेल्या अतिनाजुक, सुजाण उपयोगातून एका अद्वितीय वास्तूकृतीची निर्मिती झाली आहे.

ताजमहालचा वास्तुशिल्पी कोण असावा, याबद्दल निश्चितपणे सांगता येत नाही; परंतु उपलब्ध माहितीवरून तो उस्ता इफांदी नामक एक पर्शियन असावा, असे मानायला जागा आहे. अकबराच्या काळातील  वास्तुकलेत–त्याच्या धर्मविषयक कल्पनांत होते, तसेचमोगल व हिंदू अशा दोन्ही शैलींचे मिश्रण आढळते. परंतु योजनेचे संकल्पन, वास्तूतील व बाहेरील अवकाशाची विशिष्ट अशी जाणकारी, भूमितिबद्ध आकारांचा उपयोग, प्रमाणशीलता, घनता व द्विपरिमाणी चित्रात्मकता यांचा एकत्र उपयोग, पृष्टभागावरील रंगीत मौल्यवान खड्यांतून केलेले कोरीवकाम व त्यातही केवळ पाने, फुले, वेली यांचाच केलेला वापर, मध्यरेषांभोवतीची समभाग मांडणी, वाहते पाणी या घटकाला योजनेत दिलेले महत्त्व, बागेचा उपयोग आणि अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन विचार करता, ताजमहालची वास्तुपरंपरा ही पर्शियन वास्तुकलेचीच परंपरा आहे. फक्त लाल दगड व पांढरा संगमरवर यांच्या एकत्र अशा उपयोगाने, तसेच सर्वच कलावंत आणि कामगार हे भारतीय असल्याने योजनेत अपरिहार्यपणे आलेले हिंदू, मोगल वास्तुशैलींतील बारकावे यांच्यामुळे ताजमहालच्या मूळ पर्शियन संकल्पनेचे प्रत्यक्षातील रूप पार्शियन–मोगल–भारतीय असे झालेले आढळते