! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Wednesday, 15 October 2014

॥ महाराष्ट्र माझा ॥


महाराष्ट्र राज्य:नकाशा
महाराष्ट्रातील नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा रामायणमहाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून उपलब्ध आहे.
राजकीय कालखंडानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीजविजापूरमोगलमराठाहैदराबादचा निजामइंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.

प्राचीनकाळEdit

नावाचा उगम

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. (पुरावा हवा!) अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे ह्युएनत्संग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महा-कंतारा (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे. महाराष्ट्राचा इतिहास

पारधी-भिल्ल समाज

पहिले शेतकरी

मध्यपाषाणकालामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व ४०००मध्ये धान्याची लागवड तापी नदीच्या खोऱ्यात सुरू झाली. महाराष्ट्रातील जोर्वे येथे जे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमतः सापडले, ते इसवी सन पूर्व १५००चे आहेत. या संस्कृतीचे नाव त्या गावाच्या नावावरून ठेवले आहे. त्या गावात मुख्यतः रंगवलेली व तांब्यापासून बनवलेली भांडी आणि शस्त्रे सापडली. तेथील लोक कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. तेथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली होती. ते विविध पिके उगवत होते. तेथील घरे मोठी चौकोनी, चटयांपासून व मातीपासून बनवलेली असत. कोठारांत व कणगीत धान्य साठवत असत. स्वयंपाक दोन कोनी चुलींवर घरात केला जाई, व बाहेर जाळावर प्राण्यांचे मांस भाजले जाई.

अश्ववाहक/राऊत समाज

पहिले नागरिकीकरण

मौर्य ते यादवEdit

(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)

मौर्य साम्राज्याचा काळ

महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.

सातवाहन साम्राज्याचा काळ

सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.

वाकाटकांचा काळ

वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.

कलाचुरींचा काळ

वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.

बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ

वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.

वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ

वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.

यादवांचा काळ

महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली.
यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्यEdit

अजिंठातल्या लेणी
महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे ३ऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. कालांतराने महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगधसाम्राज्याचा एक भाग झाला. सोपारा हे बंदर (हे मुंबईच्या उत्तरेस असून आज नालासोपारा या नावाने ओळखले जाते) प्राचीन भारताच्या व्यापाराचे केंद्र होते. या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, एडन व कोचीन या ठिकाणी व्यापार होत असे. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स ७८मध्ये गौतमीपुत्र सत्कारणी (शालिवाहन) हा महाराष्ट्राचा राज्यकर्ता होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही चालू आहे.
१३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला. दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मोहंमद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स.१३४७ तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बाहमनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले. १६व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मुघल साम्राज्यांशी संलग्न असलेल्या अनेक इस्लामी राजवटींनी मध्य महाराष्ट्र व्यापलेला होता तर किनारपट्टीवर मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराच्या हेतूने आलेल्या पोर्तुगीज यांचा अंमल होता.

मराठा साम्राज्याचा उदयEdit



छत्रपती शिवाजी महाराज
१६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजे भोसल्यांनी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणगड जिंकला आणि १७व्या शतकाच्या मध्यास पश्चिम महाराष्ट्रात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवाजीराजांमुळे प्रथमच विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मोगल साम्राज्याविरोधात स्वतंत्र मराठा राज्य उदयास आले. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजी महाराजांना १६७४ मध्ये राज्याभिषेक झाला.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना औरंगजेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. मोगलांनीसंभाजीराजांचे धाकटे बंधु राजाराम यांना दक्षिणेस पिटाळले. राजाराम भोसल्यांनी जिंजी किल्ल्याची दुरुस्ती १८व्या शतकाच्या सुरुवातीस केली, जेव्हा तेथील परिस्थिती सुधारली होती.
राजारामांचे पुतणे शाहू भोसले हे १७०८ साली मराठी दौलतीच्या गादीवर बसले. या कामास त्यांचे पेशवे (मुख्य मंत्री) बाळाजी विश्वनाथयांची साथ मिळाली. राजारामांची विधवा पत्नी ताराबाई यांच्याशी शाहू भोसले यांचे मतभेद होते.
चार दशकांनंतर 'छत्रपतींच्या' (भोसले राजघराण्यातील) नावाने राज्यकारभार पाहणाऱ्या पेशव्यांच्या हाती मराठा साम्राज्याची सूत्रे आली. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले.

पेशव्यांचा काळEdit

बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव (पहिले) यांनी मराठा राज्य चालवले. त्यांनी मोगल राज्यांकडून कर व सरदेशमुखी व चौथाई यांच्यासारखा सारा वसूल करण्याची प्रथा पाडली. पेशव्यांनी ग्वाल्हेर शिंदेंना, इंदूर होळकरांना, बडोदा गायकवाडांना तर धार पवारांना दिले.
पेशव्यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली (पानिपत), गुजरात (मेहसाणा), मध्य प्रदेश (ग्वाल्हेर, इंदूर), व दक्षिणेस तंजावरपर्यंत मराठी राज्य वाढविले.
इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालींनी पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याचा एकसंधपणा नष्ट झाला व साम्राज्याची अनेक संस्थानांत विभागणी झाली. पेशव्यांचे माजी सरदार आपआपले राज्य सांभाळू लागले तर पुणे पेशवे परिवारांकडे राहिले. भोसल्यांची एक शाखा कोल्हापुरातशाहूच्या काळातच गेली होती तर मुख्य शाखा सातारा येथेच राहिली. कोल्हापूरचे भोसले म्हणजेच राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांचे वंशज. त्यांनी इ.स.१७०८ रोजी शाहूंचे राज्य अमान्य केले. १९व्या शतकापर्यंत कोल्हापूरच्या भोसल्यांनी छोट्या भूभागावर राज्य केले.
== ब्रिटिश """ BUAY76vt hiuhb89y 7 uiyqa78t

ब्रिटिशांना विरोधEdit

चित्र:Balgangadhartilak.jpg
लोकमान्य टिळक
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स.१७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१८मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांचे राज्य काबीज केले. सध्याच्या महाराष्ट्राचा विदर्भ आणि मराठवाडा सोडून इतर हिस्सा ब्रिटिशांच्याबॉम्बे प्रेसिडेन्सीचा एक भाग होता. बाँबे प्रेसिडेन्सीला मराठीत मुंबई इलाखा म्हणत. मुंबई इलाख्यात कराचीपासून ते उत्तर कर्नाटक(धारवाड, हुबळी, बेळगांव, कारवार, विजापूर्)पर्यंतचे भूभाग समाविष्ट होते. अनेक मराठी राजे ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य संभाळीत होते. आजचे नागपूरसातारा व कोल्हापूर हे त्या काळात विविध राजांच्या ताब्यात होते. सातारा इ.स.१८४८ साली मुंबई इलाख्यात तर नागपूर इ.स.१८५३साली नागपूर प्रांतात (व नंतर मध्य प्रांतात) सामील करण्यात आले.. (वऱ्हाड)बेरार हा हैदराबादच्या निजामाच्या राज्याचा एक भाग होता. ब्रिटिशांनी इ.स १८५३ मध्ये बेरार काबीज केले व १९०३ मध्ये मध्य प्रांतात समाविष्ट केले. मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांना सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोई-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उगारला, जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद होते.

सामाजिक पुनर्रचना चळवळEdit

महाराष्ट्र राज्याची निर्मिती

हुतात्मा स्मारक,मुंबई
भारताला इ.स.१९४७ साली स्वातंत्र्य लाभले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरुन मराठी-जनात क्षोभ उसळला. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकणमराठवाडापश्चिम महाराष्ट्रदक्षिण महाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रविदर्भ एकत्र करून सध्याच्यामराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली.
१९ व्या शतकापासून विविध मराठी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी व समाजाने सामाजिक उत्क्रांती आणि राजकीय स्वातंत्र्याकरिता मोठ्या प्रमाणावर मोलाचे योगदान केले. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागास एकत्र आणले. स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय दृष्ट्या यशस्वी अशा सहकारी चळवळी आणि जातीय गणितातील प्रभुत्वाने काँग्रेस पक्षाचे शासनात वर्चस्व राहिले. राजकीय समीकरणात मराठा समाज व पश्चिम महाराष्ट्र सदैव अग्रणी राहिला.
श्री. य. दि. फडके या इतिहासकारांनी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा काळाचा उद्बोधक आढावा घेतला आहे.
Ilou== स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राचे योगदान ==


संयुक्त महाराष्ट्र चळवळEdit

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबईकोकणदेशविदर्भमराठवाडाखानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगावनिपाणीकारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.

॥ अप्रतिम माळशेज घाट ॥

माळशेज घाट

पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील एक घाट. हा राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील घाट आहे.

खोपीवली गावातून दिसणारा माळशेज घाट

माळशेज घाट
आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिझॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.

इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’. फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल.
माळशेज घाटातल्या रेस्ट हाऊसच्या मागे हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात.
पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागेल.

कसे जाल?Edit

पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते, किंवा मुंबईहून-कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते.

पक्षी निरीक्षण

येथील पिंपळगाव जोगा धरणामध्ये स्थलांतरित पक्षी येतात.

राहण्याची सोय

कल्याण माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी सावर्णे गावात रस्ता संपतो येथे हॉलिडे रिझॉर्ट झाले आहे. हॉटेलवर गाडी उभी करून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी. कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल. स्थानिक वाटाड्या बरोबर असेल तर धबधब्यापर्यंत आपल्याला जाता येते

हेसुद्धा पाहा

Tuesday, 14 October 2014

॥ वेरूळ / अजिंठा लेणी ॥

अजिंठा

इतिहास

प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. कालांतराने तिचे रूपांतर एका नितांतसुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनांत झाले. मात्र या लेण्यांची मूळ रचना एखाद्या धार्मिक शिक्षणसंस्थेसारखी आहे.पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स.पूर्वीच्या दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धाचे दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांचा राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते.वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी नियोजित भव्यतेपासून वंचितच राहिली.

रचना

लेणे क्रमांक १अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. लेणी नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत.हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी ९ व १० क्रमांकाची लेणी ही चैत्यगृह आहेत व १२, १३ ही लेणी आणि १५-अ क्रमांकाचे लेणे विहार आहे. महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत.विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्यांची लांबी-रुंदी १७ मीटर (५२ फूट) पर्यंत आहे. हे विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृह हे पारंपरिकरीत्या पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली. बऱ्याच विहारांना सोपा व आंगण करण्यात आले व तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आली.

वेरूळ

महाराष्ट्रातल्या मराठवाडा भागात औरंगाबाद शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटे खेडेगांव आहे. येथे प्राचीन काळात कोरलेली १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरूळ आहे.वेरूळची लेणी साधारणत: इ.स.च्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातली बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांमधली परस्परसहिष्णुता प्रकर्षाने दाखवतात.वेरूळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी व जैन लेणी अशी विभागणी केली जाते.

वेरूळची लेणी

भारतातील महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २३ किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत, दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीकडे या लेण्यांची मालकी जाईपर्यंत इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. १९५१साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपविण्यात आले.एक युरोपियन प्रवासी कॅप्टन जॉन बेंजामिन सिली याने इ.स. १८१० मध्ये वेरूळ लेण्यांना भेट दिली होती. मुंबईहून पायी प्रवास करून तो वेरूळला पोहोचला होता. द वंडर्स ऑफ एलोरा या १८२५ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात त्याने वेरूळ आणि आजूबाजूच्या परिसराची इत्थंभूत हकीकत लिहिलेली आहे.बौद्ध लेणीवेरूळची बौद्ध लेणी येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत. ही लेणी मुख्यत्वे विहार रूपाची आहेत. काही विहारांतून पूजेसाठी मूर्तीही आहेत.यांपैकी प्रसिद्ध लेणे म्हणजे विश्वकर्मा लेणे. अनेकमजली प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण स्तूपापाशी पोचतो. या स्तूपाच्या वरच्या भागातील दगड जणू लाकडी वासेच वाटावे असा कोरलेला आहे. या स्तूपात बुद्धाची धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील मूर्ती आहे.

लेणे क्रमांक १

बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी या लेण्यात एकूण आठ खोल्या खोदलेल्या आहेत. खांबाशिवाय खोदलेली ही गुंफा वेरूळ येथील सर्वात जुनी गुंफा आहे. या लेणीत गाभारा नाही तसेच कुठल्याही प्रकारची मूर्ती अथवा प्रतिमा नाही. वेरूळची ही पहिल्याच क्रमांकाची लेणी अगदी प्राथमिक स्वरूपातील आहे.

लेणे क्रमांक २

बौद्ध भिक्षूंना राहण्याबरोबरच बुद्धाची पूजा, मनन व चिंतन करता यावे म्हणून या लेणीत पाठीमागील भिंतीमध्ये गाभारा खोदलेला आहे. या गाभाऱ्यात बुद्धप्रतिमा कोरलेली आहे. या लेणीत गोल स्तंभशीर्षांचे कोरीवकाम आहे. लेणीच्या प्रवेशद्वारावर दोन बाजूला पद्मपाणी आणि वज्रपाणी हे बोधिसत्व द्वारपालाच्या रूपात आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या आत डाव्या भिंतीमध्ये एका स्त्रीदेवतेची मोठी मूर्ती आहे. गाभाऱ्यात बसलेली बुद्धप्रतिमा असून बुद्धाचे पाय उमललेल्या कमलासनावर टेकलेले आहेत. बुद्ध बसलेले आसन चौकोनाकृती व त्यावर सिंहप्रतिमा कोरलेल्या आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूला चामरधारी बोधिसत्व आहेत.

लेणे क्रमांक १० (विश्वकर्मा लेणे)

हे लेणे म्हणजे एक चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाला वरचा मजला असून सज्जा कोरलेला आहे. सज्जाच्या कठड्यावर अनेक लहान शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. सज्जाच्या आतील भिंतीवर भरतनाट्यम नृत्यप्रकार करणाऱ्या एका नर्तकीचे शिल्प कोरलेले आहे. चैत्यगृहाच्या मुख्य कमानीवर तीन अर्धवलये कोरलेली आहेत. त्यांना त्रिदली बिल्वतोरण असे म्हणतात. केवळ बौद्धधर्माच्या प्रसाराचा दृष्टिकोन न ठेवता कलाकारांनी सौंदर्याभिरूची या लेण्यात दाखवल्यामुळे सुरुवातीच्या काळात खोदलेल्या इतर लेण्यांपेक्षा स्थापत्यकलेच्या दृष्टीने विश्वकर्मा लेणे सरस आहे. या लेण्याच्या समोर खूप मोठे प्रांगण असून या या प्रांगणाच्या सभोवताली असणाऱ्या दगडी भिंतींमध्ये लेण्याचे प्रवेशद्वार खोदलेले आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला एका कोनाड्याच्या भिंतीवर दोन ओळींमध्ये लिहिलेला ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे.[१] प्रांगणाच्या तीनही बाजूला वऱ्हांडा आहे. याच्या दोन्ही बाजूंना खोल्या असून मधोमध गर्भगृह आहे. चैत्यगृहामध्ये पाठीमागच्या बाजूला स्तूप आहे. स्तूपावर असणारी छत्रावली नष्ट झालेली आहे. स्तूपाच्या पुढील बाजूस प्रलंबपादासनात सिंहासनावर बसलेली बुद्धाची प्रतिमा आहे.

लेणे क्रमांक ११ (दोन ताल लेणे)

दोन ताल म्हणून ओळखली जाणारी हे लेणे प्रत्यक्षात तीन मजली आहे. लेण्यात वरपर्यंत जाण्यासाठी दगडात घडवलेल्या पायऱ्या आहेत. पहिल्या मजल्यात विशेष दखल घेण्याजोगे शिल्पकाम नाही, मात्र मजल्याच्या मध्यभागी असणाऱ्या गर्भगृहात चौकोनी आसनावर भगवानबुद्धाची पद्मासनात योगमुद्रेत बसलेली प्रतिमा आहे. दुसऱ्या मजल्यावर चार गर्भगृहे आहेत. पहिल्या गर्भगृहात असणाऱ्या बुद्धाच्या उजवा हात भूस्पर्श मुद्रेत असून डावा हात योगमुद्रेत मांडीवर ठेवलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचे गर्भगृह आकाराने छोटे आहे. यातही बुद्धप्रतिमा आहे. तिसरे गर्भगृह वऱ्हांड्यापेक्षा खाली असल्यामुळे दोन तीन पायऱ्या उतरून खाली जावे लागते. चौथ्या गर्भगृहात व्याख्यान मुद्रेत बसलेल्या बुद्धाची प्रतिमा आहे. तिसरा मजला म्हणजे खूप मोठा प्रशस्त विहार आहे. विहारामध्ये ठिकठिकाणी खोदकाम सुरू केल्याच्या खुणा आहेत पण ते अर्धवट अवस्थेत सोडलेले आहे.

लेणे क्रमांक १२ (राजविहार लेणे)

तीन ताल किंवा राजविहार या नावाने प्रसिद्ध असलेली हे लेणे तीन मजली आहे. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन बाजूला दोन सिंहप्रतिमा आहेत. आत समोरच चौकोनी प्रशस्त प्रांगण आहे. वऱ्हांड्यातील स्तंभांची रचना चौकोनी आहे. या लेण्याचा पहिला मजला अनेक स्तंभांनी आधारलेला आहे. या मजल्यावर असलेल्या खोल्यांमध्ये दगडी चौथरे व त्यावर डोके टेकण्यासाठी दगडी उशा खोदलेल्या आहेत. या लेण्यात मागच्या बाजूला गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बोधिसत्व कोरलेला आहे. त्याच्या डाव्या हातातील कमलपुष्पावर पुस्तक ठेवलेले आहे. गर्भगृहात आत सिंहासनावर धम्मचक्र परिवर्तन मुद्रेतील बुद्धप्रतिमा आहे.हिंदू लेणीवेरूळच्या हिंदू लेण्यांची शैली इतर लेण्यांपेक्षा अगदी वेगळी आहे. ही लेणी म्हणजे शिल्पकारांनी कातळात कोरलेली अतिप्रचंड शिल्पेच आहेत. यातील बरीचशी लेणी वरपासून सुरू करून खालपर्यंत कोरीवकाम करीत निर्मिलेली आहेत. असे शिल्प किंवा बांधकाम करण्यासाठी शिल्पकार/कारागीरांच्या अनेक पिढ्या खर्ची पडल्याचा उल्लेख आहे.

लेणे क्रमांक १६ (कैलास मंदिर)

वेरुळचे कैलास मंदिरवेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे. ह्या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर आहे. ते मंदिर निर्माण करायला अंदाजे २ लाख टन वजनाचा एका अखंड खडक वापरण्यात आला असून तो उघडपणे वरून खाली म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून कोरण्यात आला असला पाहिजे आणि ते प्रचंड खोदकाम/कोरीवकाम पुरे व्हायला कित्येक दशके लागली असणार. ह्या मंदिराच्या निर्मितीमागचे असामान्य शिल्पज्ञान ह्या गोष्टी हजार-दीडहजार वर्षांपूर्वी ज्या माणसांना अवगत होत्या त्यांची नावेही इतिहासात कोणी नोंदवलेली नाहीत.आज कैलास लेण्यातील शिवलिंगाची पूजा होत नाही ही पूजा कधीपासून बंद पडली हे सांगता येत नाही परंतु इ.स. १८१० च्या सुमारास कैलास लेण्यातील मंदिरात पूजाअर्चा होत होती व गाभाऱ्यासमोरील मंडपामध्ये साधुसंत राहत असत.[२]जैन लेणीवेरूळची जैन लेणी तुलनेने लहान आहेत व जैन धर्माची वैराग्यभावना दर्शवितात. याबरोबरच बारीक कोरीव काम व चित्रे ही या लेण्यांची वैशिष्ट्ये आहेत.

घृष्णेश्वर मंदिरEdit

वेरूळ लेण्यांपासून जवळच हे मंदिर आहे. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे.

अजिंठा-वेरूळ लेण्यांना कसे जावे?

रस्ता मार्गेऔरंगाबाद शहर मुंबई, नागपूर, पुणे वगैरे अनेक शहरांशी राज्य महामार्गने जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ औरंगाबाद ते मुंबई दरम्यान आरामगाड्या (luxury buses) चालवते (अंतर सुमारे ३९२ कि.मी.). अजिंठा लेणी जळगांव शहराच्या जवळ आहेत, तर वेरूळची औरंगाबादजवळ.लोहमार्गे (रेल्वे)औरंगाबादकडून मुंबई, आग्रा, दिल्ली, भोपाळ, हैदराबाद ह्या शहरांकडे थेट लोहमार्ग आहेत. हिवाळ्यात डेक्कन ओडिसी ही खास रेल्वे अभ्यागतांना औरंगाबाद(अजिंठा-वेरूळ)ची सफर घडवते.चाळीसगांव, मनमाड, परभणी, पूर्णा आणि नांदेड या रेल्वे स्थानकांवर उतरून रस्तामार्गे औरंगाबादला जाणेही शक्य आहे. जळगांव स्टेशनवर उतरून आधी अजिंठा पाहून मग वेरूळला जाता येते.विमान मार्गेऔरंगाबादहून ३० कि.मी. अंतरावर चिकलठाणा गावी एक विमानतळ आहे. मुंबई-दिल्ली-जयपूर-उदयपूर आणि औरंगाबाद ह्या शहरांमधे सध्या विमानांची येजा असते.

लेण्यांना भेट देण्याकरता सगळ्यात चांगला कालावधीEdit

उन्हाळ्याचे एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने सोडून वर्षातला इतर नऊ महिन्यांचा कालावधी लेण्यांना भेट देण्याकरता चांगला असतो. उन्हाळ्यात त्या परिसराचे सरासरी तपमान ४०-४४ सेल्सिअस (१०४-११२ फॅरनहाइट) अंशांपर्यंत जात असल्यामुळे त्या काळात प्रवास दगदगीचा होऊ शकतो.

लेणी पहायची वेळ




सोमवार आणि राष्ट्रीय सुट्ट्यांचे दिवस सोडून इतर दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अभ्यागतांनी पहाण्याकरता लेणी उघडी असता

॥ कळसूबाई शिखर ॥

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.


नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते.

॥ मतदान करा फरक पडतो ॥

                             

                                 मिञहो तूम्ही समजदार अहात ॥
                     ॥ सूजान अहात तूम्हाला चांगले वाईट सगळे समजते ॥
                          ॥ म्हणूनच सांगतो मतदान करा फरक पडतो ॥
             ॥पण अशा ऊमेदवाराला मतदान करा जो शिक्षित तसेच सूशिक्षित असेल ॥
    ॥ त्याच्या वर कूठलाही गूनहा नसावा व काहीतरी बद्दल करण्याची त्याची ईच्छा असावी ॥
॥ तूमचे मतदान या महाराष्ट्रचे भविष्य बदलू शकतो म्हणूच सांगतो मतदान योग्य माणसाला करा ॥
                                    ॥ धन्यवाद ॥ फक्त बीजे ॥