! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 10 October 2014

" || मुरुड जंजिरा वरील आक्रमण || "



|| सळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला ||ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता.जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे. कोकणातील बायका पाळावयाचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराज्याकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजी राजे खूप क्रोधीत झाले.त्यांनी जंजिरेकर सिद्धांच्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. पण त्यांना माहित होते कि जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिर्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले कि या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे.याच बेतासाठी त्यांनी बोलावणे धाडले कोंडाजी फर्जद याला. कोण होता हा कोंडोजी फर्जद ? हा होता हिरोजी फर्जदांचा मुलगा. आग्रा भेटीत शिवाजी महाराजांचे सोंग घेवून झोपलेले हिरोजी. संभाजी राजांनी कोंडोजी च्या कानात आपला बेत सांगितला. आणि मग निघाला कोंडाजी. आपल्या सोबतीला ४० / ५० मावळे घेवून निघाला. आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धी समोर आला, आणि त्याने सिद्धी ला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली. सिद्धी ला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला. कारण शंभू राजांचा एक शूर मावळ त्यांना येवून मिळाला होता. सिद्धी ने त्याला आपली चाकरी दिली. आणि मग काय, कोंडाजी सिद्धी ची सेवा करू लागला. पण त्या कोंडाजी च्या काळजात वेगळाच डाव होता, त्याच्या शंभू राजांचा. कोंडाजी चे मन मात्र शंभू राज्यांकडे होते.संभाजी महाराजांनी कोंडाजी ला सांगितलेला डाव असा होता कि जंजीऱ्याचा सगळा दारू गोळा उडवून द्यायचा. आणि याच धाडसी डावासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजीऱ्यात पाठवले होते.दिवस ठरला, सुरुंग पेरले गेले, कोंडोजी फर्जदांचे साथीदार दर्यात गलबते घेवून उभे होते. कोंडोजीची बायको सुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता, तिची एक दासी होती, त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. कोन्डोजीकडे वेळ नव्हता, त्याने बायकोची मागणी मान्य केली,मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली कि मी माझे कपडे व काही समान बरोबर घेवून येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धी च्या दरबारा कडे गेली. सिद्धी ला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले, जंजीऱ्या वरचे सगळे मराठे कापले गेले.पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता. त्याने जंजीऱ्या वरून खवळलेल्या समृद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत घरून किनार्याच्या दिशेने पोहू लागला. कशासाठी ? जीव वाचवण्यासाठी नाही. तो पोहोत होता संभाजी राजांना घडलेल्या दुखःद घटनेची माहिती देण्यासाठी. कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडोजी चा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोहोचला. त्याने घडलेली हकीकत शंभू राजांना सांगितली. तसा शंभू राजांना फार मोठा धक्का बसला. कोंडोजी फर्जद हा एक शूर आणि थोर सरदार तर होताच पण त्यांना खूप जवळचा होता. राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण राजाला भावनाविवश होवून चालत नाही. शंभू राजांनी ठरवले कि कोंडोजी चे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी वीस हजाराची सेना आणि तीनशे गलबते घेवून राजांनी जंजीऱ्यावर आक्रमण केले. आणि मग कडाडले संभाजी राजे, “डागा तोफा किल्ल्यावर.”मग मात्र किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरु झाल्या. मराठ्याच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. सिद्धीचा शिशमहाल चकणाचुर झाला होता. पण ऐन वेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभू राजे थांबले नाही. त्यांनी ठरवले कि समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरु झाले, सेतू आकार घेवू लागला. मराठ्यांच्या तोफांचा सुरु होताच.पण मग मात्र औरंगजेबाने डाव साधला, त्याला कळून चुकले कि जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजी राज्याची सत्ता येईल. औरंग्याने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगझेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेवून कल्याण-भिवंडी च्या मार्गे रायगड च्या दिशेने येवू लागला होता.त्यामुळे नाईलाजास्तव ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले.

Thursday, 9 October 2014

|| 350 वर्षांपासून जपलेली ललितापंचमीची परंपरा ||



|| किल्ले प्रतापगड ||

पश्चिम घाटातल्या जावळीच्या खोऱ्यातला किल्ले प्रतापगड हा शिवप्रतापाचं एक महत्वाचं स्थान. अफझलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी इथेच बाहेर काढला आणि प्रतापगड इतिहासात अजरामर झाला.  तो शिवप्रताप हा गड आजही अभिमानाने मिरवतो. या प्रतापगडाने काही शिवकालीन परंपराही आज साडेतीनशे वर्षांनंतरही जोपासल्या आहेत, वृद्धिंगत केल्या आहेत. त्यातील एक परंपरा म्हणजेच, नवरात्राच्या परंपरेमध्येच मिसळलेला एक अनोखा उत्सव शिवकालापासून महाराष्ट्रात आहे तो म्हणजे प्रतापगडावरचा ललितापंचमीचा उत्सव. रात्री या उत्सवात जावळी खोऱ्यातील महाराजांचा हा गड शेकडो मशालींनी दर वर्षी आजपण उजळून निघतो.   नवरात्रातल्या या गडावरच्या उत्सवाच्या परंपरेला शिवकालापासून, म्हणजे मंदिराच्या स्थापनेपासूनचा इतिहास आहे.म्हणूनच आजचा दिवस त्याच्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हणूनच आजपण राज्यभरातून  शेकडो शिवभक्त  ही रात्र जागवायला गडावर येतात., कारण नवरात्रातल्या या पंचमीला ज्या भवानीदेवीची स्थापना शिवरायांनी इथं केली तिची पालखी निघते. त्या उत्सवाइतकीच भव्य असते या पंचमीच्या आधीची रात्र. ही संपूर्ण रात्र जागरण गोंधळाने जागून काढली जाते आणि शेकडो मशालींनी हा गड उजळून निघतो. जावळीचं खोरं जसं अंधारात बुडून जातं, तसं या रात्री प्रतापगडावरच्या भवानीच्या मंदिरातून संबळीचा आवाज यायला सुरु होतो. देवीची पूजा होते. देवीचा गोंधळ सुरु होतो.आणि मग प्रत्येक जण या संबळीच्या तालावर ठेका धरतो. प्रत्येक जण देवीचा भुत्या बनतो.  गोंधळ संपतो आणि मग जे या रात्रीचं आकर्षण असतं त्याला सुरुवात होते.प्रतापगडाच्या शरीराचं वैशिष्ट्य असणाऱ्या आकाशात घुसलेल्या टेहळणी बुरुजाच्या चिलखती तटबंदीने एकेक मशाल पेटत जाते. हळूहळू रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात या बुरूजाचा आकार पेटून उठतो. त्याच्या प्रकाशात गड उजळून निघतो.  पाहता पाहता हजारो मशाली पेट घेतात. जावळीच्या खोऱ्याच्या कोणत्याही दिशेने पाहिलत तर जमिनीच्या पोटातून लाव्हा उसळावा तसा अंधारात उजळलेला प्रतापगड दिसायला लागतो.  काही हौशी तरूण विस्तवाला खेळवत धाडसी खेळ करतात.   असा हा गड रात्रभर उजळत राहतो.या रात्रभराच्या जागरणानंतर,  देवीची पालखी गडावरून निघते. नाचत नाचत खोऱ्यात फ़िरते.राजघराण्यातले सारे कुटुंबीय उपस्थित असतात आणि शेकडो वर्षं चाललेल्या या शिवकालीन परंपरेला मोठ्या उत्साहात अजून एक वर्षं जोडलं जातं. 

! स्वराज्याचा शिलेदार !



स्वराज्याची गौरवगाथास्वराज्याचा श्रीगणेशा .........रायरेश ्वरया रायरेश्वराच्या साक्षीनेच त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या शपथा घेतल्या. ‘हर हर महादेव’च्या घोषणांमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात या रायरेश्वराने पाहिली.राजकारणामुळे रायरेश्वर सारख्या शिवकालातील महत्त्वाच्या स्थानाची झालेली उपेक्षा त्यांच्या देहबोलीतून वारंवार व्यक्त होत ,..रायरेश्वर म्हटले की, ‘स्वराज्याची स्थापना’ हा इतिहासातील रोमांचकारी प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतोछत्रपती शिवरायांनी त्यांच्या स्वराज्याचा श्रीगणेशा करण्यासाठी या रायरेश्वराचीच निवड केली... त्या दिवशी कुणालाहीचाहूल लागू न देता शिवबा आणि त्यांचे मावळे इथे एकेक करत जमले. कोण होते यामध्ये? दादाजी नरसप्रभू गुप्ते, कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सोनोपंत डबीर असे स्वराज्यनिर्मित ीतील बिनीचे शिलेदार! सारे एकेक करत जमले आणि या रायरेश्वराच्या साक्षीनेच त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या शपथा घेतल्या. ‘हर हर महादेव’च्या घोषणांमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात या रायरेश्वराने पाहिली.रायरेश्वराच्या पूजाअचेर्ला शिवा जंगम नावाच्या कर्नाटकातील पुजाऱ्याची नियुक्ती झाली होती. त्यांची पस्तीस एक कुटुंबे मंदिराच्या परिसरात आहेतकोट्यावधी रुपये खर्चून मंुबईच्या समुदात शिवाजीमहाराजांच ा भव्य पुतळा बसवण्याचीयोजना साकारत आहे. मात्र शिवरायांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने पावन झालेली सह्यादीच्या कडेकपारीतील अनेक महत्त्वाची ठिकाणं अद्यापही दुर्लक्षीत आहेत,भोर, पेशव्यांचे पंत सचिव शंकरजी नारायण यांचे वैभवशाली संस्थान. सह्यादीच्याडोंगररांगांनी वेढलेला तालुका. लागूनच सातारा आणि रायगड जिल्हा.रायरेश्वर ४५८९ फूट उंच असून पूर्व-पश्चिम असा १६ किलोमीटर पसरला आहे. रायरेश्वर सुरू झालेली ही डोंगररांग शंभू महादेव रांग म्हणून प्रसिद्ध आहे.परंतु मंदिराची अवस्था पाहून इतिहास जनत करून ठेवण्याच्यावृत्तीचा आपल्यामध्ये असलेला अभाव सातत्याने जाणवतराहतो. हवा स्वच्छ असेल तर भोवतालचे १२ किल्ले आणि चार धरणांचे विहंगम दृश्यसहज दृष्टीस पडतेएक ऐतिहासिक आणि थंड हवेचे ठिकाण म्हणूनहीया डोंगराचा विकास होऊ शकतो. महाराष्ट्राच्या पर्यटन खात्याला आता डोंगर किल्ल्यांची आठवण झाली आहे. नाहीतर कोरीगडासारखा हा डोंगरही एखादा खाजगी विकासक केव्हा ताब्यात घेईल हे कळणारही नाही.- जय भवानी जय शिवाजी ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++छायाचित्रे रायरेस्वर मंदिर ( फक्त बीजे )

! " छोटा व मनमोहक धबधबा " ( किल्ले सिंहगड ) " !

" छोटा व मनमोहक धबधबा " ( किल्ले सिंहगड )
मी आणि गॅरी ( अनिल )आम्ही सहज ऐकेदिवशी पूणेला गेलो . गॅरी त्याच्या भावाकडे गेला .आणि मी माझ्या भावाकडे अतूलकडे गेलो, आम्ही मूकामी काञजला राहिलो . अतूल मणाला बालूभाऊ आपण ऊद्या सिंहगडला जाऊ त्याने असे म्हण ला माझा आनंद गगणात मावेना एकदाची सकाळ झाली आणि मी, अविनाश, अतूल निगालो  सिंहगड च्या दिशेने तेवढ्यात गॅरीचा फोन आला की, मी आणि माझा भाऊ सिंहगड ला जात आहोत. योगायोग बघा मी त्याला मणालो आम्ही पण जातोय. तेव्हा ते आमच्या मागेच होते.
     मग काय झाला आमचा ग्रूप मोठा मग खूप इनजाॅय चालू झाला मोटारसायकल ऐकमेकाच्या पूढे पळवायची रेस चालू झाली. मग पोहचलो ऐकदाच त्या वीर " तानाजी मालूसरे " यांच्या कतृत गाजवलेलया किल्ले सिंहगड च्या पायथ्याशी मग कोणी मणत गाढीने डायरेक्ट वरी जाऊ पण मी मणालो , नाही चालत जाऊ होय नको , होय नको मणून झाले ऐकदाचैे तयार चालत जाण्यासाठी  आणि सूरू झाला आमचा प्रवास . रस्ता तसा एकदमच विचित्र दगड झाडे अडचण आम्ही चाला चालता थकायचो थाबायचो . तितक्यात कोणी तरी मणायचे गाढीने वरी गेलो असतो तर बरे झाले असते. पण त्याची समजूत काढून आम्ही पूनहा चालायला लागलो .  आता आम्ही आध॔ रस्ता पार केला तेवढ्यात आम्हाला जे दिसले ते पाहूण आम्ही सगळे जण थक्क झालो .ते महणजे छोटासा पण मनाला वेड लावणारा धबधबा आणि आम्ही सगळयांनी लगेच आपल्या आपल्या मोबाईल ने फोटोकाढायला सूरूवात केली . तितक्यात मी मणालो ग्रुप फोटो PLZ..

     तो धबधबा पाहून पूढे जाण्याची ईच्छा होत नव्हत . तो ऊचावून पडणारा धबधबा आणि तितकीच ती खोल दरी  ते दृष्य पाहून मी अतिशय मनमोहक त्या धबधब्यांच्या प्रेमात पडलो .

धन्यवाद

          फक्त बीजे

! " भगवा " !

भगवा हातात धरणे हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे, त्यासाठी ह्रदयात आग लागते, मनगटात अब्जावधी हत्तींच बळ लागते, ह्रदयात छत्रपती शिवराय लागतात आणि मुखातून

।। जय भवानी
।। जय शिवराय ।। ची गर्जना करावी लागते....!!!

Wednesday, 8 October 2014

! " घोडखिंड ते पावनखिंड " !

शिवरायांचे शिलेदार - बाजी प्रभूदेशपांडे

घोडखिंडीतील (पावनखिंडी) लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते, विशेषतः बाजी प्रभूदेशपांडे यांच्या बलिदानामुळे . लढाईनंतर बाजीप्रभू व इतर मराठे सैनिकांचे बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले असे म्हटले जाते.ही लढाई जुलै १३, १६६० रोजी विशाळगडनजीक  घोडखिंड येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून शिवाजी महाराज विशाळगडाकडॆ कूच करत होते पर्ंतु आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व शिवाजीच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू ज़ाला. जेव्हा शिवाजी व त्यांचे साथिदार घोडखिंडीत पोहोचले त्यावेळेस बाजी प्रभूदेशपांडे या सरदाराने शिवाजींना विनंतीवजा आदेश् दिला की शिवाजी महाराजांनी पुढे गडावर जावे व जोवर शिवाजी महाराज गडावर पोचत नाहीत
तोवर बाजी ही खिंड लढवतील व शत्रुला तिथेच रोखून धरतील.  सिद्दी जौहरने शिवाजीं महाराज पन्हाळ्यावर असताना त्याला वेढा दिला व महाराजांची स्थिती बिकट केली. प्रचंड मोठ्या सेनेपुढे पन्हाळा किल्ला टिकवून धरणे अवघड होते. अतिशय बळकट वेढा उठवून लावण्याचे सर्व प्रयत्न फोल झाले व सरते शेवटी जौहरचा सामना करायचा असे ठरवले. परंतु जौहरच्या मोठ्या फ़ौजेचा सरळ सामना करण्याऎवजी त्यांनी जौहरला भूल देउन निसटून् जाण्याचा बेत बनवला व नव्या दमाने दुसर्‍या किल्ल्यावरुन (विशाळगडावरुन्) जौहरचा सामना करायचे ठरले.जौहरची एकूण फौज १५,००० ची होती तर शिवाजींचे फ़क्त ३०० ते ६०० मावळे होते. लढाईच्या दिवशी रात्री शिवाजींनी पोर्णिमेच्या रात्री गडावरुन उतरून वेढा तोडला व विशाळगडाकडे कूच केली. एका आख्यायिकेप्रमाणे शिवाजींनी आपल्यासारख्याच दिसणार्‍या शिवा काशिद नावाच्या नाव्ह्याला शिवाजी म्हणून जौहरकडे बोलणींसाठी पाठवले होते. व या भेटी दरम्यानच्या काळातच शिवाजींनी पन्हाळ्यावरून पलायन केले. जेव्हा जौहरला शिवाजी महाराज विशाळगडाकडे पळाले आहेत असे सुगावा लागला तेव्हा सिद्दी मसूदला शिवाजींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. काही वेळाने शिवाजी व साथिदार घोडखिंडीत पोहोचले तेव्हा पाठलाग करणारे मसूदचे सैनिक जवळच आहेत याची जाणीव ज़ाली व काही वेळातच ते गाठतील व शिवाजींना व इतरांना पकडतील असा अंदाज होता. घोडखिंडीत अतिशय चिंचोळी वाट होती व एकावेळेस एक-दोन जणच रांगेतून जातील एवढी वाट होती. बाजीप्रभूने शिवाजींना स्थिती समजावून विशाळगडावर प्रस्थान करायचा विनंतीवजा आदेश दिला व जो पर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असा विश्वास महाराजांना दिला. शिवाजी महाराजांनी पुढे विशाळगडावर प्रयाण केले.खिंडीत मसूदचे सैनिक पोहोचल्यावर त्यांना मावळ्यांच्या आडव्या रांगेचा सामना करावा लागला. मावळ्यांच्या मागील रांगांनी तसेच आजूबाजूच्या कड्यांवर चढून दगड गोट्यांची बरसात चालू केली. अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे केवळ एक दोनच सैनिक मराठ्यांच्या रांगेपर्यंत पोहोचत व मारले जात अश्या प्रकारे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली. बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, बांदल ह्यांनी आपपल्या कमानीतून मसूदच्या सैनिकांना परास्त केले. बाजीप्रभूच्या आवेशाने अनेकांची गाळण उडवली. मसूदने बंदूकधार्‍यांना कड्यावर चढून बाजीप्रभूवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. तसे आदेश त्यांनी पार पाडले. बाजीप्रभू जखमी झाला तरी त्याने सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत आपली जागा सोडू नका असा आदेश दिला. काही वेळातच शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले व त्यांनी तोफांचा गजर दिला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा गजर ऎकल्यानंतरच त्याने कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपला जीव सोडला.मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० जण कामी आले पण मसूदचे प्रचंड नुकसान झाले जवळपास ३००० सैनिक मारले गेले.इकडे शिवाजींनी पण विशाळगडाचा वेढा तोडला व गडावर प्रवेश केला. विशाळगडाचा किल्लेदार रंगो नारायण सरपोतदार याने मोठ्या शौर्याने किल्ला लढवला व जौहरला इथेही परास्त केले.लढाईनंतर बाजीप्रभू व इतर मराठे सैनिकांचे बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले असे म्हटले जाते. शिवाजींनी या लढाईत बलिदान देणार्‍यांचे यथोचित सत्कार केले. स्वता: बाजीप्रभूंच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांच्या मुलांना पालखीचा मान देण्यात आला. संभाजी जाधव यांचा मुलगा संताजी जाधव यांना मराठी सेनेत समावण्यात आले.

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||

! " महाराष्ट्रातील सात अद्भुत आश्चर्य ( सात वंडर्स ) " !

महाराष्ट्रातील सात अद्भुत आश्चर्य ( सात वंडर्स )

|| सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र ||जगतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर 'एबीपी माझा'ने महाराष्ट्रातूनही “सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र” या कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात नयनरम्य स्थळ निवडली गेली आहेत.


१. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी शिवतीर्थ रायगड किल्ला, रायगड.

२. मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबाद किल्ला, दौलताबाद.

३. पश्चिम घाटातील कास पठार, सातारा.

४. मध्य रेल्वेचं मुख्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी स्टेशन), मुंबई.

५. शांती-सद्भावनेचं प्रतिक ग्लोबल पॅगोडा, मुंबई.

६. लोणार सरोवर, बुलडाणा.

७. अंजिठा लेणी, औरंगाबाद.  |












|छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||॥जय जिजाऊ॥॥जय शिवराय॥॥जय शंभूराजे॥॥जयोस्तू मराठा॥