! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Thursday, 9 October 2014

! " छोटा व मनमोहक धबधबा " ( किल्ले सिंहगड ) " !

" छोटा व मनमोहक धबधबा " ( किल्ले सिंहगड )
मी आणि गॅरी ( अनिल )आम्ही सहज ऐकेदिवशी पूणेला गेलो . गॅरी त्याच्या भावाकडे गेला .आणि मी माझ्या भावाकडे अतूलकडे गेलो, आम्ही मूकामी काञजला राहिलो . अतूल मणाला बालूभाऊ आपण ऊद्या सिंहगडला जाऊ त्याने असे म्हण ला माझा आनंद गगणात मावेना एकदाची सकाळ झाली आणि मी, अविनाश, अतूल निगालो  सिंहगड च्या दिशेने तेवढ्यात गॅरीचा फोन आला की, मी आणि माझा भाऊ सिंहगड ला जात आहोत. योगायोग बघा मी त्याला मणालो आम्ही पण जातोय. तेव्हा ते आमच्या मागेच होते.
     मग काय झाला आमचा ग्रूप मोठा मग खूप इनजाॅय चालू झाला मोटारसायकल ऐकमेकाच्या पूढे पळवायची रेस चालू झाली. मग पोहचलो ऐकदाच त्या वीर " तानाजी मालूसरे " यांच्या कतृत गाजवलेलया किल्ले सिंहगड च्या पायथ्याशी मग कोणी मणत गाढीने डायरेक्ट वरी जाऊ पण मी मणालो , नाही चालत जाऊ होय नको , होय नको मणून झाले ऐकदाचैे तयार चालत जाण्यासाठी  आणि सूरू झाला आमचा प्रवास . रस्ता तसा एकदमच विचित्र दगड झाडे अडचण आम्ही चाला चालता थकायचो थाबायचो . तितक्यात कोणी तरी मणायचे गाढीने वरी गेलो असतो तर बरे झाले असते. पण त्याची समजूत काढून आम्ही पूनहा चालायला लागलो .  आता आम्ही आध॔ रस्ता पार केला तेवढ्यात आम्हाला जे दिसले ते पाहूण आम्ही सगळे जण थक्क झालो .ते महणजे छोटासा पण मनाला वेड लावणारा धबधबा आणि आम्ही सगळयांनी लगेच आपल्या आपल्या मोबाईल ने फोटोकाढायला सूरूवात केली . तितक्यात मी मणालो ग्रुप फोटो PLZ..

     तो धबधबा पाहून पूढे जाण्याची ईच्छा होत नव्हत . तो ऊचावून पडणारा धबधबा आणि तितकीच ती खोल दरी  ते दृष्य पाहून मी अतिशय मनमोहक त्या धबधब्यांच्या प्रेमात पडलो .

धन्यवाद

          फक्त बीजे

! " भगवा " !

भगवा हातात धरणे हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे, त्यासाठी ह्रदयात आग लागते, मनगटात अब्जावधी हत्तींच बळ लागते, ह्रदयात छत्रपती शिवराय लागतात आणि मुखातून

।। जय भवानी
।। जय शिवराय ।। ची गर्जना करावी लागते....!!!

Wednesday, 8 October 2014

! " घोडखिंड ते पावनखिंड " !

शिवरायांचे शिलेदार - बाजी प्रभूदेशपांडे

घोडखिंडीतील (पावनखिंडी) लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते, विशेषतः बाजी प्रभूदेशपांडे यांच्या बलिदानामुळे . लढाईनंतर बाजीप्रभू व इतर मराठे सैनिकांचे बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले असे म्हटले जाते.ही लढाई जुलै १३, १६६० रोजी विशाळगडनजीक  घोडखिंड येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून शिवाजी महाराज विशाळगडाकडॆ कूच करत होते पर्ंतु आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व शिवाजीच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू ज़ाला. जेव्हा शिवाजी व त्यांचे साथिदार घोडखिंडीत पोहोचले त्यावेळेस बाजी प्रभूदेशपांडे या सरदाराने शिवाजींना विनंतीवजा आदेश् दिला की शिवाजी महाराजांनी पुढे गडावर जावे व जोवर शिवाजी महाराज गडावर पोचत नाहीत
तोवर बाजी ही खिंड लढवतील व शत्रुला तिथेच रोखून धरतील.  सिद्दी जौहरने शिवाजीं महाराज पन्हाळ्यावर असताना त्याला वेढा दिला व महाराजांची स्थिती बिकट केली. प्रचंड मोठ्या सेनेपुढे पन्हाळा किल्ला टिकवून धरणे अवघड होते. अतिशय बळकट वेढा उठवून लावण्याचे सर्व प्रयत्न फोल झाले व सरते शेवटी जौहरचा सामना करायचा असे ठरवले. परंतु जौहरच्या मोठ्या फ़ौजेचा सरळ सामना करण्याऎवजी त्यांनी जौहरला भूल देउन निसटून् जाण्याचा बेत बनवला व नव्या दमाने दुसर्‍या किल्ल्यावरुन (विशाळगडावरुन्) जौहरचा सामना करायचे ठरले.जौहरची एकूण फौज १५,००० ची होती तर शिवाजींचे फ़क्त ३०० ते ६०० मावळे होते. लढाईच्या दिवशी रात्री शिवाजींनी पोर्णिमेच्या रात्री गडावरुन उतरून वेढा तोडला व विशाळगडाकडे कूच केली. एका आख्यायिकेप्रमाणे शिवाजींनी आपल्यासारख्याच दिसणार्‍या शिवा काशिद नावाच्या नाव्ह्याला शिवाजी म्हणून जौहरकडे बोलणींसाठी पाठवले होते. व या भेटी दरम्यानच्या काळातच शिवाजींनी पन्हाळ्यावरून पलायन केले. जेव्हा जौहरला शिवाजी महाराज विशाळगडाकडे पळाले आहेत असे सुगावा लागला तेव्हा सिद्दी मसूदला शिवाजींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. काही वेळाने शिवाजी व साथिदार घोडखिंडीत पोहोचले तेव्हा पाठलाग करणारे मसूदचे सैनिक जवळच आहेत याची जाणीव ज़ाली व काही वेळातच ते गाठतील व शिवाजींना व इतरांना पकडतील असा अंदाज होता. घोडखिंडीत अतिशय चिंचोळी वाट होती व एकावेळेस एक-दोन जणच रांगेतून जातील एवढी वाट होती. बाजीप्रभूने शिवाजींना स्थिती समजावून विशाळगडावर प्रस्थान करायचा विनंतीवजा आदेश दिला व जो पर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असा विश्वास महाराजांना दिला. शिवाजी महाराजांनी पुढे विशाळगडावर प्रयाण केले.खिंडीत मसूदचे सैनिक पोहोचल्यावर त्यांना मावळ्यांच्या आडव्या रांगेचा सामना करावा लागला. मावळ्यांच्या मागील रांगांनी तसेच आजूबाजूच्या कड्यांवर चढून दगड गोट्यांची बरसात चालू केली. अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे केवळ एक दोनच सैनिक मराठ्यांच्या रांगेपर्यंत पोहोचत व मारले जात अश्या प्रकारे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली. बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, बांदल ह्यांनी आपपल्या कमानीतून मसूदच्या सैनिकांना परास्त केले. बाजीप्रभूच्या आवेशाने अनेकांची गाळण उडवली. मसूदने बंदूकधार्‍यांना कड्यावर चढून बाजीप्रभूवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. तसे आदेश त्यांनी पार पाडले. बाजीप्रभू जखमी झाला तरी त्याने सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत आपली जागा सोडू नका असा आदेश दिला. काही वेळातच शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले व त्यांनी तोफांचा गजर दिला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा गजर ऎकल्यानंतरच त्याने कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपला जीव सोडला.मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० जण कामी आले पण मसूदचे प्रचंड नुकसान झाले जवळपास ३००० सैनिक मारले गेले.इकडे शिवाजींनी पण विशाळगडाचा वेढा तोडला व गडावर प्रवेश केला. विशाळगडाचा किल्लेदार रंगो नारायण सरपोतदार याने मोठ्या शौर्याने किल्ला लढवला व जौहरला इथेही परास्त केले.लढाईनंतर बाजीप्रभू व इतर मराठे सैनिकांचे बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले असे म्हटले जाते. शिवाजींनी या लढाईत बलिदान देणार्‍यांचे यथोचित सत्कार केले. स्वता: बाजीप्रभूंच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांच्या मुलांना पालखीचा मान देण्यात आला. संभाजी जाधव यांचा मुलगा संताजी जाधव यांना मराठी सेनेत समावण्यात आले.

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||

! " महाराष्ट्रातील सात अद्भुत आश्चर्य ( सात वंडर्स ) " !

महाराष्ट्रातील सात अद्भुत आश्चर्य ( सात वंडर्स )

|| सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र ||जगतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर 'एबीपी माझा'ने महाराष्ट्रातूनही “सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र” या कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात नयनरम्य स्थळ निवडली गेली आहेत.


१. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी शिवतीर्थ रायगड किल्ला, रायगड.

२. मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबाद किल्ला, दौलताबाद.

३. पश्चिम घाटातील कास पठार, सातारा.

४. मध्य रेल्वेचं मुख्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी स्टेशन), मुंबई.

५. शांती-सद्भावनेचं प्रतिक ग्लोबल पॅगोडा, मुंबई.

६. लोणार सरोवर, बुलडाणा.

७. अंजिठा लेणी, औरंगाबाद.  |












|छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||॥जय जिजाऊ॥॥जय शिवराय॥॥जय शंभूराजे॥॥जयोस्तू मराठा॥


Tuesday, 7 October 2014

! " कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा " !

सर्वाना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ......................
आसमंत हा उजळून जाई
चंद्र प्रकाशात पृथ्वी न्हाई
कोजागिरीच्या पौर्णिमेची
रात हि आनंदात रंगून जाई ...........



चंद्र चांदणे आकाश सजवी
पृथ्वी सगळी उजेडात हि थिजली
मना-मनामध्ये आनंदाचे
रंग तरंग हे भरून जाई ........



बदाम- पिस्ता, केशर मलई
दुध सुगंधी बनवून जाई
आई लक्ष्मी च्या आशीर्वादाने
चंद्र तारका हरकून जाई .........



चंद्राची ती मंगल पूजा
लक्ष्मी मातेच्या कृपा प्रसादे
लहान मोठे सुखात न्हाई ,
कोजागिरीच्या पौर्णिमेची
रात हि आनंदात रंगून जाई ...........

! " सरखेल कान्होजी आंग्रे यांची हि तलवार. " !

तलवारींचे तेज सांगती...मराठ्यांच्या शौर्याची गाथा..
मनापासुन वंदन करितो...टेकवुनिया माथा..

सरखेल कान्होजी आंग्रे यांची हि तलवार.

जय शिवराय…. !

! " शाहिस्तेखान प्रकरण " !

५ एप्रिल १६६३ शाहिस्तेखान प्रकरण -

मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगझेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले...