! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Tuesday, 7 October 2014

! " शाहिस्तेखान प्रकरण " !

५ एप्रिल १६६३ शाहिस्तेखान प्रकरण -

मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगझेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले...

Monday, 6 October 2014

! " महाराजांचा बाणा " !

शाहिस्तेखान जेव्हा स्वराज्यावर चालून
आला होता आणि लालमहालात
थांबला होता,
तेव्हा छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्याने
हल्ला करून त्याची बोटे छाटली.
या शाहिस्तेखानाला रोज
डायरी लिहायची सवय होती. त्याचं
'शाहिस्तेखान बुर्जी' नावाचं रेकाँर्ड आहे.
त्यात हा प्रसंग त्याने लिहीलाय. त्यात
एक घटना त्याने नोंदवलीय. तो लिहतो, "
शिवराय आले तसे वाय्रासारखे
लालमहालातून निघून गेले. काही वेळाने
गोंधळ थांबला आणि शाहिस्तेखानाची एक
बहीण धावत धावत त्याच्याकडे आली.
म्हनाली, भाईजान मेरी बेटी गायब है,
मेरी बेटी गायब है!'
त्यावेळी शाहिस्तेखान तिला म्हणाला,'
शिवरायांची माणसं तिला पळवणार
नाहीतच पण जरी त्यांनी पळवली असेल
तरी बेफिक्र राहा.
तो शिवीजीराजा पोटच्या लेकीसारखीच
तिची काळजी घेईल !'
कोण विश्वास
दुश्मनालाही महाराजांच्या चारीत्र्यावर !
अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून
बसली होती. नंतर ती सापडली.
मित्रांनो आज
या समाजाला या चारीत्र्यवान
महापुरूषाच्या आदर्शाची खरी गरज आहे.
॥ जय शिवराय ॥

! " संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला " !

संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला :—-


वय किमान ७० च्या वर असा एक मुघल सम्राट औरंगझेब . त्या वेळी मराठ्यांचे छत्रपती संभाजी राजे होते .त्यांचे वय किमान ३२ वर्षे .त्या काळी संभाजी राज्यांनी १२० लढाया केल्या त्या मधून ते एकही लढाई हरले नव्हते . अश्या वीर योद्ध्याला पकडणे औरंगझेबला शक्य नव्हते .म्हणूनच औरंगझेब शस्त्र सोबत किमान ४ लाख सैन्या घेऊन तो दक्खन मध्ये उतरला . त्याचे स्वप्ना होते की तो काबुल पासून ते दक्खन पर्यंतचे पूर्ण क्षेत्र मुघलांच्या ताब्यात घ्याचे पण त्याचे हे स्वप्ने पूर्ण झालेच नाही .कारण शिवाजी महाराजान्ने असे होऊच दिले नाही .आणि म्हणून तो निराश झाला होता . शिवाजी महाराजांचे निधन ५० व्या वर्षी झाल्या नंतर संभाजी ना मराठ्यांचा छत्रपती  झाले   . मग औरंगझेबाने निश्चय केला की काही झाला तरी मी मराठ्यांचे हे राज्य त्यांचा कडून घेऊनच राहील . म्हणून मग त्याने कुटनीतीने मराठ्यांमध्ये फुट पडायला सुरुवात केली .आणि यात संभाजीche साळे गणोजी व कनोजी सामील झाले . संभाजी राज्यानजवळ ४५ हजारांचे सैन्या होते . आणि त्यांच्या प्रतेय्क हालचालींवर त्याचे साळे नजर ठेवत होते आणि ती खबर औरंगझेबला सांगत असे .या मुलेच आता संभाजीला पकडायची तयारी करून औरंगझेब शस्त्र सोबत किमान ४ लाख सैन्या घेऊन तो दक्खन मध्ये उतरला .कमी सैन्या असल्यामुळे संभाजी राजे हरले आणि औरंगझेबचा एका सरदाराने छत्रपतींना ताब्यात घेतले .संभाजी महाराज्चे डोळे फार तेजस्वी होते .त्यांने एक नजरही फिरवली तरी साम्रोचा माणूस घाबरून दोन हाथ लांब सरकून जायचा असेच काही त्या सरदारा सोबत सुद्धा झाले.. एका एकी ते राज्यांना ताब्यात घ्यायला भीत होते . पण तरी अवाढव्य सैन्या असल्यामुळे ते पकडला गेले . आणि त्यांना आकाद्क बंदोबस्तात वाडू वूदृप या स्थळी नेण्यात आले.तेथे आणि एक कोठडीत ठेवण्यात आले . औरंगझेबला हे कळल्यावर त्याचा आनंद मावेनासा झाला . संभाजीला पहाण्यासाठी जसा तो व्याकुळ झाला होता कारण या आनंद साठी त्याने ९ वर्ष वाट पहिली होती .साखल्दोराने संभाजी ला बांधण्यात आले होते .औरंगझेब आपल्या सरदारान सोबत त्या कोठडीत भेटण्यास गेला . तेथे सुद्धा औरंगझेब १० फूट लांब उभा राहून साम्भाजीशी बोलत होता .तो म्हणाला ” संभा हमे तुम्हारी मराठा सल्तनत चाहिये ,कैसे राजा हो तुम संभा हम तुम्हारे सल्तनत का एक किल्ला जीत न सके “एक सरदार ” हुजूर , इन्हे इस्लाम पढने कहो “औरंगझेब ” हम संभा को जनते है वोह इस्लाम कभी नही पढेगा “संभाजी राजे म्हणाले ” अरे औरंग्या , आमच्या आबा साहेबांने हे राज्य उभे केले आहे.या राज्याची एक इंच जमीन सुद्धा मी तुला देणार नाही .तुला जे करायचे आहे ते तू करून घे”औरंगझेब “हम तुम्हे ऐसे मौत देंगे की तुम हमारे सामने दया की भिक मंगोगे “संभाजी ” मरायला घाबरत नाही मी औरंग्या , तू तो सुअर की औलाद है. हम तो शेर है. शेर की तऱ्ह जीते है और शेर की तऱ्ह मरते है .ज्या जमिनी साठी तू या वयात एवढ्या आपल्या जीवाचा आटापिटा करतोय न बघ तुला दिल्लीत तर काय दिल्लीच्या दूर दूर पर्यंत तुझी कबर खोदायला जागा मिळणार नाही . शेवटी येशील तर तू आमच्याच मातीत .”औरंगझेब ” बहुत जुबान चलती है इसकी. इसकी जुबान काट दो . लेकीन पहेले इसके साठी कवी कुलेश की कटना”औरंगझेब मनात “इसे देखकर संभा डरजाएगा और दया की भिक मांगेगा हमारे सामने “(कवी कुलेश यांना संभाजी राजसोबतच अटक करण्यात येते आणि त्यांना ही संभाजी राज्यान सोबतच कोठडीत बंद करण्यात येते )आदेश दिल्यावर दोन जल्लाद थोड्या वेळाने कोठडीत येतात आणि पहिले कवी कुलेश ची जीभ संध्शी ने ओढण्यात येते .औरंगझेब ला कळाल्यावर तो विचारतो सभा बाबत पण संभा जसे तसेच असतात . संभा की जबान काट दो असा आदेश तो देतो . पुन्हा ते दोन जल्लादना आदेश देण्यात येते तो संभाजी राज्यांची जब्बन कापण्याचा पण असे शूरवीर योद्ध्याला पाहून जल्लादही दोन पावले मागे सरकतात . संभाजी आपला जबडा उघडायला तयार नसतात . त्यांना ४ ५ जन पकडून त्यांचा जबडा उघडून त्यांची ही जाबन लढण्यात येते .असेच मग औरंगझेब त्यांचे डोळे काढण्याचा आदेश देतो . एक सरदार आणि दोन जल्लाद जातात ते गरम साळखी घेऊन कवी कुलशे चे डोळे काढतात मग संभाजी जवळ येतात . गरम सलाखी घेतात . आणि दोन पावलं माघे सरकततात .ते म्हणतात ” आजतक हमने कितने लोगोकी आंखे निकाली मगर इनके जैसी तेजस्वी आंखे हमने कभी नाही देखी “संभाजींचे डोळे काढण्यात येते. मग त्यांचे वाघ नखाने अंग सोलण्यात येते . त्यांचे हाथ कापण्यात येते . पाय कापण्यात येते . पण ते रेहेम ची भिक मागत नाही .नंतर एक सरदार येतो आणि संभाजींची आठवण म्हणून त्यंच्या गळ्यात असलेली भवानी माळ काढण्याचा प्रयत्न करतो पण संभाजी राजांचा इशारा पाहताच ती तशीच त्यांचा गळ्यात राहू देतो .एवढे अत्याचार सहन करून ही संभाजी राजे रहेमं ची भिक मागत नाही.आणि ते आपला देह सोडतात . ते शहीद होतात. आपल्या राष्ट्रसाठीआपल्या भूमीसाठी .हे सगळा कळल्यावर औरंगझेब म्हणतो ” या अल्लाह , आपने हमारे जनाने मे संभा जैसा बेटा पैदा क्यू नही किया ?”संभाजी राजांच्या शहीद झाल्या नंतर मराठ्यांचा छत्रपती राजाराम यांना बनवण्यात आले .ते संभाजी राजांचे सावत्र भाऊ होते . संभाजी राजनच्या शहीद झाल्या नंतर औरंगझेब १८ वर्ष जगला पण त्याला मराठा साम्राज्याचा एक इंच जमिनी चा तुकडाही जिंकता आला नाही .त्याने आपल्या मृत्यू पत्रात हे लिहून ठेवले आहे. की ” संभा शेर का छावा था”‎”हमने उसकी आंखे निकाल ली लेकीन उसने हमारे सामने आंखे नाही झुकायी ““हमने उसके हाथ काट दिये लेकीन उसने हमारे सामने हाथ नही फैलये “” हमने उसके पैर काट दिये लेकीन उसने हमारे सामने घुत्ने नही टेके . ““हमने उसका सर काट दिया लेकीन उसने हमारे सामने सर नही झुकाया .”——————————————-घेवून जगात आहे कशासाठी?????आपल्यासाठी?त्याने जे लेजेसोसले ते आपल्यासाठी…आणि आपण ????????दिला काय त्या ला मनाचा मुजरा ????नाही….आपण दिले त्या ला फक्त बदनामी आणि बदनामी …..तेवा सर्वे मराठी जन्तेंनोनिर्माण करा ते स्वराज्य पुन्हा आणि द्या त्या“वाघिणी” ला मनाचा मुजरा जिने “वाघ”पैदा केलाद्या मानाचा मुजरा त्या “वाघा” ला ज्या ने असा छावा पैदा केलाआणि द्या मना चा मुजरा त्या “छाव्या” ला ज्यानेते स्वराज्य टिकवून ठेवलेआणी हसत हसत तो शहीद झाला या स्वराज्य साठी तो कामी आला….note
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

Sunday, 5 October 2014

! " शिवरायांचा मृत्यु कि खून ? " !

शिवरायाचा मृत्यु कि खून ?

संभाजीराजे आणि सोयराबाई यांचे नातेसंबंध :-
 १. सत्ताप्राप्तीसाठी शिवरायांचे कुटुंबात कोणत्याही प्रकारचा संघर्ष नव्हता. सोयराबाईनी संभाजीराजांना शेवटपर्यंत स्व:पुत्रा प्रमाणे सांभाळले. तर संभाजीराजे सोयराबाईना नेहमी " निर्मल मनाची आई " असे म्हणत.
२. सोयराबाई व शंभूराजे यांचे भांडण लावायचा प्रयत्न ब्राह्मण मंत्र्यांनी केला. पण त्यात त्यांना यश आहे नाही. या उलट संभाजीराज्यांनी स्वराज्याचे वाटणीस विरोध केला.
३. राजाराम यांना राजसाबाई यांचे पोटी पुत्र रत्न झाले .


तेव्हा राजाराम यांनी पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले ( १६९७ ) जर संभाजी व राजाराम यानमध्ये संघर्ष असता तर राजाराम यांनी मुलाचे नाव संभाजी असे ठेवले असते का ? शिवरायांचा खून  का व  कसा झाला :-- हजारो वर्षांची ब्राह्मनी दादागिरी शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी संपवली त्यामुळे ब्राह्मण आतून प्रचंड चिडले. म्हणून त्यांनी राज्यांचे कुटुंबात भांडण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता. आण्णाजी दत्तो  रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला होता. गडावर राहुजी सोमनाथ हा ब्राह्मण अधिकारी होता. रायगडाची संपूर्ण  नाकाबंदी करण्यात आली. कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते. हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत्त करणारे जवळ थांबत नसतात. या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची माणसे गडावर नव्हती. संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हे तळबीड या ठिकाणी होते. ते राजगड    पासून २५० किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे. (  संदर्भ :- वा.सी.बेंद्रे लिखित श्री. छ. संभाजी महाराज )    तीन एप्रिलचा दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचे भोवती ब्राहामानांचेच वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. या सार्या परिस्थितीचा फायदा घेऊन  शिवरायांवर विषप्रयोग झाला. संभाजीराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची माहिती समजणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. राज्यांचा अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला. दहा  वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन ब्राह्मण मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते. म्हणून त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी फुटू न देता राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच ब्राह्माण मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले.... पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजाकरणे हे स्वराज्य ब्राह्मण मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली. वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाईया संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ? तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा  ब्राह्मणी इतिहासकारांनी नंतर उठवली.   जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हे अवघे ५०  वर्ष होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग नव्हता. ते प्रधीर्ग आजारी नव्हते. राज्यांची प्रकृती निरोगी होती. वयाचे ५० व्या वर्षी राज्यांना अनैसर्गिक मृत्त्यू येणे कदापीही शक्य नाही.

शिवरायांच्या मृत्त्यू बाबद संशय निर्माण करणाऱ्या काही बाबी :--
१. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य.
२. शिवरायांनी  ब्राह्मणी वर्चस्वाला दिलेला शह.
३. रायगडावरील ब्राह्मण मंत्र्यांचा अंतर्गत विरोध.
४. तीन एप्रिलचे गडावरील संशयास्पद वातावरण.
५. शिवरायांचा घाई घाईत उरकण्यात आलेला अंत्यविधी
६. पराक्रमी, विद्वान,चारित्र्यसंपन्न, जेष्ठपुत्र संभाजीराजे यांना धोका देऊन कोणतीही चूक नसताना कैद करायचे आदेश देऊन.... यदहा वर्षाच्या कनिष्ठ राजारामला घाई घाईत छत्रपती करण्यामागचा ब्राह्माण मंत्र्यांचा हेतू काय असावा ?
७. शिवरायांच्याखुनाची, राजारामाच्या राज्याभिषेकाची, माहिती गोपनीय  ठेवण्या माघे ब्राह्माण मंत्र्यांचा  काय हेतू होता ?
८. संभाजी महाराजांचे सांत्वन  करण्यापेक्षा त्यांना अटक करायला गेलेले ब्राह्मणमंत्री यांचा हेऊ काय होता ?
9. या सार्या प्रकारा नंतर संभाजीराजे यांनी सोयराबाई यांना मान दिला, गौरवले व राजाराम महाराज यांना प्रेमाने वागवले....... तर ब्राह्माण मंत्री यांना कैद केले व पुढे त्यांना हातीचे पायाखाली देऊन ठार केले. हे काय दर्शवते                संभाजी महाराज यांना अटक करा व आम्हाला वाटेत भेटा असे आदेश ब्राह्माण मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांना दिले होते .पण संभाजी महाराज यांना कपटाने   कैद करायला निघालेल्या मंत्र्यांना ( मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत..) हंबीरराव यांनी वाटेतच अटक केले ! त्यानंतर संभाजीराजे हे रायगडावर आले त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले. सोयराबाई या निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा म्हणजे  संभाजीराजे २४ ऑगस्ट १६८० रोजी म्हणतात कि ' सोयराबाई या स्फटिका सारख्या निर्मल मनाच्या आहेत'. याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर होत्याच पण त्या संभाजीराजे यांना आदर स्थानी होत्या.  कुमंत्र्यांनीच सोयराबाई यांना संभाजी विरोधात भडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. [संधर्भ छ. संभाजी (पान २२१ ) वा. सी बेंद्रे.]


आता आपण शिवरायांचे मृत्युबाबत देशी आणि परदेशी साधनांचा विचार करू :-- पुढील संदर्भ साधनांची चिकित्सा करताना त्या साधनांचा काळ व कर्ता याचा विचार केलेला आहे. मराठी आणि संस्कृत साधनांचे लेखक हे ब्राह्मण या एकाच जातीचे असल्याने सत्यशोधनात अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव त्या साधनात सापडते. सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......
१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागदपत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्यावरून उतरले त्यांना अतिउष्णतेमुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलोमनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संदर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विषप्रयोग केला असावा "                  

शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्र सारेच जाणत नव्हते कारण ब्राह्माण मंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता.

आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :----
१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "
३. जेधे शकावली - " चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले." चिटणीस बखर,शिवदिग्विजय या १८१८ सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पण त्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. ब्राह्माण मंत्र्यांनी विषप्रयोग केला पण सोयराबाई यांच्या नावाने अफवा पसरवली. हे वरील साधनांवरून लक्षात येते. जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरण नाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणून त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो.   बहुजन सामाज्याची दिशाभूल करण्यासाठी नंतर काही ब्राह्माण इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा " गुडघी रोगामुळे " झाला अशी अफवा पसरवली. (पण मित्रहो जगाच्या इतिहासात पूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही..) तर काही इतिहासकारांनी शिवरायांचा खून हा सोयराबाई यांनी केला असा कुप्रचार सुरु केला. याचा स्पष्ट अर्थ काय निघतो ब्राह्माण हे अफवा पसरवण्यात, दिशाभूल करण्यात, कपटकारस्थानात, खून पचवण्यात जगात एक नंबर आहेत. राज्यांचा खून पचावायासाठी ब्राह्मण कंपूने अनेक अफवा पसरवल्या. जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत खरे आरोपी सुटावेत यासाठी आजही ब्राह्माण खोटा प्रचार, दिशाभूल करत असतात. शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा ब्राह्माण मंत्र्यांचा डाव होता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला. कारण राजाराम हे १० वर्षाचे बालक होते. राजारामला नामधारी राजा करायचे व राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची असा ब्राह्मण मंत्र्यांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी,पराक्रमी, होते म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतच या कपटी, स्वराज्यद्रोही, नरपशूना.... स्वराज्यप्रेमी, शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर अभीषेक केला.


!तात्पर्य :-                  विषप्रयोग झाला हे सारे जाणतात. काही ब्राह्मणी विचारांना बळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात. पण त्याच वेळी शंभूराज्यांनी सोयराबाई यांना कधीच अटकही केले नाही व कोणताही त्रास दिला नाही उलट खुणानंतर ५-६ महिन्यांनी संभाजीयांनी सोयराबाई यांना गौरवले त्याचा सन्मान केला  ! याचा वर पुरावा दिलेला आहे. म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल. म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी ब्राह्माण मंत्र्यांनी केलेला ब्राह्मणीकावा होता हे सिद्ध होते.

! " वंदन माझे त्या सांत विरांना " !

इतिहास:      

कडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे. एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर. यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं. पुढे कडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले. बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला. मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला. शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल. महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही. अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता.मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे. बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे. प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं.
१) विसाजी बल्लाळ
२) दिपाजी राउतराव
 ३) विठ्ठल पिलाजी अत्रे
४) कृष्णाजी भास्कर
५) सिद्धी हिलाल
६)  विठोटजी
७) आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत” प्रतापराव गुजर .
पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं. प्रतापराव आणि त्यांच्या त्या सहा वीरांना मानाचा मुजरा. -

! " वेडात मराठे वीर दौडले सात " !

म्यानातुनि उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात!

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
वेडात मराठे वीर दौडले सात!

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात!

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात!

दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्‍ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणि वार्‍यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात!