! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 21 September 2014

! " तिसरे सरसेनापती हंबीरराव मोहिते " !


हंबीरराव मोहिते

सेनापतीपदी निवड

आदिलशाही सरदार बहलोलखान याच्याबरोबरच्या लढाईत सेनापती प्रतापराव गुजर पडले.प्रतापराव पडल्याची वार्ता कळताच,प्रतापरावांच्या फौजेत असलेल्या हंबीरराव मोहिते यांनी सर्व सैनिकांत हिंमत निर्माण करून, बहलोलखान वर आक्रमण करून त्याच्या सैन्याची दाणादाण उडवून त्यांस विजापूरपर्यंत पिटाळले.

बहलोलखानाविरूध्द पराक्रमाने महाराजांना हंबीररावामध्ये शहाणा,सबुरीचा सेनानी दिसला.चिपळून जवळच्या श्रीक्षेत्र परशूराम येथे या सेनानीस महाराजांनी आपला सेनापती म्हणून निवडले.सभासद म्हणतो,'प्रतापराव पडले ही खबर राजियांनी ऐकून बहूत कष्टी जाले,सरनोबत कोण करावा?अशी तजवीज करून,आपण स्वस्थ लष्करांत येऊन,लष्कर घेऊन कोकणांत चिपळून जागा परशूरामाचें क्षेत्र आहे,तेथें येऊन राहिले.मग लष्करची पाहाणी करून लहान थोर लष्करास व पायदळ लोकांस खजीना फोडून वाटणी केली,आणि सरनोबतीस माणूस पाहातां हंसाजी मोहिते म्हणून पागेमध्यें जुमला होता;बरा शहाणा,मर्दाना,सबुरीचा,चौकस,शिपाई मोठा धारकरी पाहून त्यास 'हंबीरराव' नाव किताबती देऊन सरनोबती सांगितली.कुल लष्कराचा गाहा करून हंबीरराव यांचे ताबीज दिधले.

बहादूरखान,दिलेरखानादींना नजरेत धरले नाही

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजांनी दोन वर्ष मोघल व आदिलशाही भागातून मोठी लुट मारून आणिली.या कालातील हंबीररावांची कामगिरी वर्णन करताना सभासद म्हणतो,'राजियांनी आपले लष्करास हुकूम करून हंबीरराव सरनौबत फौज घेऊन मोंघलाईत शिरले. खानदेश, बागलाण, गुजराथ, अमदाबाद,बुर्‍हाणपूर,वर्‍हाड,माहूर मारून खंडणी करून जप्त केला.मालमत्ता अगणित जमा करून चालिले.तो बहादूरखान यांनी कुल जमाव घेऊन हंबीररायाचे पाठीवर चालून आले.राजियाची फौज तोलदार गाठली.मोंघल ब�
[0   गाठली.मोंघल बहुत धास्तीने घाबरा होऊन सात-आठ गावांचे अंतराने चालिला.दिलेरखान उतावळा होऊन फौजेशी गाठ घातली.हंबीरराव यांनी नजरेत धरला नाही.तोलदारीने मत्ता घेऊन आपले देशास आले.मालमत्ता राजियास दिली.
1) हंबीरराव मोहिते छायाचिञ
2 ) हंबीररावाचं स्मारक
3 ) हंबीररावांची तलवार




! " दूसरे सरसेनापती प्रतापराव गूजर " !


प्रतापराव गुजर
।। वेडात मराठे वीर दौडले सात ।।

वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते ते शूर सेनानी म्हणजे,प्रतापराव गुजर,विसाजी बल्लाळ,दिपोजी राउतराव विठ्ठल,पिळाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर,सिद्दी हिलाल व विठोजी होय.प्रतापराव गुजर या महान सेनापतीने मोठा पराक्रम केला होता.त्यांचे व बेलोलखान यामधील युध्द इतिहासात प्रसिध्द आहे.या सात वीरांनी सुमारे बारा हजारच्या बेलोलखानाच्या सैन्यावर चाल करून मोठा पराक्रम केला.ही लढाई कोल्हापूरजवळच्या नेसरी येथे झाली.

सभासदाच्या बखरीत प्रतापराव गुजर या महान सेनानीबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे.पन्हाळगडाच्या लढाईच्या समयी नेताजी पालकर समयास न आल्यामुळे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले होते.यामुळे राजियांनी नेताजी पालकर यास बोलावून आणिला,आणि 'समयास कैसा पावला नाहींस?'म्हणून शब्द लावून,सरनोबती दूर करून,राजगडचा सरनौबत कडतोजी गुजर म्हणून होता,त्यांचे नाव दूर करून,प्रतापराव ठेविले,आणि सरनोबती दिधली.प्रतापरावांनी सेनापती करीत असतां शाहाण्णव कुळींचे मराठे चारी पादशाहींत जे होते व मुलखांत जे जे होते ते कुल मिळविले.पागेस घोडीं खरेदी केलीं.पागा सजीत चालिले व शिलेदार मिळवित चालिले.असा जमाव पोक्त केला.चहूं पादशाहीत दावा लाविला.

विजापूराहून आलेल्या बेलोलखान याने बारा हजार स्वारांनिशी स्वराज्यावर चाल करून मोठा धुमाकूळ घातला होता,रयतेवर अनन्वित अत्याचार केले होते.महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा हुकूम केला.प्रतापरावांनी गनीमीकाव्याने बहलोलखानास जेरीस आणून त्याचा पराभव केला.बहलोलखान आपल्या सैन्यासह शरण आला.शरण आलेल्या बहलोलखानास मोठ्या मनांनी प्रतापरावांनी त्यांस सोडून दिले.रयतेचे हाल करणार्‍या ‍बहलोलखानास सोडल्यामुळे महाराजांनी प्रतापरावांस,'बहलोलख�
[
धुळीस मिळवा असा हुकूम केला.प्रतापरावांनी गनीमीकाव्याने बहलोलखानास जेरीस आणून त्याचा पराभव केला.बहलोउलखान आपल्या सैन्यासह शरण आला.शरण आलेल्या बहलोलखानास मोठ्या मनांनी प्रतापरावांनी त्यांस सोडून दिले.रयतेचे हाल करणार्‍या ‍बहलोलखानास सोडल्यामुळे महाराजांनी प्रतापरावांस,'बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका.'असे पत्र धाडिले.राजियांचे पत्र मिळताच प्रतापराव सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले.आपल्या छावणीच्या जवळच असलेल्या नेसरी येथे बहलोलखानाचा तळ पडला आहे.असे हेरांकडून त्यांना कळाल्यावर ते तडक घोड्यावर बसून एकटेच बहलोलखानाच्या छावणीवर चालून निघाले.त्यांच्या पाठोपाठ विसाजी बल्लाळ,दिपोजी राउतराव विठ्ठल,पिळाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर,सिद्दी हिलाल व विठोजी हे वीर होते.या सात वीरांनी बारा हजाराच्या सैन्यामध्ये घुसून शेकडो गनीमांना ठार मारिले.पण अखेरीस प्रतापराव आणि सोबतचे सहा वीर मरण पावले.केवढे हे शौर्य या सात वीरांचे?साक्षात समोर मृत्यु आहे हे माहीत असून,हजारों सैन्यावरी सात वीर चालून गेले.पराकोटीची स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यावरील प्रेमापोठी या सात वीरांनी स्वत:स मरणाच्या हवाली केले.ही घटना ऐकल्यावर महाराजांना अतीव दु:ख झाले.या सात वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले

! " पहिले सरसेनापती नेताजी पालकर " !

नेताजी पालकर

नेताजी पालकर यांचा इतिहासामध्ये 'प्रतिशिवाजी',दुसरा शिवाजी असा उल्लेख आहे.नेताजी स्वराज्याचे दीर्घ काळ सरसेनापती होते.आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक लढाया गाजविल्या.नेताजींचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर हे होय.अफजलखान व छत्रपतींच्या भेटीवेळी नेताजींने मोठा पराक्रम गाजविला होता.प्रतापगडाच्या लढाईच्या वेळी छत्रपतींनी नेताजीस खास कामगिरी सांगितली होती.

सभासद म्हणतो,राजे मातुश्रींचा आशीर्वाद घेऊन प्रतापगडास निघाले.नेताजी पालकर सरनोबत यास लष्कर घेऊन वर घाटावरि येणे म्हणोन सांगितले.आणि अफजलखानास जावलीस बोलावितो,सला करून भेटतों,विश्वास लावून जवळ आणितों,तें समयी तुम्ही घाटमाथा येऊन मार्ग धरणें,असे सांगितले.खानाचा वध झाल्यानंतर,राजे गडावरि जातांच एक भांड्याचा आवाज केला.तेच गडाखालील लोक व घाटावरील लोक व लष्कर व कोकणांतून मोरोपंत व मावळे असे चौतर्फी चोहोंकडून चालोन खानाचे गोटावरि आले.मोठें घोरोंदर युध्द जाहाले.रक्ताच्या नद्या चालल्या.रणकंदन जाले.प्रतापगडाच्या या युध्दात नेताजींनी मोठा पराक्रम गाजविला.

पुढे मिर्झा राजेसोबत झालेल्या पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराज,मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले होते.पण आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर त्यांना अपयश आले.त्यामुळे विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी राजे विजापुरहून पन्हाळ्यास आले,राजेंनी रात्रीच गडावर छापा घातला.पण किल्लेदार सावध असल्यामुळे मराठ्यांचा पराभव झाला,सुमारे १००० मावळे मारले गेले.


! " धम॔वीर संभाजी राजे " !



: ।।सिंहाचा छावा छत्रपती संभाजीराजे।।

श्री शंभो: शिवजातस्य, मुद्रा द्यौरिव राजते |
यदंकसेविनो लेखा,वर्तते कस्य नोपरि ||

छत्रपती शिवाजी राजे यांचे पुत्र श्री.संभाजी राजे यांची मुद्रा आकाशाप्रमाणे शोभत आहे.तिचे अंकसेवन करणाऱ्यांचा(आधार घेणाऱ्यांचा) पगडा सगळ्यांवर पडेल.

छत्रपती संभाजीराजे,ज्यांचे वर्णन सिंहाचा छावा म्हणून शोभते.आठ भाषांचा जाणकार असणारा हा महाराजा, ज्यांनी 'बुधभूषणम्' हा संस्कृत तर 'नायिकाभेद', 'नखशिख', 'सातसतक' हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ लिहिले.हा थोर राजा जसा लेखणीतही श्रेष्ठ होता तसा तो रणांगणात श्रेष्ठ होता.बुध्दिमत्ता आणि शौर्य श्रीशंभूराजामध्ये भरले होते.आपल्या नऊ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी स्वराज्याचा विस्तार दुप्पट केला,स्वराज्यातील एकही किल्ला गमावला नाही.मराठ्यांचे आरमार शक्तीशाली केले.कर्नाटकातील मराठी राज्य वाढविले,पोर्तुगीजांचे तीन चतुर्थांश राज्य जिंकले,औरंगजेबच्या सैन्याची दाणादाण उडविली,असा हा छावा. छत्रपती संभाजीराजे एकाच वेळी मोघल, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दीशी लढत होते.

श्री शंभूराजांचे निष्कलंक व्यक्तित्व समजण्यासाठी,शंभूराजांनी लिहिलेला खालील श्लोक पुरेसा आहे.(बुधभूषण,अध्याय दोन,श्लोक ४२२).यात त्यांनी राजाचे सात दोष वर्णिलेले आहेत.

व्यसनादि च सर्वाणि भूपति: परिवर्जयेत् |
सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया: ||४२२||

हे सात दोष पुढीलप्रमाणे आहेत,वादण्ड,पारूष्य,दुरयातंच,पान,स्त्री,मृगया आणि द्यूत.शंभूराजेंनी राजांना या सात दोषापासून दूर राहावयास सांगितले आहे.

श्रीशंभूराजांनी बुधभूषण या आपल्या संस्कृत ग्रंथात पानापानावर असे विचार मांडलेत.त्याकाळी राजाकडे जनानखाना असणे प्रतिष्ठेचे असताना शंभूराजांनी त्याचा निषेध केला तसेच बहूपत्नीव नाकारले.महाराणी येसूबाईंना स्वतंत्र राज-
[10:17, 21/09/2014] Fakt BJ: स्वतंत्र राज-मुद्रा देऊन राज्यकारभारामध्ये सामील करून घेतले.अशा थोर सेनानीचे कर्तुत्व झाकण्याचा प्रयत्न पेशवेकालीन बखरकारांनी केला.संभाजी राजांच्या कर्तुत्वाचे विकृतीकरण करणारी मल्हार रामराव चिटणीसाची बखर,संभाजी राजांच्या मृत्युनंतर १२२ वर्षांनी,सन १८११ साली लिहिली गेली.मल्हार रामराव चिटणीसाचे खापरपणजोबा बाळाजी आवजी चिटणीस यांस संभाजीराजेंनी स्वराज्यद्रोहाच्या आरोपामुळे हत्तीच्या पायी दिले होते,त्यामुळे मनात अढी ठेवून मल्हार रामराव याने बखर लिहिली.आजच्या युगातील काही तथाकथित विद्वान लेखक,नाटककार,इतिहासकारसुध्दा संभाजी राजांच्या कर्तुत्वाचे विकृतीकरण करण्यात आघाडीवर आहेत.संभाजीराजांच्या पराक्रमाविषयी आपण सविस्तरपणे पुढे चर्चा करणार आहोत.

छत्रपती संभाजीराजेंचा जन्म इ.स.१४ मे,१६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या 'मातोश्री सईबाईंचे'निधन,संभाजीराजांच्या लहान वयात झाले. त्यामुळे पुरंदर किल्ल्याच्या जवळ असलेल्या कापूरहोळ गावातील 'धाराऊ'राजेंच्या दुधाई बनल्या.लहानपणापासूनच बुध्दिमान असलेल्या संभाजीराजेंनी युध्दाचे डावपेच,राजकारण लवकर आत्मसात केले.

! " मराठयांचे कैवारी छञपती शिवाजी महाराज " !




 मराठ्यांचे आराध्ये दैवत || छत्रपती शिवाजी महाराज ||

जन्म स्थान :  किल्ले शिवनेरी  जि. पुणे

समाधीस्थान : किल्ले रायगड जि. रायगड


कर्तबगार शहाजीराजांचे पुत्र शिवरायांचा जन्म जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी झाला. शहाजी राजांचा निजामशाही वाचविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर ते आदिलशहाच्या पदरी राहून कर्नाटकात आदिलशाहीचा विस्तार करू लागले. दहाव्या वर्षी शिवरायांचा निंबाळकर घराण्यातील सईबाई यांच्याशी विवाह झाला. आपल्या वडिलोपार्जित जहागीरीची म्हणजे पुणे, सुपे भागाची देखभाल करण्यास शहाजी राजांनी जिजाउंसह शिवरायांना पुणे येथे ठेवले.कारभारी दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर शिवराय स्वतंत्रपणे जहागिरीचा कारभार पाहू लागले.
परकीय आणि अत्याचारी सुलतानशाह्या यांच्या विरुद्ध लढून स्वत: चे राज्य स्थापण्याचा उद्योग शिवरायांनी पुणे भागातील किल्ले ताब्यात घेऊन सुरु केला. रोहिदा, तोरणा,सिंहगड आणि पुरंदर या बळकट किल्ल्यांच्या आधाराने आणि मावळातील देशमुखांबरोबर सर्व सामान्य मावळ्यांच्या मदतीने सैन्य उभे करून शिवरायांनी आपली शक्ती वाढवायला सुरवात केली.

विजापूरच्या आदिलशहाने या उद्योगाने चिडून जाऊन शहाजी राजांना कैद केले आणि शिवराय यांच्याविरुद्ध फौज पाठविली. या सैन्याला पराभूत करून आणि मोगलांकडून दबाव आणून शहाजी राजांची सुटका करण्यास आदिलशहाला भाग पाडले आणि हि सलामीची लढाई शिवाजी महाराजांनी जिंकली.

जावळीच्या मोऱ्यांचा नायनाट करून श्री शिवरायांनी स्वराज्याच्या सीमा समुद्र पर्यंत भिडवल्या. आदिलशहाने प्रचंड फौजेसह पाठविलेल्या अफझल खानास ठार मारून विजापुरी सैन्य शिवरायांनी प्रतापगडाखाली बुडविले. या प्रचंड विजयाने शिवरायांचे नाव भारतभर प्रसिद्ध झाले.अफझल वधानंतर झपाट्याने आदिलशाही मुलखावर �
[17:14, 21/09/2014] Fakt BJ: आक्रमण करून शिवरायांनी अनेक किल्ले व बराच मुलूख ताब्यात घेतला. आदिलशहाने पुन्हा तयारी करून सिद्दी जौहर याला शिवराय यांच्या विरुद्ध पाठविले. पन्हाळा किल्ल्यावर शिवराय असताना सिद्दी जौहरने पन्हाळ्यास वेध घातला. या वेढ्यातून आपल्या जीवास जीव देणाऱ्या सहकाऱ्यांच्या मदतीने शिवराय अलगद पाने सुटले. विजापुरी फौजांविरुद्ध लढताना शिवा काशीद, बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडे धारातीर्थी पडले.

यानंतर कोकण काबीज करून शिवरायांनी समुद्र किनाऱ्यावर आपले पाय रोवले. औरंगजेबाने शिवराय यांच्या विरुद्ध शायिस्तेखानला महाराष्ट्रात पाठविले. पुण्यात तळ ठोकून बसलेल्या शायिस्तेखानावर दोन लाख फौजेच्या गराड्यात शिरून शिवरायांनी हल्ला केला. शायिस्तेखानास परत बोलावून औरंगजेबाने पाठविलेल्या मिर्झा राजा जयसिंग याने महाराष्ट्रात जाळपोळ, लुटालूट करून प्रचंड सैन्यशक्तीच्या जोरावर शिवरायांना तह करण्यास भाग पाडले.तहाप्रमाणे आपले अनेक किल्ले मोगलांना देऊन आग्रा येथे भेटीस आलेल्या शिवरायांना औरंगजेबाने कैद केले. या कैदेतून आपल्या विलक्षण चतुराईच्या जोरावर शिवराय निसटून सुखरूप महाराष्ट्रात परत आले. तहात दिलेले किल्ले श्री शिवरायांनी तत्काळ परत घेण्यास सुरवात केली.आणि हि कामगिरी पार पाडताना तानाजी मालुसरे कामी आले.

शायीस्तेखानावरील हल्ल्यानंतर लुटलेले औरंगजेबाचे धनसंपन्न शहर सुरत शिवरायांनी पुन्हा लुटले. नाशिक जवळचा साल्हेर किल्ला ताब्यात घेऊन शिवरायांनी स्वराज्याची सीमा उत्तरेत बागलाण पर्यंत वाढविली.
[17:14, 21/09/2014] Fakt BJ: महाराष्ट्रातील शत्रूंना नेस्तनाबूत करून श्री शिवरायांनी ६ जून १६७४ रोजी रायगडावर विधीपूर्वक राज्याभिषेक करून घेऊन मराठ्यांच्या स्वतंत्र राजसत्तेची स्वतंत्र सिंहासनाची स्थापना केली. शिवराय छत्रपती झाले. या समारंभानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाऊ यांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रातील राज्य स्थिरस्थावर करून शिवरायांनी आपले लक्ष दक्षिणेकडे वळविले. गोवलकोंडा येथील कुतुबशहा याच्याशी मैत्रीचा तह करून साठ हजारांच्या सैन्यासह शिवरायांनी दक्षिणेत मुसंडी मारली. कोप्पळ, बहादूरबंडा, जिंजी, वेलोर हे महत्वाचे किल्ले जिंकून घेतले.स्थानिक राजवाटी यांच्याकडून खंडण्या घेत, विरोधकांना भुई सपाट करीत शिवराय तंजावर पर्यंत पोहोचले. तंजावरचे छत्रपती एकोजीराजे हे शिवरायांचे सावत्र बंधू होते. त्यांची भेट घेऊन शिवराय महाराष्ट्रात आले.

आग्रा भेटीपूर्वीच शिवरायांनी कोकणात व समुद्रात किल्ले बांधून सागरी सत्ता आपल्या हाती ठेवण्यास सुरवात केली होती. विरोधक सिद्दी आणि इंग्रज यांना न जुमानता मुंबईपासून वेंगुर्ल्यापर्यंत किल्ल्यांची साखळी निर्माण केली.

खांदेरी उंदेरी या सागरी दुर्गांच्या लढाईत इंग्रजांचा पराभव करून शिवराय रायगडावर आले. नेसरीच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या सेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्येशी राजाराम महाराज यांचा शिवराय यांनी करून दिला. त्यानंतर तीन आठवड्यांनी रायगडावरच त्यांचे निधन झाले.


॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

! " राजमाता जिजाऊ " !



।। राजमाता जिजाबाई ।।
जशी चंपकेशी खुले फूल जाई ।
भली शोभली ज्यास जाया जिजाई ॥
जिचे कीर्तिचा चंबू जंबू द्विपाला ।
करी साऊली माऊली मुलाला ॥
(कवीश्रेष्ठ: जयराम पिंडे,शहाजीराजेंच्या दरबारातील रत्न)
अर्थ :एखादा मोठा बगीचा फुललेल्या जाईंच्या फुलाच्या ताटव्याने खुलून जातो त्याचप्रमाणे जिजाऊंच्या रूपाने शहाजी राजांचे जीवन सुशोभित झाले होते.पण शहाजीराजेंची पत्नी हीच जिजाऊंची ओळख नव्हती.जिजाऊंच्या कार्याचा,कर्तुत्वाचा गौरव सर्वदूर देशामध्ये व दिशामध्ये पसरला होता.अशा जिजाऊंनी साऊली होऊन आपल्या सुपूत्राला सर्वच प्रकारची सोबत,शिक्षण दिले.आई होऊन शिवबावर सावलीसुध्दा धरली.

राजमाता जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी (पौष पौर्णिमा शके १५१९) रोजी सिंदखेडराजा (बुलडाणा) येथे झाला.म्हाळसाराणी हे त्यांच्या आईचे नाव तर लखुजीराव जाधव हे त्यांच्या वडिलांचे नाव होते.दत्ताजी,अचलोजी,राघोजी व बहादुरजी हे त्यांचे वडिलबंधू होते.लखुजीराव वेरूळच्या यादव घराण्याचे वंशज होते.

जिजाऊंना अनेक भाषांचे ज्ञान अवगत होते.लखुजीराव जाधव निजामशाहचे वतनदार होते.आपल्या पराक्रमाऩे त्यांनी निजामशाहच्या दरबारात मानाचे स्थान पटकावले होते.इ.स.१६१० साली वेरूळ येथे निजामशाहच्या पुढाकाराने जिजाऊंचा विवाह शहाजीराजेंशी झाला.तो काळ मोठा धामधुमीचा होता.भोसले,जाधव,निंबाळकर,महाडिक,सुर्वे,शिर्के असे अनेक मराठा सरदार वतनापायी अदिलशाह,कुतूबशाह,निजामशाह,मोघल यांच्याकडे चाकरी करीत होते

" ! शहाजीराजे भोसले " !

।।स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले।।

वेरूळच्या मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांनी पुत्र व्हावा म्हणून अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस केला होता.त्यामुळे पुत्र झाल्यावर शहाजी व शरीफजी अशी आपल्या पुत्रांची नावे त्यांनी ठेवली.शहाजीराजेंचा जन्म इ.स.१८ मार्च,१५९४ रोजी झाला.

शहाजीराजेंचे पिता मालोजीराजे भोसले निजामशाहच्या चाकरीत होते. निजामशाहच्या दरबारात सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव हे सुध्दा चाकरीत होते.जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.पुढे निजामशाहच्या पुढाकाराने शहाजीराजेंचा विवाह,लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी जिजाबाई यांच्याशी इ.स.१६०३ मध्ये झाला.शहाजीराजें व जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये झाली.त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते.त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजीराजेंचा सांभाळ जिजाबाईंनी केला.

सासरे लखुजी जाधव यांच्याशी बेबनाव

मालोजीराजेंच्या दुदैवी मृत्यूनंतर शहाजीराजेंनी आपल्या पराक्रमाने निजामशाहच्या दरबारात मानाचे स्थान पटकावले.पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला,कारण होते पिसाळलेल्या हत्तीस काबूत करण्याचे.निजामशाहच्या दरबारातील एक हत्ती पिसाळला होता,हत्तीस पकडण्यास दोन पथके तयार केली गेली.पहिले पथक जाधवांचे होते,त्याचे नेतॄत्व लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ दत्ताजीराव जाधव करत होता.तर दुसरे पथक भोसले यांचे होते.त्याचे नेतृत्व शहाजीराजे भोसले यांचे बंधू संभाजीराजे भोसले करत होते.यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले.हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसल्यास ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासऱ्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दडावर वारं लागलां